आपण बरेचदा अनेक लोकांंच्या तोंडून ऐकतो की, ‘अक्कलदाढ आली ना की तुला अक्कल येईल’. पण खरंच अक्कलदाढ आणि अक्कल याचा काही संबंध आहे का? आपल्यापैकी प्रत्येकाला हा प्रश्न नक्कीच एकदा कधीना कधीतरी डोक्यात आलाच असणार. पण याचं उत्तर तुम्हाला मिळालं आहे का? खरं अक्कलदाढ ही जबड्याच्या शेवटच्या जागी येते. ही अक्कलदाढ खूपच उशीरा येते. अगदी दात येण्याच्या वयात नाही तर साधारण विशीनंतर कधीही तुम्हाला अक्कलदाढ येण्याची लक्षणे जाणवू लागतात. उशीरात उशीरा कधीही ही दाढ येऊ शकते. त्याबाबत अजूनही संशोधन चालू आहे. पण साधारण वयाच्या 18-30 दरम्यान अक्कलदाढ येते आणि ही दाढ येत असताना प्रचंड वेदनाही होतात. प्रत्येकाच्या शरीराप्रमाणे याचे वेगवेगळे परिणाम असतात.
तुमच्या दातांच्या सौंदर्याचा विचार करणेही तितकेच गरजेचे
अक्कलदाढ आणि वयाचा काय संबंध
Freepik.com
आपल्याकडे साधारण कोणतीही व्यक्ती 18 वयाची झाली की ती प्रौढ झाली असं म्हटलं जातं. त्यामुळे वयानुसार त्या व्यक्तीमध्ये अधिक अक्कल, समंजसपणा आणि गोष्टी समजण्याची, जबाबदारी घेण्याची कुवत आली असं समजण्यात येतं. पण अर्थातच हे माणसापरत्वे बदलते. पण अकलेचा आणि अक्कलदाढेचा मात्र काहीही संबंध नाही. पण वयाच्या अठराव्या वर्षानंतर ही दाढ येत असल्याने त्याचा संबंध सहसा जोडला जातो. अक्कलदाढ येण्याचा आणि वय वाढण्याचा काहीही संबंध नाही. काही व्यक्ती या अनुभवावरून वयाच्या आधीच मोठ्या होतात. तर काही व्यक्ती या कितीही वय वाढलं आणि अगदी अक्कलदाढ आली तरीही योग्य वागतातच असं नाही. त्यामुळे वैज्ञानिकदृष्ट्या खरं तर या दोन्ही गोष्टींचा काहीही संबंध नाही. मात्र केवळ वयानुरूप याचा संबंध मोठ्या माणसांकडून पूर्वपरंपरागत लावण्यात आल्यामुळे सहज अक्कलदाढेबाबत वक्तव्य करण्यात येते. लहानपणापासून आपणही हेच ऐकत आल्याने आपल्याही एखादवेळेस अक्कलदाढ आणि अकलेचा काहीतरी संबंध असावा असे वाटून जाते. मात्र यात काहीही तथ्य नाही.
अक्कल दाढ येतेय, ही आहेत अक्कल दाढ येण्याची लक्षणे
अक्कलदाढ काढली तर अक्कल जाते का
बऱ्याचदा डॉक्टरांनाही असा प्रश्न विचारण्यात येते की, अक्कलदाढेने त्रास होत असेल तर अक्कलदाढ काढल्यावर अक्कल निघून जाते का किंवा डोक्यावर काही परिणाम होतो का? पण असे काहीही नाही. जसेच अक्कलदाढ आल्यावरच अक्कल येते असं नाही तसं अक्कलदाढ काढल्यावर अक्कल जाते असंही नाही. पण बऱ्याचदा अक्कलदाढ आणि मेंदूच्या शिरेचा काही माणसांमध्ये संबंध असतो. त्यामुळे त्या शिरेवर परिणाम होत असेल तर डॉक्टर अक्कलदाढ न काढण्याचा सल्ला देतात. त्यामुळे आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागणे अतिशय उत्तम. तसंच तुम्हाला कोणतेही अक्कलदाढेसंदर्भात प्रश्न असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून अथवा ज्याला खरंच अक्कल आहे अशा व्यक्तींकडून नक्कीच त्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. तसंच तुमच्या पुढच्या पिढीला मात्र याचा काहीही संबंध नाही हे तुम्ही छातीठोकपणे सांगू शकता. इंग्रजीमध्ये या दाढेला विसडम टूथ (wisdom tooth) असे म्हणतात आणि त्याचा अर्थ मराठीत अक्कल होतो त्यामुळेच त्याला अक्कलदाढ असं म्हटलं गेलं आहे. त्यामुळे आता यापुढे अक्कलदाढ आणि अक्कल याचा काहीही संबंध नाही हे मात्र नक्की लक्षात ठेवा.
अक्कल दाढ दुखीवर उपाय (Home Remedies For Wisdom Tooth Pain In Marathi)
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade