आहारात चांगल्या गोष्टींचा समावेश करण्याचा हल्ली ट्रेंड आला आहे. एखाद्या गोष्टीची न्युट्रिशनल व्हॅल्यू जाणूनच आपण आहारात काही खास गोष्टींचा समावेश करतो. त्यातल्या त्यात हल्ली एक्झॉटिक भाज्यांचा चांगलाच ट्रेंड आहे. ब्रोकोली, रेड पेपर, झुकिनी, बेबी कॉर्न अशा काही भाज्या आता सगळीकडे आणि सहज मिळतात. मशरुम्स अर्थात मराठीमध्ये अळंबी हा प्रकारही हल्ली बऱ्यापैकी खूप जास्त खाल्ला जातो. चिकनला पर्याय म्हणून किंवा हेल्दी म्हणून मशरुम्स खाल्ले जातात. पण तुम्ही खात असलेल्या मशरुम्सचे तुम्हाला फायदे- तोटे माहीत आहेत का? चला जाणून घेऊया मशरुम्स खाण्याचे फायदे- तोटे
मशरुम्स म्हणजे काय?
मशरुम ही एक बुरशी गटातील वनस्पती आहे. ही अशी बुरशी आहे जिचा उपयोग खाण्यासाठी नक्कीच केला जाऊ शकतो. मशरुम्स ही आपोआप उगणारी अशी वनस्पती आहे. पण हल्ली मशरुमची शेती केली जाते. मशरुम हे कुत्र्याने लघवी केल्यानंतर उगवतात असे म्हणतात. पण अशाच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे मशरुम्स हे उगवतात. पण कोणतेही मशरुम्स खाल्ले जात नाही. काही ठराविक पद्धतीने आलेलेच मशरुम्स हे खाल्ले जातात. काही मशरुम विषारी असतात. पण असे विषारी मशरुम्स खाल्ले जात नाही. भारतात जास्त करुन बटण मशरुम्स खाल्ले जातात. बटण मशरुम्सचा आकार हा गोलाकार बटणासारखा असतो आणि त्याला खाली एक दांडी असते.
मशरुम्स खाण्याचे फायदे
मशरुम्समध्ये अनेक पोषक घटक असतात त्याचा उत्तम आरोग्यासाठी उपयोग होतो. जाणून घेऊया मशरुमचे फायदे
- मशरुम्समध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन D आहे. जर तुम्हाला या व्हिटॅमिनची कमतरता असेल आणि त्यामुळे काही आजार उद्धभवत असतील तर तुम्ही अगदी हमखास याचे सेवन करायला हवे.
- मशरुममध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात त्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नक्कीच मदत मिळते.
- मशरुम्सचे नियमित सेवन केल्यामुळे थकवा दूर होण्यास मदत मिळते. शरीराला चांगली उर्जा मिळते.
- मशरुममध्ये सेलेनियम नावाचे घटक असतात. जे तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.
- मशरुममध्ये अँटीऑक्सिडंट घटक असतात जे शरीरातील पेशींना मजबूत ठेवण्याचे काम करतात.
तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे खरंच येतात का पिंपल्स, जाणून घ्या सत्य
मशरुममुळे होऊ शकते हे नुकसान
ज्याप्रमाणे मशरुम खाल्ल्यामुळे तुम्हाला फायदे मिळतात. अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला त्याचे काही तोटेेही जाणवू शकतात.
- मशरुम्स हे नेहमी ताजे असायला हवे. जर ते शिळे किंवा खराब झालेले असतील तर त्यामुळे तुम्हाला पोटांचे विकार संभावतात
- काही जणांना मशरुमची एलर्जी असते. जर तुम्हाला मशरुम खाल्ल्यानंतर काही होत असेल तर त्याचे सेवन त्याचक्षणी थांबवावे
- मशरुमचा कोणता प्रकार तुम्ही खाताय त्याची शुद्धता माहीत असेल तर त्याचे सेवन करा अन्यथा तुम्हाला त्याचे तोटे जाणवतील.
आता आहारात मशरुम्सचा समावेश करताना ही महितीही असू द्या.