बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा भारदस्तत आवाज ऐकणे म्हणजे चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. अमिताभ बच्चन यांच्या अभिनय आणि दमदार आवाजाचे चाहते आजही अनेक आहेत. आता बिग बीच्या चाहत्यांना त्यांचा हा दमदार आवाज ऐकण्यासाठी अभिताभ बच्चन यांचा एखादा चित्रपट अथवा केबीसी पाहत बसण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या घरात सतत हा आवाज ऐकू शकता. कारण आता हा आवाज तुमच्या घरातील Amazon Alexa मध्येही ऐकू येणार आहे.
अॅलेक्सामधून असं करणार बिग बी सर्वांचं मनोरंजन
अमिताभ बच्चन यांच्यासोबत अॅमेझॉनने एक करार केला आहे. अॅमेझॉन आणि अमिताभ बच्चन यांच्या या करारानुसार तुम्हाला Amazon Alexa डिवाईसवर आता अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकू येणार आहे. याचा अर्थ अमिताभ बच्चन यांचा आवाज अॅमेझॉनच्या डिजिटल वॉईस असिस्टंट सेवेसाठी वापरला जाणार आहे. तुम्ही तुमच्या घरी जेव्हा जेव्हा अॅलेक्साला एकादा प्रश्न विचाराल तेव्हा तेव्हा त्याची उत्तरे तुम्हाला चक्क अमिताभ बच्चन यांच्या आवाजात ऐकू येणार आहेत. या डिव्हाईसवर भारतीय सेलिब्रेटीचा आवाज असण्याची ही पहिलीच वेळ आहे.याची सुरूवात अमिताभ बच्चन यांच्या बुलंद आवाजाने होत आहे यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट काय असेल या डिव्हाईसचं नावंही बच्चन अॅलेक्सा असंच असणार आहे. एवढंच नाही तर यामाध्यमातून अमिताभ बच्चन प्रेक्षकांना जोक्स, हवामानाचा अंदाज, शायरी, कविता आणि अनेक सल्लेही देणार आहेत. ज्यामुळे बिग बींच्या चाहत्यांचं घरातच निखळ मनोरंजन होणार आहे. या नव्या डिव्हाइसचं उत्पादन पुढील वर्षीपासून केलं जाईल. या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना एक ठराविक किंमत नक्कीच मोजावी लागेल. अमिताभ बच्चन त्याच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अपडेट स्वतःच शेअर करत असतात. याबाबत अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं आहे की, “आधूनिक तंत्रज्ञानाने मला नेहमीच नवीन गोष्टींसोबत जोडलं जाण्याची संधी दिली आहे. मग तो एखादा चित्रपट असो, टिव्ही शो असो किंवा पॉडकास्ट किंवा मग दुसरं काही. मी या नव्या तांत्रिक सुविधेसाठी माझा आवाज देण्यास नक्कीच उत्सुक आहे. या टेकनिकद्वारा मी माझ्या देशातील लोकांशी आणखी जवळ जाऊ शकतो”
अमिताभ बच्चन यांचा उत्साह लाजवाब!
अमिताभ बच्चन आता जवळजवळ 77 वर्षांचे झाले आहेत. मात्र आजही या वयात ते तरूणांना लाजवेल अशा उत्साहात काम करत असतात. कोरोनाच्या काळात आजारी पडल्यामुळे त्यांच्या तब्येतीची चिंता सर्वांनाच वाटू लागली होती. मात्र त्यांनी प्रयत्नांची शर्य करत कोरोनावर मात केली. या वयातही ते न थकता अनेक चित्रपट, टिव्ही शोज. जाहिरातींमध्ये काम करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी केबीसीच्या नवीन पर्वाचं शूटिंग सुरू केलं आहे. ज्यामुळे टिव्हीवर अमिताभ बच्चन यांना प्रत्यक्ष पाहता येणार आहे.आता या सर्व गोष्टींच्या पुढे जात एका नव्या आधुनिक क्षेत्रात ते आपली पावले दमदारपणे रोवत आहेत. त्यामुळे अॅलेक्साच्या माध्यमातून आता प्रत्येकाच्या घरी अमिताभ बच्चन यांचा दमदार आवाज घुमणार आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
‘व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘या’ मराठी चित्रपटाला पुरस्कार
‘बिटरस्वीट’ चित्रपट बुसान आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखल
अक्षय कुमारने ‘या’ चित्रपटांमध्ये साकारला आहे अफलातून खलनायक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje