खूप जणांना उन्हाळ्यात सतत काहीतरी थंड प्यावेसे वाटते. काही जणांची तहान ही कोल्डड्रिंकनेच भागते. दुकानात जाऊन मोठी कोल्ड ड्रिंक्सची बॉटल घेऊन काही जण सतत पित राहतात. बाजारात वेगवेगळ्या ब्रँडचे कोल्ड ड्रिंक्स मिळतात. कोल्डड्रिंक्स हे फक्त तेवढ्या पुरते प्यायले तर ठीक किंवा त्याचे प्रमाण योग्य असायला हवे. सतत असे सोडा असलेले कोल्डड्रिंक पित असाल तर तुम्हाला त्याचे नुकसान होऊ शकते. आरोग्यासाठी हे कसे त्रासदायक आहेत ते आता आपण जाणून घेऊया.
कोल्डड्रिंक्समध्ये काय असते?
कोल्डड्रिंक्समध्ये स्विटनर, कार्बोहायड्रेट, कार्बन डायऑक्साईड, कलरिंग, फ्लेवरिंग आणि केमिकल प्रिझरव्हेटिव्हज असतात. याशिवाय चवीनुसार त्यामध्ये अनेक वेगळे घटक घातले जातात. ज्यामुळे त्याची चव वाढत असते. कोल्ड ड्रिंक्स प्यायल्यानंतर ओठ चुरचुरल्यासारखे होते. त्यामुळे एक वेगळाच थंडावा मिळण्यास मदत मिळते.
कोल्डड्रिंक्स पिण्याचे तोटे
कोल्डड्रिंक्समध्ये असलेले काही घटक हे आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. कोल्डड्रिंक्स सतत पित असाल तर तुम्हाला त्याचे तोटे देखील माहीत असायला हवेत.
- कोल्डड्रिंक्समध्ये मोठ्या प्रमाणात साखर असते ही साखर तुमचे वजन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरु शकते. जर तुम्हाला वजन वाढू द्यायचे नसेल तर तुम्ही कोल्डड्रिंक्स पिण्याचे प्रमाण कमी करायला हवे.
- दातांच्या आरोग्यासाठीही कोल्डड्रिंक्स अजिबात चांगले नाही. दातांना सतत साखर लागत राहिली की, त्यामुळे दात किडण्याची शक्यता असते. दातांचा रंगही सतत कोल्डड्रिंक्स पिण्यामुळे बदलू शकतो. दातांवर प्लाक म्हणजेच पिवळा थर साचण्यासाठीही कोल्डड्रिंक्स कारणीभूत ठरतात
- त्वचा ज्यांच्यासाठी फारच महत्वाची आहे. अशांनी कोल्डड्रिंक्सचे सेवन अजिबात करु नये. कोल्ड ड्रिंक्स अति प्रमाणात प्यायल्यामुळे त्वचा कोरडी पडत जाते. अशी त्वचा कालांतराने निस्तेज दिसते. चांगली आणि चिरतरुण त्वचा हवी असेल तर कोल्डड्रिंक्सचा मारा हा कमी करायला हवा.
- कोल्डड्रिंक्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात युरिया (URIA ACID) असते. जे हाडांसाठी चांगले नसते. त्यामुळे सांधेदुखी आणि जळजळ याचा त्रास होण्याची शक्यता असते.
- शरीराला काही चांगल्या न्युट्रिएटंसची गरज असते. प्रोटीन, मिनरल्स आणि फायबर हे शरीराला आवश्यक असे घटक आहेत. ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते. पण सोडा किंवा कोल्डड्रिंक्समध्ये याचा अभाव असतो. ज्यामुळे आपल्याला साखरेशिवाय काहीही मिळत नाही.
- ज्यांना साखरेचा त्रास आहे अशांनी तर मुळात कधीही कोल्डड्रिंक्सचे अतिसेवन करु नये. कारण यामुळे तुम्हाला साखरेचा त्रास अधिक होण्याची शक्यता असते.
आता कोणतेही कोल्डड्रिंक्स पिताना तुम्ही 10 वेळा तरी त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करायला हवा.