बिग बॉस मराठीचा चौथा सीझन (Bigg Boss Marathi 4) लवकरच सुरू होणार आहे आणि काही दिवसांपूर्वीच याची नांदी करणारा 20 सेकंदाचा टीझर आला आहे. त्यामुळे आता या सीझनमध्ये मराठीतील कोणते कलाकार असणार? नवे चेहरे दिसणार की कोणते तगडे कलाकारही यावेळी सहभागी होणार या चर्चेला नक्कीच आता सुरूवात झाली आहे. मराठी बिग बॉसचे पहिले तिन्ही सीझन गाजले. मेघा धाडे (Megha Dhade), शिव ठाकरे (Shiv Thakare), विशाल निकम (Vishal Nikam) हे अनुक्रमे तिघे जण जिंकले आहेत आणि त्यामुळे आता यावर्षी कोणकोणते कलाकार येणार आणि हा सीझन गाजवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र यावर्षी अजूनही सूत्रसंचालक म्हणून महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनी हा प्रोमो शेअर केलेला नाही आणि त्यामुळे नक्की या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोण करणार याची चर्चाही सुरू झाली आहे.
तिन्ही सीझन गाजवले महेश मांजरेकरांनी
पहिल्या तिन्ही सीझनचे सूत्रसंचालन हे महेश मांजरेकर यांनीच केले. अचानक कॅन्सर झाल्याने त्यांची प्रकृती मध्यंतरी खराब झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा महेश मांजरेकरांनी कॅन्सरवर मात करत काम सुरू केले आहे. त्यामुळे हा सीझनही महेश मांजरेकर यांनीच करावा अशी चाहत्यांची इच्छा आहे. मात्र अजूनही महेश मांजरेकर यांनी आपल्या सोशल मीडियावरून याचा प्रोमो शेअर न केल्यामुळे त्यांचे चाहतेही गोंधळात आहेत. तर सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हा मागच्या सीझनमध्ये दिसल्यमुळे या सीझनचे सूत्रसंचालन त्याच्याकडे सोपविण्यात आल्याचेदेखील वृत्त सध्या पसरत आहे. मात्र यावर वाहिनी अथवा कोणाहीकडून माहिती मिळालेली नाही आणि त्यामुळेच सध्या बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. हिंदी असो वा मराठी दोन्ही बिग बॉस या कार्यक्रमाचा एक वेगळा फॅन फॉलोईंग आहे. तर हिंदी बिग बॉस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमान खान (Salman Khan) ज्याप्रमाणे करतो तसं कोणीच करू शकत नाही असं मानले जाते त्याचप्रमाणे मराठीसाठी महेश मांजरेकरच योग्य आहेत असंच अनेक जणांना वाटत आहे. त्यामुळे महेश मांजरेकरांकडून आता नक्की होकार का नकार काय येत आहे याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
चौथ्या पर्वात नक्की काय असणार वेगळेपण?
लवकरच महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘दे धक्का 2’ हा चित्रपट येत आहे आणि सध्या त्याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्यामुळेच त्यांनी हा प्रोमो शेअर केला नसावा असाही अंदाज बांधला जात आहे. तर काही जणांच्या मते केवळ तीन वर्षांचे कंत्राट असल्यामुळेच चौथ्या पर्वात महेश मांजरेकर सूत्रसंचालन सांभाळणार नाहीत असंही म्हटलं जात आहे. तर याशिवाय आता बिग बॉसच्या चौथ्या पर्वात नक्की कोणकोणते कलाकार सहभागी होणार आणि या पर्वामध्ये काय वेगळेपण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्या दोन पर्वांपेक्षाही तिसऱ्या पर्वात काहीच दम नव्हता असे अनेकांचे म्हणणे होते. त्यामुळे यावर्षी मराठी बिग बॉसमध्ये अनेक मोठी आणि वेगळी नावं असायला हवीत असंही अनेकांचं म्हणणं आहे. मात्र आता हा सीझन नक्की कोणत्या महिन्यात सुरू होणार आणि त्यात काय वेगळेपण असणार हे लवकरच कळेल. साधारणतः गणशोत्सवाच्या आसपास हे मराठी बिग बॉसचे (Bigg Boss Marathi) पर्व सुरू होत असते. त्यामुळे याच सुमारास हे नवे पर्व सुरू होईल असा अंदाज बांधला जात आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade