फॅशन

वर्ष 2018 मध्ये सर्वात जास्त चर्चा झालेले हे 10 रेड कार्पेट लुक्स

Dipali Naphade  |  Dec 29, 2018
वर्ष 2018 मध्ये सर्वात जास्त चर्चा झालेले हे 10 रेड कार्पेट लुक्स

वर्ष  2018 संपायला आता काही तासच बाकी आहेत. 2019 या वर्षाचं खास स्वागत करण्यापूर्वी 2018 मध्ये नक्की काय काय घडलं, याकडेही थोडं लक्ष द्यायला हवं ना. बॉलीवूडबद्दल सांगायचं झालं तर, सेलिब्रिटीच्या लग्नांपासून ते सुपर – डुपरहिट चित्रपटांपर्यंत हे वर्ष अगदी खास होतं. या वर्षी खूप कार्यक्रम झाले, जे नेहमीच लक्षात राहतील. बॉलीवुड अभिनेत्रींचे 10 रेड कारपेट (red carpet) लुक्स, जे यावर्षी चर्चेत राहिले आणि येणारी बरीच वर्ष हे लुक्स आपल्या सर्वांच्याच लक्षात राहतील.

‘राणी पद्मावती’ दीपिकाचा लुक
सहा वर्षांच्या डेटिंगनंतर यावर्षी वाजतगाजत दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने नोव्हेंबरमध्ये लग्न केलं. यावर्षी सर्वात जास्त गाजलेल्या लग्नांपैकी हे एक लग्न होतं. विवादित चित्रपट ‘पद्मावत’, रणवीरशी लग्न याशिवाय दीपिका आपल्या फॅशन (fashion) लुक्सच्या कारणांनीदेखील यावर्षी गाजली.

दीपिका पादुकोणचा मेट गालाचा हा लुक थीमनुसार नव्हता, मात्र डिझाईनर प्रबल गुरुंगच्या या स्कार्लेट गाऊनमध्ये दीपिका अतिशय सुंदर दिसत होती.

 

‘क्वीन’ कंगनाचा हॉट अंदाज
2018 मध्ये कंगना रणौत आपला महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘मणिकर्णिका’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र होती. कंगना जे काही करते त्यामध्ये अक्षरशः स्वतःसा झोकून देते. कोणताही विवाद असो वा फॅशन सेन्स. कंगनाचा अंदाज नेहमीच वेगळा असतो. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नेडरेट टॅकिरोग्लूच्या कुटूर कॅटसूटमध्ये कंगनाचा हॉट लुक अगदी बघण्यासारखा होता.

‘राझी’ आलियाचा खास लुक
वर्ष 2018 हे आलिया भटसाठी अतिशय खास होतं. तिच्या ‘राझी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आणि शिवाय ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, ती आणि रणबीर एकमेकांच्या जवळ आले आणि सध्या दोघे एकमेकांना डेट करत आहेत. वास्तविक आलियाचा फॅशन सेन्स अप्रतिमच आहे. कोणत्याही बॉलीवूड अभिनेत्रीला टक्कर देईल असा फॅशन सेन्स आलियाचा आहे. एका पुरस्कार सोहळ्यात आलिया या फिगर- हगिंग व्हाइट गाऊनमध्ये दिसली होती. या गाऊनला साजेशी वेव्ही हेअरस्टाईल आणि अतिशय कमी असे दागिने असलेला तिचा हा लुक अप्रतिम दिसत आहे.

‘बेगम’चा निराळा अंदाज
यावर्षी 2018 मध्ये सैफ अली खान पतौडीची बेगम अर्थात करिना कपूरपेक्षाही जास्त चर्चा झाली ती त्यांचा मुलगा छोटा नवाब तैमूल अली खानची. मीडियाचा एकही दिवस असा गेला नाही की, तैमूरचा फोटो काढण्यात आला नाही. हे वर्ष करिनासाठीदेखील खास होतं. तैमूरच्या जन्मानंतर तिचा 2018 मध्ये पहिलाच ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला चांगला प्रतिसादही मिळाला. बेगम करिना कपूरला बॉलीवूड स्टाईल क्वीनदेखील म्हटलं जातं. नईम खानच्या प्लंजिंग नेकलाईन गाऊनमध्ये करिनाचं सौंदर्य खुलून दिसत आहे.

 

‘धडक’त आहे जान्हवी कपूर
यावर्षी बऱ्याच स्टार किड्सने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यामध्येच सर्वात जास्त चर्चा झाली ती दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरची. ‘धडक’ चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या जान्हवीचा फॅशन सेन्स खूपच चांगला आहे. प्रत्येक कार्यक्रमात जान्हवी अप्रतिम दिसते. आपल्या पहिल्या रेड कार्पेट अपिअरन्ससाठी जान्हवीने राल्फ अँड रूसोचा हा ऑफ शोल्डर गाउन निवडला होता. या गाऊनमध्ये जान्हवी अतिशय सुंदर दिसत होती.

 

‘द स्काय इज पिंक’ फॉर प्रियंका चोप्रा
वर्ष 2018 मध्ये प्रियांका चोप्रा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिली. निक जोनसबरोबर जोधपूरमध्ये रॉयल लग्न केलेल्या प्रियांका चोप्रासाठी हे वर्ष खूपच खास ठरलं आहे. आपल्या निकबरोबरच्या लग्नासह इतर अनेक कार्यक्रमांमध्ये प्रियांकाने घातलेल्या कपड्यांवरूनही बरीच चर्चा झाली. वास्तविक तिचा मेट गालाचा लुक विसरणं तर शक्यच नाही. राल्फ लॉरेनने डिझाईन केलेल्या या वेल्वेट गाउन आणि हेडड्रेस मध्ये ती एकदम थीमनुसार सजली होती. या लुकची प्रचंड चर्चा झाली होती.

 

‘रेस’ मध्ये मागे कशी राहील जॅकलिन फर्नांडिस
आपलं स्माईल आणि सलमान खान स्टारर चित्रपट ‘रेस 3’मध्ये काम करणारी जॅकलिन फर्नांडिस यावर्षी तिच्या फॅशन सेन्समुळेही चर्चेत राहिली. प्रत्येक रेड कार्पेटमध्ये इतर अभिनेत्री जेव्हा गाऊन अथवा ड्रेस घालण्यास प्राधान्य देत असतात तिथे जॅकीने मात्र हा वाइड लेग्ड रेड पँटसूट घालून आपला फॅशन सेन्स दाखवून दिला. तिचा हा लुक खूपच हिट झाला होता आणि इतर अभिनेत्रींपेक्षा जॅकलिनला या लुकने वेगळं ठरवलं होतं.


कलरफुल ऐश्वर्या राय बच्चन
माजी मिस वर्ल्ड आणि बच्चन परिवारीची सून ऐश्वर्या राय बच्चनच्या सौंदर्याची बरोबरी आजही कोणी करू शकत नाही. पुन्हा एकदा यावर्षी बॉलीवूडमध्ये परतलेल्या ऐश्वर्यासाठी रेड कार्पेट कार्यक्रम नक्कीच नवे नाहीत. यावर्षी रेड कार्पेट सोहळ्यात तिनं कलरफुल गाऊन घालून लोकांचं मन जिंकलं होतं. दुबईस्थित डिझाईनर मायकल सिंकोने या गाऊनचं डिझाईन केलं असून ऐश्वर्या या गाऊनमध्ये अप्रतिम सौंदर्यवती दिसत होती.

 

‘बरेली की बर्फी’ क्रिती
क्रिती सॅननने खूप कमी वेळात बॉलीवूडमध्ये नाव कमावलं आहे. यावर्षी तिचा चित्रपट बर्फी चांगलाच गाजला. एका फॅशन इव्हेंटमध्ये क्रितीचा हा लुक खूपच चर्चित विषयांपैकी एक होता. क्रिस्टल्स, लेअर्स आणि ग्लिमरपासून तयार करण्यात आलेल्या या गाऊनच्या लुकमध्ये क्रिती अतिशय रिफ्रेशिंग वाटत होती.

 

फॅशनिस्टा सोनम कपूरचा जलवा
बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरसाठीदेखील हे वर्ष अगदी खास होतं. आपला बॉयफ्रेंड आनंद आहुजाबरोबर लग्न केलेली सोनम सध्या ‘जोया’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. सोनमचे रेड कार्पेट लुक नेहमीच चर्चेत असतात.  जियॉर्जियो अरमानीच्या या प्लंजिंग नेकलाइन आउटफिट मध्ये सोनमने एक स्लीक जॅकेटबरोबर पेअर केलं आहे. सोनम आणि आनंद या लुकमध्ये एक पॉवरफुल कपल वाटत आहेत.

फोटो सौजन्य – Instagram  

 

Read More From फॅशन