त्वचेची काळजी

आरोग्यासाठीच नाही त्वचेसाठीही बेस्ट आहे गुलकंद, असा करा वापर

Trupti Paradkar  |  Jan 11, 2021
आरोग्यासाठीच नाही त्वचेसाठीही बेस्ट आहे गुलकंद, असा करा वापर

शारीरिक आरोग्याप्रमाणेच त्वचेच्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. कारण सततची धावपळ, धुळ, माती, प्रदूषण, चिंता, काळजी, कामाचा ताण, नातेसंबधातील तणाव या सर्व गोष्टींचा तुमच्या त्वचेवर नकळत परिणाम होत जातो. ज्याचा परिणाम तुम्हाला अकाली वृद्धत्व येतं. चेहऱ्यावर एजिंगचे मार्क्स, डार्क सर्कल्स दिसू लागतात. मात्र जर तुमच्या आहारात अशा काही गोष्टी असतील ज्यामुळे तुमच्या त्वचेचं योग्य पोषण होईल तर तुम्ही या समस्यांवर नक्कीत मात करू शकता. यासाठीच आहारात गुलंकदाचा समावेश करा. कारण गुलकंद जसा तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे तसंच त्यामुळे तुमच्या त्वचेचं पोषणही केलं जातं.

त्वचेसाठी फायदेशीर आहे गुलकंद

आरोग्याप्रमाणेच गुलकंदाचे सौंदर्यावरही अनेक चांगले फायदे होतात यासाठीच जाणून घ्या गुलकंद खाण्यामुळे त्वचेवर काय परिणाम होतो.

Instagram

पिंपल्सची समस्या होते दूर –

गुलकंदामुळे तुमच्या त्वचेचं आतून पोषण होतं. ज्यामुळे तुमची पिंपल्सची समस्या दूर होऊ शकते. कारण गुलकंदामध्ये भरपूर प्रमाणात अॅंटि ऑक्सिडंट आणि अॅंटि व्हायरल गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेखाली निर्माण होणाऱ्या इनफेक्शनला रोखलं जातं. गुलकंदामुळे तुमचे पोट स्वच्छ राखलं जातं. ज्याचा परिणाम तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात आणि तुमची त्वचा  नैसर्गिक पद्धतीने नितळ होते. जर तुम्हाला  वारंवार एक्नेचा त्रास होत असेल तर दररोज एक चमचा गुलकंद खाण्याचा तुम्हाला  नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.

त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो –

शरीरात जमा होणाऱ्या टॉक्सिन्समुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होतोच पण यामुळे तुमची त्वचाही काळवंडते. शिवाय बाहेरील धुळ, माती, प्रदूषणाचा परिणाम होऊन तुमच्या त्वचेच्या समस्या अधिकच वाढ जातात. पण जर तुम्ही नियमित गुलंकद खात असाल तर तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात आणि शरीराला थंडावा मिळतो. याचाच परिणाम तुमच्या त्वचेवर होत जातो आणि तुमची त्वचा नितळ आणि चमकदार दिसू लागते. रक्त शुद्ध होण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी गुलकंद खाणं फायदेशीर ठरतं. ज्यामुळे तुमच्या त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि तुम्ही फ्रेश दिसता.

त्वचेची सूज कमी होते –

कमी झोप अथवा काही आरोग्य समस्यांमुळे तुमच्या त्वचेवर सूज येते. मात्र जर तुमच्या आहारात गुलकंदाचा समावेश असेले तर त्यामुळे ही सूज कमी होण्यास मदत होते. कारण गुलकंदामध्ये अॅंटि इनफ्लैमटरी गुणधर्म आहेत. ज्यामुळे तुमच्या शरीराचा दाह, जळजळ कमी होते आणि त्वचेला तजेलदारपणा मिळतो. त्वचा टवटवीत दिसण्यासाठी नियमित गुलकंदाचा वापर करा.

तेलकट त्वचेसाठी उपयुक्त –

जर तुमची त्वचा अतिशय तेलकट असेल तर तुमच्यासाठी गुलकंद वरदान ठरू शकतं. कारण गुलकंद खाण्यामुळे तुमच्या त्वचेखालील सीबमची निर्मिती नियंत्रणात होते आणि त्वचेवर अती तेलाचा थर जमा होत नाही. ज्यांना चेहऱ्यावर अती तेल जमा झाल्यामुळे चेहरा चिकचिकीत दिसण्याचा त्रास होत असेल त्यांनी आहारात गुलकंदाचा समावेश अवश्य करावा.

Instagram

गुलकंद घरी बनवण्याची सोपी पद्धत –

गुलकंद बाजारात विकत मिळतो मात्र तुम्ही घरच्या घरी गुलकंद तयार करू शकता. यासाठी ही सोपी पद्धत जरूर जाणून घ्या.

गुलकंदासाठी लागणारे साहित्य –

गुलकंद बनवण्याची सोपी पद्धत –

गुलकंद नियमित खाण्यामुळे तुम्हाला झोप चांगली येते, पचनक्रिया  सुधारते, अॅसिडिटीचा त्रास कमी होतो, पित्त कमी होते आणि दिवसभर उत्साही वाटू लागते.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

गुलाबाच्या पाकळ्यांचा असा करा उपयोग आणि खुलवा सौंदर्य

गुलाबपाणी… त्वचा आणि केसांचं सौदर्य खुलवणारा नैसर्गिक उपाय! (Benefits Of Rose Water)

अॅंटि एजिंग आहे गुलाबाचं तेल, असा करा वापर

Read More From त्वचेची काळजी