आरोग्य

दिवसभर राहायचं असेल फ्रेश तर असा करा नाश्ता

Trupti Paradkar  |  Feb 1, 2022
दिवसभर राहायचं असेल फ्रेश तर असा करा नाश्ता

निरोगी राहण्यासाठी तुमचा आहार संतुलित आणि पोषक असणं खूप गरजेचं आहे. यासाठी सकाळचा नाश्ता खूप महत्त्वाचा असतो. कारण तुम्ही रात्री जेवल्यानंतर खूप तासांनंतर काही तरी खात असता. म्हणून सकाळी वेळेत नाश्ता करणं जितकं गरजेचं आहे तितकंच तुम्ही नाश्ता काय करता हे ठरवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला सकाळी उठल्यावर थकल्यासारखं वाटत असेल, दिवसभर थकवा जाणवत असेल तर सकाळच्या नाश्त्यामध्ये या गोष्टींचा समावेश अवश्य करा.

झटपट नाश्ता रेसिपी मराठी भाषेत, तुमच्यासाठी खास (Easy Breakfast Recipes In Marathi)

असा कराल सकाळचा नाश्ता तर दिवसभर वाटेल फ्रेश

दररोज सकाळी तुमच्या नाश्त्यामध्ये प्रोटीन्स, फायबर्स, फॉलेट, कार्बोहायड्रेट आणि फॅटचा समावेश असायला हवा. यासाठी या पदार्थांचा करा समावेश.

फळं 

Breakfast Foods to Boost Your Energy in Marathi

सकाळच्या नाश्त्यामध्ये फळं आवर्जून असायला हवीत.  कारण केळी, सर्व प्रकारच्या बेरीज, सफरचंद, संत्री, पपई अशा फळांमधून तुमच्या शरीराला पुरेशी शक्ती मिळते. शिवाय फळांमध्ये फायबर्स, नैसर्गिक साखर, व्हिटॅमिन्स, अॅंटि ऑस्किडंट्स पुरेशा प्रमाणात असतात. जेव्हा तुम्ही सकाळी फळं खाता तेव्हा या सर्व पोषक गोष्टी शरीरात जातात. ऑफिसला जाण्याची घाई असेल तर आधीच फळांचा रस तयार करून ठेवा आणि नाश्त्या करताना हे फळांचे ज्युस जरूर प्या.

सुकामेवा 

फळांप्रमाणेच तुमच्या नाश्त्यामध्ये सुक्यामेव्याचा समावेश असायलाच हवा. कारण बदाम, काळ्या मनुका, अक्रोड, अंजीरमधून तुमच्या शरीराला पुरेसे प्रोटीन्स, हेल्दी फॅट्स, अॅंटि ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, अमिनो अॅसिड मिळत असतात. सुकामेवा हे एक प्रकारचे सूपरफूड आहे. त्यामुळे दिवसाची सुरूवात सुकामेव्याने करणं नक्कीच फायद्याचं ठरू शकतं.  सुकामेवा तुमच्या शरीरासाठी चांगला असतोच शिवाय यामुळे तुमची स्मरणशक्ती सुधारते. तसंच वाचा  निरोगी जीवनशैलीसाठी ‘व्हिटॅमिन बी 6’ आहे गरजेचं (Benefits of Vitamin B6 In Marathi)

अंडी 

Breakfast Foods to Boost Your Energy in Marathi

सकाळचा नाश्ता परिपूर्ण करण्यासाठी तुमच्या नाश्त्यामध्ये अंड्याचा समावेश जरूर करा. कारण अंड्यामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात. नाश्ता करताना तुम्ही उकडून, ऑमलेट करून, स्कम्बल करून, भाज्यांसोबत शिजवून अंड खाऊ शकता. विविध प्रकारे अंडे खाता येत असल्यामुळे नाश्त्यासाठी काय करायचं हा प्रश्न तुम्हाला पडत नाही. शिवाय यामुळे तुम्ही दिवसभर टवटवीत राहता.

दूध, दही, चीज अथवा पनीर

दूध आणि दुधापासून तयार करण्यात आलेले पदार्थ नाश्त्यामध्ये असणं तितकंच गरजेचं आहे. कारण दूधातून तुमच्या शरीराला पुरेसे प्रोटीन्स आणि कॅल्शियम मिळतं. दही अथवा योगर्टच्या मदतीने तुम्ही नाश्त्यामध्ये विविध प्रकार बनवू शकता. चीज आणि पनीरचा वापर केल्यामुळे तुमचा नाश्ता हेल्दी आणि टेस्टी होतो. सर्व प्रकारचे पोषक घटक मिळाल्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही आणि दिवसभर पोट भरल्यासारखं वाटतं. ज्यामुळे तुम्ही नको ते पदार्थ जास्त प्रमाणात खात नाही. पनीरपासून काय बनवावं हा प्रश्न पडला असेल तर बनवा हे चमचमीत पदार्थ पनीर रेसिपी मराठीमध्ये (Paneer Recipes In Marathi)

Read More From आरोग्य