बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे खूप स्ट्रगल करून यशस्वी झाले आहेत. आज जरी ते प्रसिद्धीच्या शिखरावर असले तरी एकेकाळी त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रंचड मेहनत आणि त्याग करावा लागला होता. आज आपण अशा काही बॉलीवूड कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत. ज्यांनी अभिनयात करिअर करण्यासाठी हातातली नोकरीदेखील सोडायला मागेपुढे पाहिलं नाही. या कलाकारांनी त्यावेळी हा कठोर निर्णय घेतला म्हणूनच आज ते त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकले. जाणून घ्या अशा बॉलीवूड सेलिब्रेटींविषयी…
शाहरूख खान –
बॉलीवूडचा किंग खान शाहरूखही एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेला मुलगा आहे. दिल्लीत असताना तरूणपणीच त्याचे आईवडील त्याला सोडून देवाघरी गेले. शाहरूख अभ्यासात हुशार होता मात्र त्याला अभिनयात करिअर करायचे होते. तो मुंबईत आला आणि पोट भरण्यासाठी नोकरी करू लागला. संधी मिळतात नोकरी सोडून त्याने फिल्म इंडस्ट्री प्रवेश केला आणि त्याचे नशीबच पालटले
अक्षय कुमार –
अक्षय कुमारने त्याच्या अभिनय आणि चार्मिंग लुकने आज संपूर्ण चित्रपटसृष्टीला गारूड घातले आहे. मात्र पूर्वी त्याचे नाव राजीव भाटीया होते आणि तो अगदी सामान्य कुटुंबातील तरूण होता. तरूणपणी तो अगदी साधी नोकरी करत होता. ब्लॅक बेल्ट राजीव मार्शल आर्ट शिकवण्यासाठी मुंबईत आला आणि त्याला जणू यशाचा मार्गच मिळाला. कारण त्याचा एक विद्यार्थी फोटोग्राफर होता त्याने राजीवला मॉडलिंग करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दोनच महिन्यांमध्ये त्याला दीदार चित्रपटात मुख्य भूमिकेचे काम मिळालं आणि तो राजीवचा अक्षयकुमार झाला.
रजनीकांत –
साऊथचा सुपरस्टार रजनीकांत आज दाक्षिणात्य लोकांचा देवच झाले आहेत. मात्र त्यांची ही प्रतिमा पहिल्यापासून अशी मुळीच नव्हती. साऊथचा हा थलैवा पूर्वी फारच गरीब आणि एक साधी नोकरी करणारा सामान्य माणूस होता. चित्रपटात काम करण्यासाठी रजनीकांत यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि आज ते एक लोकप्रिय अभिनेते आहेत.
तापसी पन्नू –
तापसी पन्नूने कंम्युटर सायन्समध्ये इंजिनियअरींग केलेलं आहे. ती एक सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करत होती. मात्र तीने योगायोगाने एका वाहिनीसाठी ऑडिशन दिलं आणि ती चक्क अभिनेत्री झाली.
आयुषमान खुराना –
आयुषमान खुराना धडाधडा लागोपाठ एकावर एक हिट चित्रपट देत आहे. मात्र आयुषमानने मास कम्युनिकेशनमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. त्याने त्यानंतर काही वर्षे थिअटरमध्ये काम केलं होतं. शिवाय त्याने रेडिओवर आरजे आणि नंतर चॅनेलसाठी व्हिजेची नोकरीही केलेली आहे. त्याला विकी डोनर हा चित्रपट मिळाला आणि तो सुपरहिरो झाला.
विकी कौशल –
विकी कौशलने इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलि कम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरींग केलेलं आहे. त्याला त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यावर कॅम्पस इंटरव्हू मध्येच चांगली नोकरी मिळाली होती. मात्र अभिनय करण्यासाठी त्याने ही ऑफर नाकारली. मात्र त्याच्या या निर्णयामुळेच बॉलीवूडला एक सुपरहिरो मिळाला.
रणवीर सिंग –
रणवीरला लहानपणापासून हिरोच व्हायचं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने काही वर्ष मोठमोठ्या अॅड एजन्सीसाठी कॉपी राईटरची नोकरी केली होती. मात्र त्याला यश राज फिल्मचा बॅंड बाजा बारात मिळाला आणि तो अभिनयक्षेत्रात आला.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
संगीतप्रेमींसाठी मेजवानी, लता मंगेशकर मराठी गाणी (Lata Mangeshkar Marathi Songs)
शकुंतला देवी नंतर आता ‘शेरनी’ व्हायचं आहे विद्या बालनला, लवकरच सुरू होणार शूटिंग
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje