दिवसेंदिवस गांजा प्रकरणामध्ये नवी आणि धक्कादायक नावं पुढे येत आहेत. असाच धक्का बसला आहे तो कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या गांजा प्रकरणातील अटकेमुळे. शनिवारी एनसीबीने दोघांनाही अटक केली. भारतीच्या घरातून 86.5 ग्रॅम इतका गांजा मिळाल्याचे सांगण्यात आले. इतकंच नाही तर भारती आणि हर्ष दोघांनीही गांजाचे सेवन केल्याचे स्वीकारले आहे. भारती आणि हर्ष हे टीव्ही जगातील सुप्रसिद्ध नावे आहेत. भारती आणि हर्ष हे दोघेही सध्या अनेक रियालिटी शो मधून दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांचे नाव या प्रकरणात गुंतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. भारती सिंह घराघरात प्रसिद्ध असून तिचे कॉमेडी टायमिंग अफलातून आहे आणि त्यामुळे अनेक सेलिब्रिटीही तिचे चाहते आहेत.
Bigg Boss 14 : कॅप्टन्सी टास्कमध्ये जान- एजाजमध्ये आली कटुता
भारतीची ‘तितली’ आता उडणार
भारती सिंह सध्या ‘द कपिल शर्मा शो’ मध्येही तितलीची भूमिका करत होती. पण या प्रकरणामुळे आता भारतीची शो मधून हकालपट्टी होणार असल्याची चर्चा आहे. कपिल सध्या एका वेबसिरीजमध्ये काम करत असल्याने त्याने काही भागांचे चित्रीकरण आधीच पूर्ण केले होते. त्यामुळे पुढच्या काही भागात भारती या शो मध्ये दिसेल. पण त्यानंतर भारतीची ही भूमिका पुढे कोणीही करणार नाही आणि भारतीलाही हे काम करता येणार नाही असे सुत्रांकडून कळले आहे. भारतीचे नाव गांजा प्रकरणात आल्यामुळेच हे पाऊल उचलण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेल्मेटशिवाय बाईक चालवणं ‘या’ अभिनेत्रीला पडलं भारी, भरावा लागला दंड
छाप्याच्या वेळी भारती आणि हर्ष दोघेही होते घरात
एनसीबीने मारलेल्या छाप्याच्या वेळी भारती सिंह आणि हर्ष हे दोघेही घरामध्येच होते. या प्रकरणात अनेक मोठीमोठी नावं समोर आली. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर या प्रकरणाला वेगळाच मोड मिळाला आणि आता या प्रकरणात अनेक मोठमोठे सेलिब्रिटी गांजाचे सेवन करत असल्याचे समोर आले आहे. भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांचे नावदेखील अशा प्रकरणात येईल असे कोणाच्याही मनात पण आले नसेल. पण आता पुढे या दोघांवर नक्की काय कारवाई करण्यात येणार आणि भारती आणि हर्षच्या करिअरला ब्रेक लागणार का असा प्रश्नही त्यांच्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. भारतीची आता एका मोठ्या शो मधून हकालपट्टी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र या प्रकरणात अजूनही भारतीच्या विरोधात अथवा भारतीबद्दल कोणत्याही सेलिब्रिटींनी काहीही वक्तव्य केलेले नाही. मात्र जॉनी लिव्हर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना इतकेच म्हटले आहे की, ‘गांजा प्रकरण इतके वाढले आहे की पूर्ण इंडस्ट्री खराब झाली आहे. हे अतिशय वाईट आहे.’ भारती आणि हर्ष या दोघांनाही 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्यात येणार आहे. दोघांचेही वकील त्यांना जामीन मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. रविवारी दोघांनाही रूग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. आता पुढे यावर कारवाई होणार असून एनसीबी पुढे काय पाऊल उचलणार याचीच भारतीच्या चाहत्यांना चिंता लागली आहे.
Good News: कपिल शर्मा पुन्हा होणार बाबा, जानेवारीमध्ये गिन्नी देणार दुसऱ्या बाळाला जन्म
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade