बिग बॉस

Bigg boss : रुबिना दिलैक विजेती, पण राहुलने जिंकली प्रेक्षकांची मनं

Leenal Gawade  |  Feb 21, 2021
Bigg boss : रुबिना दिलैक विजेती, पण राहुलने जिंकली प्रेक्षकांची मनं

‘अब सीन पलटेगा’ या टॅग लाईनसह सुरु झालेला बिग बॉसच्या 130 दिवसांहून अधिक काळ सुरु राहिलेला प्रवास रविवारी रात्री संपला. एका शानदार फिनाले राऊंडमध्ये रुबिना दिलैकला विजेती घोषित करत या सीझनचा शेवट झाला. या सीझनची ट्रॉफी रुबिना दिलैकच्या हाती लागली तरी देखील या खेळात राहून जर कोणी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली असतील तर तो आहे राहुल वैद्य. खेळात शेवटपर्यंत संयम दाखवत त्याने खऱ्या आयुष्यातील राहुल वैद्य कसा आहे हे लोकांना दाखवून दिले. त्यामुळे कालच्या सोहळ्यात राहुल वैद्यच्या हाती जरी ट्रॉफी लागली नसली तरी देखील त्याने मिळवलेले प्रेक्षकांचे प्रेमही तितकेच महत्वाचे आहे कारण त्याचा फायदा त्याला पुढील आयुष्यात नक्कीच होणार आहे.

Bigg Boss 14 : राहुल वैद्यला सतत केलं जातंय टार्गेट, मेकर्सवर फॅन्स नाराज

रुबिना-राहुलमध्ये होती स्पर्धा

Instagram

बिग बॉसच्या खेळात काही काळ घालवल्यानंतर या खेळात कोण पुढे जाणार याचा अंदाज  आधीच प्रेक्षकांना येतो. राहुल- रुबिनाची प्रसिद्धी आणि त्यांची घरातील भांडणं पाहता त्याच्यामध्येच हा शेवटचा सामना रंगणार हे सगळ्यांना माहीत होते. फिनाले राऊंडसाठी रुबिना, राहुल, अली, निकी, राखी यांची निवड झाली होती. त्यामुळे आता शेवटच्या तीनमध्ये कोण राहणार असा प्रश्न होता. अलीला मागे टाक निकीने पहिल्या तीनमध्ये आपली जागा निश्चित केली. तर राखीने पैशांची गरज पाहता आधीच 16 लाख घेऊन हा खेळ सोडला. सगळ्यात शेवटची दोन दावेदार होते ते म्हणजे राहुल-रुबिना ज्यामध्ये रुबिना जिंकण्याची शक्यता ही कलर्सच्या चॅनल पॉलिसीमुळे जास्त होती हे आधी पासूनच सांगितले जात होते आणि तसेच झाले. राहुलला मागे टाकत रुबिना या खेळाची विजेती झाली. त्यामुळे काही फॅन्स नाराज झाले. ट्रॉफी कोणाच्याही हाती लागली तरी या खेळाचा खरा विजेता हा राहुलच असल्याचे अनेकांचे मत आहे. हेच प्रेम राहुलने या खेळातून मिळवले आहे. 

काही मतांच्या फरकाने राहुल राहिला मागे

Instagram

राहुल वैद्य हा या खेळाचा खरा विजेता आहे असे घरातल्यांचेच नाही तर बाहेरुन खेळ पाहणाऱ्या अनेकांचे मत होते. राहुल पहिल्या दिवसापासून या घरात चर्चेचा विषय राहिला आहे.त्याची टास्क करण्याची पद्धत, वनलायन, त्याचे जोक्स हे अनेकांना आवडत होते. राहुलच्या आवाजाचे जितके चाहते आहेत. त्याहून अधिक जास्त चाहते त्याच्या माणुसकीमुळे झाले आहे. इंडियन आयडॉलपासून सुरु झालेला त्याचा प्रवास अनेकांना आतापर्यंत पाहिला आहे. पण आता या एका रिअॅलिटी शोमुळे त्याचे फॅन्स 1 मिलियनवर पोहोचले आहेत. याचा आनंद हा अधिक आहे. 

Bigg Boss 14 मधून राहुल वैद्य जाण्याची चर्चा, फॅन्सनी व्यक्त केली नाराजी

राहुलने मानले आभार

राहुल या खेळातून या आधी बाहेर पडला होता. त्यावेळी अनेकांना धक्का बसला. राहुल बाहेर आल्यानंतर त्याला पुन्हा एकदा या खेळामध्ये आणण्यासाठी सोशल मीडियावर धडपड सुरु होती आणि अखेर राहुल परत आला. तो परत आला, त्याने पाहिलं आणि त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली असंच म्हणायला हवं 

असा रंगा फिनाले सोहळा

कोरोनामुळे अनेक बंधन आल्यामुळे बिग बॉसचा हा सोहळाही अगदी काळजी घेत साजरा झाला. फिनालेमध्ये बरेच वेगवेगळे परफॉर्मन्स झाले. या दिमाखदार सोहळ्यात सगळ्या स्पर्धकांनी वेगवेगळे परफॉर्मन्स दिले. 

हा रिअॅलिटी सोहळा राहुल जिंकला नसला तरी राहुलने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत हे म्हणायला हवे.

Bigg Boss 14 : राहुल वैद्यने सोडला शो,फॅन्सनी व्यक्त केली नाराजी

Read More From बिग बॉस