चहा, कॉफी घेतल्याशिवाय अनेकांचा दिवसच सुरू होत नाही. चहा आणि कॉफीमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी अथवा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आजकाल ग्रीन टी घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र एकदा चहा, कॉफीची सवय लागली की त्याच्याऐवजी ग्रीन टी घेणं वाटतं तितकं सोपं नाही. मात्र असं असलं तरी ग्रीनचे टीचे फायदे नाकारता येत नाहीत. त्यामुळे सध्या ग्रीन टी पिण्याचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. जर तुम्ही देखील हा ट्रेंड फॉलो करण्याचा विचार करत असाल तर, त्याआधी तुम्हाला ग्रीन टी घेण्याची योग्य वेळ माहीत हवी. कारण ग्रीन टी जर योग्य वेळी घेतली तरच त्याचे फायदे अधिक जाणवू शकतात अन्यथा ग्रीन टीमुळेही नुकसान होऊ शकतं. यासोबतच वाचा Green Tea : मनाला शांत आणि शरीराला निरोगी ठेवणाऱ्या ‘ग्रीन टी’चे फायदे (Green Tea Benefits In Marathi)
ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ कोणती
जर तुम्ही ग्रीन टी योग्य वेळी घेतली तर तिचे फायदे अधिक जाणवतात. कारण ग्रीन टीमध्येही कॅफेन आणि टेनिन्स असते. ज्यामुळे अती प्रमाणात आणि चुकीच्या वेळी ग्रीन टी घेतल्यामुळे अॅसिडिटीचा त्रास जाणवू शकतो. एकतर वर्षानूवर्षे आपल्याला सकाळी उठल्याबरोबर चहा,कॉफी घेण्याची सवय लागलेली असते. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर अमृततुल्य घेतलं नाही तर दिवसाची सुरुवातच झाली नाही असं वाटू शकतं. पण जर अशा वेळी चहा, कॉफी ऐवजी तुम्ही ग्रीन टी घेतली तर तुम्हाला जास्त फ्रेश आणि उत्साही वाटतं.. ग्रीन टी मधील अमिनो अॅसिड तुमच्या मेंदूला शांतता देतें आणि तुमच्या मेंदूला अधिक कार्यरत करतं.तसंच सुंदर दिसायचं असेल तर नियमित प्या ‘ग्रीन टी
ग्रीन टी कधी पिऊ नये
ग्रीन टी तुम्ही दिवसभरात एक ते दोन वेळा पिऊ शकता. मात्र लक्षात ठेवा कोणताही व्यायाम करण्यापूर्वी ग्रीन टी घ्या. कारण व्यायामानंतर ग्रीन टी घेतल्यामुळे तुमच्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होण्याची शक्यता असते. एका संशोधनानुसार व्यायामा आधी ग्रीन टी घेतली तर तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. मात्र त्यासाठी व्यायामापूर्वी दोन तास आधी ग्रीन टी घ्यायला हवी. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पिताय? तर मग वाचाच
झोपण्यापूर्वी आणि जेवणाआधी ग्रीन टी कधीच पिऊ नये. कारण अनेकांना जेवणानंतर चहा अथवा कॉफी घेण्याची सवय असते. मात्र ही एक चुकीची सवय आहे. जेवणानंतर ग्रीन टी घेतल्यास तुमच्या शरीराला तुम्ही घेतलेल्या आहारातील पोषणमुल्ये मिळत नाहीत. त्याचप्रमाणे जे लोक झोपण्यापूर्वी ग्रीन टी घेतात त्यांना अनिद्रेचा त्रास होण्याची शक्यता असते.
या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही वेळी ग्रीन टी घेऊ शकता. मात्र लक्षात ठेवा दिवसभरात दोन पेक्षा जास्त कप ग्रीन टी घेऊ नका. कारण त्यामुळे तुमच्या मेंदूला आराम मिळणार नाही. ज्याचा त्रास तुमच्या संपूर्ण आरोग्यावर होऊ शकतो.