निरोगी आरोग्यासाठी अनेक वेगळ्या थेरपी येत असतात. वेगवेगळ्या समस्या, बदलत जाणाऱ्या आरोग्याच्या समस्या यांमुळे विज्ञानाच्या शाखाही रुंदावत आहे. कितीही नवीन टेक्नॉलॉजी किंवा शोध लागले गेले तरी देखील कित्येक वर्ष जुने असलेले आयुर्वेद हे आपल्यासाठी फार जवळचे आहे. यातीलच एक प्रकार म्हणजे स्टोन थेरपी. स्टोन थेरपी (Stone Therapy) याबद्दलही तुम्ही नक्कीच ऐकले असेल. हा एक मसाजचा प्रकार असून काही खास ठिकाणीच हा मसाज करुन मिळतो. याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळेच ही थेरपी सध्या सगळीकडे जास्त प्रचलिक होऊ लागली आहेत. पण स्टोन थेरपी म्हणजे काय? ती कधीपासून आहे? आणि त्याचे फायदे काय ते आपण जाणून घेऊया.
अधिक वाचा : Pumice Stone म्हणजे काय, सौंदर्यासाठी कसा करावा वापर
स्टोन थेरपीचा इतिहास
स्टोन थेरपी या शब्दावरुन तु्म्हाला ही स्टोन म्हणजेच खास दगडांचा उपयोग करुन केली जाणारी थेरपी असावे असे सहज लक्षात येते. स्टोन थेरपीचा शोध हा 1993 साली लागला. त्यावेळी याला La stone Therapy असे नाव ठेवण्यात आले. स्टोन थेरपी हा एक प्रकारचा मसाज असून त्यामध्ये विशिष्ट प्रकारचे दगड वापरुन ते गरम आणि थंड असे दोन्ही केले जातात. पूर्वी या पद्धतीच्या मसाजमध्ये फक्त शरीरावरील 7 चक्र ( 7 chakras of body) यावर फक्त दगड ठेवून मसाज केला जात होता. पण या मसाजची प्रसिद्धी पाहता आता या मसाजच्या किमंतीमध्ये तुम्हाला स्टोन थेरपीसोबत स्विडीश मसाज, डीप टिश्यू मसाज देखील दिला जातो. त्यामुळे अधिक रिलॅक्स होता येते. या मसाजसाठी खास व्होलकॅनिक स्टोन वापरला जातो. सगळ्यात आधी स्टोन गरम केला जातो. त्यानंतर तो थंड करुन एनर्जी लॉक करण्यासाठी स्टोन थंडही केला जातो.
अधिक वाचा : अंग खूप दुखत असेल तर करा हे सोपे उपाय
स्टोन थेरपीचे फायदे
स्टोन थेरपीचे फायदेही अनेक आहेत. तुम्हीही स्टोन थेरपी करुन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या थेरपीचे फायदे माहीत असायला हवेत.
- स्टोन थेरपीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुमच्या शरीरावर असलेला ताण- तणाव कमी करणे. तुमच्या नसांना शांत करुन तुम्हाला रिलॅक्स करण्याचे काम करते.
- प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही स्टोन थेरपीचा उपयोग होतो. स्टोन थेरपीमुळे तुम्ही आजारांपासून दूर राहता.
- मसल ताणले गेले असतील किंवा अंगदुखी होत असेल तर या थेरपीने अंगदुखी बंद होण्यास मदत मिळते.
- निद्रानाशाचा त्रास तुम्हाला असेल तर तो त्रास कमी करण्यासाठी तुम्हाला स्टोन थेरपी मदत करते. चांगली झोप मिळवून देण्यासाठी स्टोन थेरपी ही उत्तम आहे.
- कॅन्सरसारख्या आजारांना दूर ठेवण्याचे काम ही स्टोन थेरपी करते. कॅन्सरच्या वाईट घटकांना दूर ठेवण्याचे काम ही थेरपी करते.
स्टोन थेरपीचे हे फायदे असले तरी हे दगड खूप गरम असतात. ज्यांची त्वचा खूप संवेदनशील आहे अशांनी ही थेरपी करताना खूप विचार करावा लागतो. अशा लोकांनी डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणेच चांगले असते. पण तुम्ही एकदा तरी स्टोन थेरपी रायला विसरु नका.