लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई, चंदा है तू मेरा सूरज है तू किंवा गुडिया रानी बिटीया रानी अशा मराठी-हिंदी अनेक अंगाई आहेत. ज्या प्रत्येक आई आपल्या मुलासाठी लहानपणी म्हणतेच. तुमच्यासाठी आई किंवा आजीने अशी अंगाई गायली असेलच. मुलीने ऐकलेली अंगाई ती जेव्हा आई बनते तेव्हा तिच्या मुलांना ऐकवते. आपल्या लेकराला शांत झोप यावी म्हणून प्रत्येक आई त्याला जवळ घेऊन प्रेमाने अंगाई गात असते. पण तुम्हाला माहीत आहे का, कोणतीही आई आपल्या मुलाला असंच अंगाई ऐकवते असं नाहीतर त्यामागेही कारण आहे. कारण आईने गायलेली अंगाईही बाळासाठी फायदेशीर असते. POPxoMarathi च्या या लेखात जाणून घेऊया बाळाला अंगाई गाण्याचे अनेक फायदे.
Shutterstock
आई आणि मुलाचं कनेक्शन होतं मजबूत
अंगाई ऐकता ऐकता बाळाला केव्हा झोप लागते हे त्याला कळतंच नाही. अंगाई ऐकता ऐकता लेकरू त्याच्या स्वप्नांच्या दुनियेत मग्न होतं आणि हा आनंदी अनुभव बाळाच्या आठवणीत कायम राहतो. अंगाई ही आई आणि बाळामध्ये एखाद्या कनेक्शनचं काम करते आणि दोघांना अजून जवळ आणते. अंगाईच्या आवाजात एक जादू असते जी मुलांवर काम करते. तज्ज्ञांनुसार, अंगाईचा आवाज मुलांच्या सतत कानावर पडतो आणि ते हळूहळू त्या आवाजाशी स्वतःला जोडल्याचं समजू लागतात.
बाळांच्या मेंदूच्या विकासासाठी ही आवश्यक अंगाई
आई गायलेली अंगाई हा बाळासाठी सुखद अनुभव असतो. ज्यामुळे अंगाई ऐकल्यावर बाळाच्या मेंदूचा विकास होतो. खरंतर अंगाई बाळाच्या मेंदूतील अनेक भागांना एकत्र उत्तेजित करते. ज्यामुळे मेंदूचा विकास होतो. याला मेडिकल भाषेत म्युझिकल लर्निंग असं म्हटलं जातं. अंगाई ऐकून बाळ वेगवेगळ्या आवाजात फरक ओळखायला शिकतं.
अंगाईने कमी होते बाळांची भीती
आईच्या आवाजातील अंगाईने बाळाला आईसोबतच असल्यासारखं वाटतं. ज्यामुळे त्यांना सुरक्षित वाटतं आणि ते निडर होतात. तसंच हळूहळू संकटाचा सामना करण्याची शिकवणही त्यांना मिळते. अशाप्रकारे अंगाई मुलांना स्वतःवर विश्वास ठेवण्याची शिकवण देते.
अंगाईने येते चांगली झोप
आई अंगाई यासाठी गाते की, ज्यामुळे बाळाला शांत आणि गाढ झोप लागेल. जर मुल नीट झोपलं नाहीतर ते चिडचिडं आणि थकल्यासारखं दिसतं. अशावेळी अंगाई त्यांच्यावर जादूप्रमाणे परिणाम करते आणि त्यांना गाढ झोप लागते.
बाळाची भाषा मजबूत बनवते अंगाई
अंगाईने बाळाची भाषा शिकण्याची क्षमताही वाढते. खरंतर प्रत्येक दिवशी अंगाई ऐकताना मुलांना त्यातील शब्द पाठ होऊ लागतात. ज्यामुळे ते शब्दांचा वापर योग्य रितीने करण्यास शिकतात.
आईसाठीही फायदेशीर अंगाई
फक्त बाळासाठीच नाहीतर आईसाठीही अंगाई फायदेशीर ठरते. प्रसूतीनंतर येणार तणाव, पोस्टपार्टम डिप्रेशन आणि नकारात्मक गोष्टींशी लढणाऱ्या आईचं लक्ष यामुळे विचलित होतं. अंगाई ऐकून जेव्हा बाळं हसतं तेव्हा आईमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते.
Shutterstock
जर तुमचंही मुलं दूध पित नसेल तर करा हे उपाय
मग तुम्हीही तुमच्या बाळाला नक्की ऐकवा अंगाई. आपल्या बाळाच्या भविष्यासाठी आणि तुमच्यातही सकारत्मकता निर्माण करण्याचं काम ही अंगाई करेल. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला POPxoMarathi वर अजून काय वाचायला आवडेल तेही आम्हाला सांगा.
तुमच्या बाळासाठी नाव निवडताना लक्षात ठेवा या गोष्टी
तुमच्या बाळासाठी अर्थासह आधुनिक श्री गणेशाची नावे
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.