Natural Care

त्वचेची खोलवर स्वच्छता करणारी मायक्रो डर्मा ट्रिटमेंट आहे तरी काय

Leenal Gawade  |  Feb 28, 2021
त्वचेची खोलवर स्वच्छता करणारी मायक्रो डर्मा ट्रिटमेंट आहे तरी काय

त्वचा स्वच्छ, सुंदर आणि कायम प्रसन्न दिसण्यासाठी तुम्ही करत असाल बरेच प्रयत्न. तर तुमच्यासाठी आजचा विषय आहे फारच महत्वाचा. त्वचा सुंदर दिसण्यासाठी तिची खोलवर स्वच्छता होणे फारच गरजेचे असते. चेहरा फेसवॉश करुन किंवा स्क्रब करुन त्याची स्वच्छता होतेच असे सांगता येत नाही. वर वर स्वच्छता करणे आणि खोलवर स्वच्छता होणे यामध्ये बरेच अंतर आहे. तुमच्या त्वचेची खोलवर स्वच्छता करण्यसाठीच मायक्रोडर्मा (Micro Derma)नावाची एक ट्रिटमेंट केली जाते. या ट्रिटमेंटच्या मदतीने तुमच्या त्वचेमध्ये बराच फरक पडतो. चला तर जाणून घेऊया ही मायक्रो डर्मा ट्रिटमेंट आहे तरी काय आणि त्याचे फायदे

मायक्रो डर्मा म्हणजे काय?

Instagram

कोणत्याही स्किन क्लिनिकमध्ये गेल्यानंतर तुमच्या त्वचेला सगळ्यात आधी केले जाते ते म्हणजे मायक्रो डर्मा. अर्थात हा याचा शॉर्टफॉम आहे याचा खरा शब्द आहे Microdermasion . एका मशीनच्या साहाय्याने तुमच्या पोअर्समधील घाण शोषून घेण्याचे काम केले जाते. त्यामुळे पोअर्समध्ये अडकलेली धूळ, माती योग्य पद्धतीने काढली जाते. पोअर्समध्ये घाण अडकली की, त्यामुळे त्वचेवर पिंपल्स होण्याची शक्यता अधिक असते. असे पिंपल्स त्वचेवर जास्त काळासाठी राहिले की, त्यामुळे पुढे जाऊन त्वचेसंदर्भात अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. त्यामुळे पोअर्समधील घाण काढून पोअर्सचा आकार कमी करण्याचे काम या ट्रिटमेंटमध्ये केली जाते.

चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी घरीच बनवा स्क्रब, मिनिटांमध्ये दिसाल सुंदर

अशी करतात ट्रिटमेंट

Instagram

कमीत कमी वेळामध्ये होणारी स्किन ट्रिटमेंट त्वचेसाठी फारच फायदेशीर आहे. ती करण्याची पद्धत जाणून घेऊया. 

चाळीशीनंतर करा या हेअरस्टाईल, दिसणार नाही वयस्कर

जाणून घ्या बजेट

आता एखादी स्किन ट्रिटमेंट म्हटल्यावर त्याचे थोडे बजेट अधिक असणारच. वेगवेगळ्या स्किन क्लिनिकनुसार हे बजेट असते. साधारणपणे या ट्रिटमेंट 1500 पासून ते 2 हजारापर्यंत मिळतात.

तुम्ही दररोज करता का जीभ स्वच्छ, फॉलो करा या सोप्या टिप्स

Read More From Natural Care