कधी कधी डाएट करतानाही असे काही दिवस येतात की, अशा दिवसांमधअये कितीही टाळले तरी बऱ्याच नको असलेल्या गोष्टी खाल्ल्या जातात. दोन चार दिवस खूप खाल्ल्यानंतर दोन ते तीन दिवसांचा डिटॉक्स करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही काही खास डिटॉक्स रेसिपी शोधून काढल्या आहेत. हो चहाचा उपयोग करुनही तुम्हाला डिटॉक्स करता येऊ शकते. या सोप्या आणि साध्या चहा रेसिपीज आहेत ज्या तुम्ही कधीही घरी करु शकता आणि पिऊ शकता.या रेसिपीज ना Teatox असे देखील म्हणातात. . विशेष म्हणजे तुमचे वजन कमी करु शकतात अशा या काही खास रेसिपीज खास तुमच्यासाठी
लिक्विड डाएटच्या मदतीने महिन्याभरात करा वजन कमी
आलं- हळदीचा चहा
आलं आणि हळदीचा चहा हा अनेक जण पितात. हा चहा करणे फारच सोपे असते आणि त्याची चव फार काही वेगळी लागत नाही. हा चहा प्यायल्यानंतर थोडे रिफ्रेशिंग वाटते. एका भांड्यात पाणी गरम करुन त्यामध्ये एक चमचा हळद आणि आलं किसून घाला. जर तुम्हाला आल्याचा मारा आवडत असेल तर तुम्ही आलं थोडं मोकळ्या हाताने घाला. हा मस्त उकळलेला चहा गरम गरम प्या. तुम्हाला गॅस आणि इतर असलेला त्रास अजिबात होणार नाही.
दालचिनीचा चहा
वजन कमी करण्यासाठी दालचिनी ही कमालीचे काम करते. दालचिनीचा उपयोग करुन तुम्ही मस्त चहा रेसिपीज बनवू शकता. दालचिनीचा चहा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. दालचिनी रात्रभर पाण्यात भिजत घाला. त्यामुळे दालचिनीचा अर्क पाण्यात पूर्णपणे उतरतो. त्यामुळे रात्रभर दालचिनी भिजत घाला. दुसऱ्या दिवशी तेच पाणी छान उकळून घ्या आणि हे पाणी प्या. दालचिनीचा हा चहा एकदम मस्त लागतो.
आहारात गव्हाचा समावेश करुनही कसं कमी करावं वजन
पुदिन्याचा चहा
पुदिना हा पोटासाठी खूपच चांगला असतो. पुदिन्यामुळेही शरीरातून सगळी घाण निघण्यास मदत मिळते. जर तुम्हाला पुदिना आवडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने चहा करु शकता एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये मूठभर पुदिन्याची पाने उकळून घ्या. त्यामध्ये आवश्यकतेनुसार लिंबू आणि मीठ घालून हा चहा उकळून घ्या आणि तुमच्या जेवणानंतर हा मस्त चहा प्या
व्हिटॅमिन C हर्बल चहा
व्हिटॅमिन C हे शरीरासाठी फारच चांगले असते. डिटॉक्ससाठीही त्याचा वापर केला जातो. हा चहा करण्यासाठी तुम्हाला गुलाबाची पाने, लिंबाच्या साली, डाळिंबाची पावडर असे सगळे एकत्र करुन तुम्ही हा गरम गरम चहा तयार करा. हा चहा चवीला खूप चांगला लागतो. शिवाय यामुळे तुमची त्वचाही चांगली दिसते.
#WeightLoss : वजन कमी करण्यासाठी करा बर्फाचा वापर
तुळशीचा चहा
आयुर्वेदात तुळशीचे फारच महत्व आहे. तुळस ही फारच बहुगुणी आहे. तुळशीची पानं पाण्यात उकळून तुम्ही ते पाणी प्या. त्यामुळे तुमच्या शरीरातील मेद बाहेर पडण्यास मदत करते. तुळशीचा चहा करुन तुम्ही अगदी रोज संध्याकाळी किंवा उपाशी पोटी सकाळी प्यायला तरी चालेल
आता Teatox रेसिपी तुम्ही नक्की करुन पाहा.