आरोग्य

गवतावर अनवाणी चालण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का

Trupti Paradkar  |  May 10, 2021
गवतावर अनवाणी चालण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का

 

 

सकाळी एखाद्या पार्कमध्ये हिरव्यागार गवतावरून  चप्पल न घालता म्हणजेच अनवाणी चालणं सुखकारक अनुभव असू शकतो. असं गवतावरून अनवाणी चालणं जितकं रोमांचक असतं तितकंच ते आरोग्यासाठी हितकारकही असतं. यावर आजवर अनेक संशोधने करण्यात आलेली आहेत. तज्ञ्जांच्या मते गवत अथवा जमिनीवर अनवाणी चालण्याचे शरीरावर सकारात्मक फायदे होतात. काही जण या थेरपीला अर्थिंग थेरपी असं ही म्हणतात.

अर्थिंग थेरपी म्हणजे काय –

 

आजवर तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी अर्थिंग करण्यात आलेलं नक्कीच पाहिलं असेल. त्यामुळे या अर्थिंग थेरपी विषयी तुमच्या मनात नक्कीच काही प्रश्न निर्माण होतील. आपलं शरीरदेखील बायो इलेक्ट्रिकल आहे. म्हणजेच आपल्या शरीरात सर्व पेशी आणि व्यवस्थेमुळे विद्युत लहरी निर्माण होत असतात. पृथ्वी म्हणजेच जमीन ही स्वतःच ऊर्जेचा एक मोठा स्त्रोत आहे. सहाजिकच आपल्या शरीराला सुरळीत चालण्यासाठीही अर्थिंग थेरपीची गरज असते. तज्ञ्जांचा मचे पृथ्वीच्या ऊर्जेच्या चक्राचे आपल्या शरीरातील विद्युत लहरींवर अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम होत असतात. शरीरातील ऊर्जा कार्यांन्वित करण्यासाठी अर्थिंग थेरपीचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.

instagram

व्हिटॅमिन एन म्हणजे काय –

 

संशोधकांनी जमीनीच्या संपर्कात येणाऱ्या या ऊर्जेला व्हिटॅमिन एन असं नाव दिलं आहे. काही संशोधकांच्या संशोधनानुसार जमिनीवर अनवाणी चालण्यामुळे रक्तदाब आणि ताणतणावावर नियंत्रण मिळवता येतं असं सिद्ध झालं आहे. काही संशोधकांच्या मते मातीतील बॅक्टेरिआ ताणतणाव आणि थकवा कमी करतात आणि शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवतात. 

मातीच्या स्पर्शाचा संपूर्ण शरीरावर परिणाम –

 

अनवाणी चालण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा की यामुळे तळव्यांना ऑक्सिजन मिळतो. ज्याचा परिणाम तुमच्या शरीरातील रक्तप्रवाहावर होतो आणि तुमचा थकवा दूर होतो. शरीरातील सर्व मांसरेशी सक्रिय झाल्यामुळे कंबरेखालील भागात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ज्यामुळे पाय आणि गुडघ्याचे दुखणे, अनिद्रा, ह्रदयरोग कमी होतात. चप्पल न घालता चालण्याचा  तुमच्या संपूर्ण शरीरावर योग्य परिणाम दिसून येतो. यामुळे तुमच्या शरीरातील प्रतिकार क्षमता वाढते आणि आजारपणापासून तुम्ही दूर राहता. दररोज काही मिनीटे असं अनवाणी चालण्यामुळे तुमचा ताणतणाव कमी होतो. 

मासिक पाळीच्या वेदना होतात कमी –

 

शरीरातील हॉर्मोन्स असंतुलित झाले की शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होतात. महिलांना तर हॉर्मोनल बदलांमुळे मासिक पाळीच्या वेदना दर महिन्याला सहन कराव्या लागतो. हॉर्मोनल बदलांमुळे मूड स्विंग, पोटदुखी, डोकेदुखी, बद्धकोष्ठता, पिंपल्स येणे अशा अनेक समस्या जाणवतात. मात्र जर तुम्ही नियमित  गवतावरून अनवाणी चालला तर तुम्हाला मासिक पाळीतील वेदना सहन करणे शक्य होते. यासाठीच महिलांनी दररोज काही मिनीटे चप्पल न घालता गवत अथवा जमिनीवरून फिरावे. 

डोळ्यांना चांगला आराम मिळतो –

 

आपल्या पायाच्या तळव्यावर रिफ्लेक्सोलॉजी झोन असतात. ज्यांना अॅक्युप्रेशर पॉईंट असंही म्हणतो. हे अॅक्युप्रेशर पॉईंट  शरीरातील प्रत्येक अवयवाचे प्रतिनिधित्त्व करत असतात. जेव्हा तुम्ही जमिनीवरून अनवाणी चालता तेव्हा तुमच्या पायाची बोटे आणि तळव्यांवर ताण पडतो. बोटांमध्ये डोळ्यांना आराम देणारे अॅक्युप्रेशर पॉईंट असतात. अनवाणी चालण्यामुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य सुधारते. दृष्टी तेजस्वी होण्यासाठी आणि डोळ्यांच्या समस्या कमी होण्यासाठी गवतावर चप्पल न घालता फिरणे तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

जाणून घ्या ‘वॉकिंग मेडिटेशन’ कसं करावं आणि त्याचे फायदे

घरच्या घरी 45 मिनीटं चालून सुद्धा तुम्ही राहू शकता निरोगी, जाणून घ्या कसं

गरोदरपणात चालण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का

Read More From आरोग्य