बॉलीवूड

गानसम्राज्ञी लता मंगेशकर अजूनही हॉस्पिटलाईज्ड

Aaditi Datar  |  Nov 12, 2019
गानसम्राज्ञी लता मंगेशकर अजूनही हॉस्पिटलाईज्ड

लता मंगेशकर यांना सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याची तब्येत स्थिर असल्याची बातमी आली होती. त्यांच्या टीमकडून सांगण्यात आलं होत की, व्हायरल चेस्ट कंजेशनमुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. ज्यामुळे रविवारी रात्री उशिरा त्यांना हॉस्पिटलाईज्ड करण्यात आलं. आता बॉलीवूडची ड्रीमगर्ल हेमामालिनी हिने त्यांच्याबद्दल केलेल्या ट्वीटने त्या क्रिटीकल असल्याचं कळत आहे.  

आधी डिस्चार्ज मग पुन्हा क्रिटीकल

खरंतर आधी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची तब्येत स्थिर असून त्यांना घरी पाठवण्यात आलं असं कळत होतं. पण सूत्रानुसार पुन्हा एकदा त्यांची तब्येत क्रिटीकल असून त्या व्हेंटीलेटरवर असल्याचं कळतंय. त्यामुळे त्या अजूनही हॉस्पिटलाईज्ड आहेत. एका वेबसाईटला लताजींची बहीण आणि गायिका उषा मंगेशकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, ‘लताजींना अजून एक-दोन दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येणार आहे. लता दीदी आता 90 वर्षांच्या आहेत. त्या आता बऱ्या आहेत. आम्ही त्यांना घरीही नेऊ शकतो पण त्यांचं वय बघता त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कारण या वयात घरी त्यांचा उपचार करणं योग्य ठरणार नाही.’ पण त्यांनी मात्र क्रिटीकल असल्याचा उल्लेख केलेला आढळत नाही.

ड्रीमग्रर्लने केलं लताजींच्या तब्येतीबद्दल ट्वीट

हेमामालिनी मात्र ट्वीट करत लताजींची तब्येत लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली आहे. हेमामालिनी यांनी लिहीलं आहे की, लता मंगेशकर यांच्यासाठी प्रार्थना. ज्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे आणि बातमी आहे की, त्यांची तब्येत गंभीर आहे. देव त्यांना लवकरच या संकटातून बाहेर काढून त्या आपल्यासोबत कायम राहोत. देशाचं भारतरत्न, भारताची गानकोकिळा लताजींसाठी मी प्रार्थना करते.

गायक अदनान सामीनेही त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी ट्वीट केलं आहे. 

28 सप्टेंबरला लताजींनी त्यांचा 90 वा वाढदिवस साजरा केला होता. लताजींनी आजपर्यंत त्यांच्या यशस्वी कारकिर्दीत जवळपास एक हजारपेक्षा अधिक हिंदी गाणी गायली आहेत. 2001 साली त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. या सोबतच त्यांना सन्मानीय दादासाहेब फाळके पुरस्कार, तीन नॅशनल अवॉर्ड्स आणि अजूनही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी तब्बल 36 भारतीय भाषांमध्ये गाणी गायली आहेत. Get Well Soon Lataji 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

हेही वाचा –

देशाला तुझी अजूनही गरज आहे धोनी… निवृत्तीचा विचार सोडून दे : लता मंगेशकर

मराठीतील बहारदार लावण्या

’माँ की रसोई’च्या निमित्ताने एकत्र आले दिग्गज

Read More From बॉलीवूड