DIY सौंदर्य

कंडिशनरमुळे गळतात का केस, जाणून घ्या काय आहे तथ्य

Trupti Paradkar  |  Dec 3, 2021
conditioner is good or bad for hair in marathi

केस चमकदार आणि मुलायम असावे असं प्रत्येकाला वाटत असतं. पण त्यासाठी केसांची योग्य काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. केसांना शॅम्पू केल्यावर केस मऊ राहण्यासाठी केसांना कंडिशनर लावण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे तुमचे केस लगेच मऊ आणि चमकदार दिसू लागतात. मात्र असं सतत केसांना कंडिशनर लावणं योग्य आहे की अयोग्य याबाबत अनेक मतं दिसून येतात. काहींना वाटतं की केसांना कंडिशनर लावण्यामुळे केस मोठ्या प्रमाणावर गळतात. यासाठीच जाणून घ्या मागील तथ्य

केस सिल्की करण्यासाठी घरगुती उपाय (Silky Hair Tips In Marathi)

कंडिशनर लावण्यामुळे गळतात का केस ?

केसांच्या पोषणासाठी केसांना योग्य प्रमाणात कंडिशनर लावण्याची गरज असते. कारण शॅम्पू केल्यावर केस कोरडे आणि निस्तेज होतात. अशा वेळी केस पुन्हा मुलायम होण्यासाठी केसांना योग्य पोषणाची गरज असते. जी कंडिशनरमुळे पूर्ण होते मात्र कंडिशनर तुम्ही किती प्रमाणात आणि कसं लावता हे खूप महत्त्वाचे आहे. केसांना कंडिशनर लावण्यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो, केसांचा गुंता होत नाही,केसांची चमक वाढते, केसांचे पोषण होते आणि केस गळणेही कमी होते. यासाठीच जाणून घ्या केसांना कंडिशनर कसं लावावं

conditioner is good or bad for hair in marathi

केसगळती थांबवण्यासाठी उत्तम हेअर कंडिशनर (Best Anti Hair Fall Conditioner)

केसांना कंडिशनर लावण्याची योग्य पद्धत

जर केसांना योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने कंडिशनर लावलं तर केस मुळीच गळत अथवा खराब होत नाही. केस धुतल्यावर आधी केसांमधील पाणी स्वच्छ करावे. हाताने तुम्ही केसांमधील पाणी निथळू शकता. त्यानंतर केस कंगव्याने विंचरून घ्यावे, केस मोकळे केल्यावर केसांच्या मध्यापासून टोकापर्यंत कंडिशनर लावावे, अगदी थोडे कंडिशनर हातावर घेऊन ते पाणी घालून थोडे डायल्यूट करावे आणि मगत केसांना लावावे. त्यानंतर पाच ते दहा मिनीटांनी केस पुन्हा साध्या पाण्याने स्वच्छ करावे आणि त्यानंतर केसांना शॅम्पू लावू नये. जर तुमचे केस खूपच पातळ असतील तर तुम्ही केसांना कंडिशनर करण्यासाठी घरगुती उपायदेखील करू शकता. लिंबू, दही, दूध, कोरफड केसांसाठी उत्तम नैसर्गिक कंडिशनर आहेत. 

घरी स्वतःच तयार करा तुमच्या केसांसाठी कंडिशनर (Homemade Hair Conditioner In Marathi)

Read More From DIY सौंदर्य