शाकाहार हा निरोगी जीवनासाठी एक उत्तम आणि पोषक आहार आहे. कारण शाकाहारामध्ये माणसाच्या शरीराला लागणाऱ्या सर्व गरजा पूर्ण करण्याचे सामर्थ्य आहे. म्हणूनच आजकाल अनेकांनी शाकाहारी आणि विगन ही जीवनशैली आत्मसात केली आहे. अनेक लोकांचे असे मत असते की, शाकाहारी जेवण म्हणजे फक्त सॅलड्स आणि सूपच असू शकते. पण हे खरं नाही. कारण शाकाहारी जेवण हे त्यांच्या वैविध्यपूर्णतेने नक्कीच समृद्ध आहे. विविध प्रकारच्या ग्रेव्हीज, रॅप्स, बर्गर्स आणि टॅकोजपर्यंत त्यात अनेक पर्याय उपलब्ध असतात. 1 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक शाकाहार दिवस’ म्हणून साजरा केला जातो. आजचा हा खास दिवस साजरा करण्यासाठी काही स्पेशल आणि पौष्टिक व्हेज रेसिपीज आपच्यासोबत शेअर केल्या आहेत शेफ नेहा दीपक शाह यांनी…या रेसिपीजची खासियत ही आहे की या प्रत्येक रेसिपीमध्ये कॅलिफोर्निया अक्रोडचा वापर करण्यात आला आहे.
बीटरूट डंप्लिंग्स ( शेफ नेहा दीपक शाह)
साहित्य –
- बीटरूट रॅपरसाठी
- 3/4 कप मैदा
- मीठ
- 1/4 कप पाणी
- 2 टेबलस्पून भाजलेल्या बीटरूटची प्युरी
- 1 टीस्पून व्हिनेगर
- फिलिंगसाठी लागणारे साहित्य –
- 1 कप कुस्करलेले पनीर
- 1/2 कप बारीक कापलेले कॅलिफोर्निया अक्रोड
- 1/4 बारीक चिरलेले कांदे
- 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
- 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची
- 1/4 टीस्पून किसलेले आले
- मीठ
- काळी मिरी
कृती –
1. पाणी, मीठ, बीटरूटची प्युरी आणि व्हिनेगर उकळा. उकळायला सुरूवात झाल्यावर त्यात पीठ घाला.
2. हे सर्व मिश्रण 30 सेकंद शिजवा आणि त्यानंतर काऊंटरवर घ्या. ते गरम असतानाच नीट मळून घ्या. 20 मिनिटे ठेवा आणि त्यानंतर मऊ कापडाने झाकून ठेवा.
3. त्याचे 10 ग्रॅम-12 ग्रॅम भागांत विभाजन करा आण त्यानुसार वापरा.
4. डंपलिंग्सना आतल्या सारणाने आकार द्या आणि साधारण 10-12 मिनिटे वाफवा.
5. गरमा गरम सर्व्ह करा!
अक्रोड, लसूण आणि हर्ब चीज लॉग ( शेफ नेहा दीपक शाह)
साहित्य –
- 500 ग्रॅम ताजे क्रीम
- 1/2 टीस्पून क्रिस्पी लसूण
- 1/2 टीस्पून चिली फ्लेक्स
- 1/4 टीस्पून मीठ
- 1 टेबलस्पून बारीक चिरलेली पार्सली
- 1 टेबलस्पून बारीक चिरलेला पातीचा कांदा
- 1 टीस्पून ताजी थाइम (पर्यायी)
- बारीक केलेले काळे मिरे आणि पिंक सॉल्ट
- 1/4 कप बारीक चिरलेले कॅलिफोर्निया अक्रोड
- 1/2 टीस्पून चिली फ्लेक्स
- 1/2 टीस्पून पार्सली
कृती-
1. क्रीमला कमी आचेवर शिजू द्या आणि सतत हलवत राहा (उकळण्यापूर्वी)
2. यात व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण ओता आणि हळू हलवत राहा. त्याचे गोळे होऊ लागतील. (पनीरसारखे ते दिसणार नाही, मिश्रण घट्ट होईल)
3. हे सर्व गाळणीवर मऊ कापडावर ओता आणि 20-25 मिनिटे बाजूला ठेवा.
4. बरेचसे पाणी निघून जाईल आणि या टप्प्यावर त्याला झाकून होते तसे फ्रीजमध्ये एक तास ठेवा आणि तुम्हाला ते आहे तसेच साठवायचे असेल तर ते हवाबंद झाकणाच्या डब्यात ठेवा आणि ३ दिवसांपर्यंत ते राहील.
5. चव वाढवण्यासाठी- लसूण, हर्ब्स, मीठ घाला आणि सीझन करा.
6. एका क्लिंग रॅपमध्ये रोल करा आणि आवरणापूर्वी साधारण 20 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा.
7. आवरणासाठी बारीक केलेले अक्रोड, हर्ब्स, चिली फ्लेक्स मिक्स करा आणि यावर फ्लेवर्ड चीजचा तुकडा गुंडाळा आणि आवश्यकतेनुसार वापरा.
थाई व्हेजिटेबल करी ( शेफ नेहा दीपक शाह)
साहित्य-
- कॅलिफोर्निया वॉलनट क्रीम
- 3/4 कप कॅलिफोर्निया अक्रोड
- 6 टेबलस्पून पाणी
- 3 टेबलस्पून व्हेजिटेबल ऑइल
- 2 गाजर, सोलून आणि तिरके 1/4- इंच जाड कापून.
- 1 लाल कांदा, अर्धा चिरून आणि 1/4-इंच जाड कापून
- 1 मध्यम लाल सिमला मिरची
- 1 मध्यम पिवळी सिमला मिरची, चार भाग करून आणि 1/4- इंच जाड कापून. 1 टेबलस्पून किसलेले ताजे आले.
- 3 लसूण पाकळ्या किसलेल्या
- 3/4 कप नारळाचे दूध
- 1/2 कप भाज्यांचे पाणी किंवा ब्रोथ
- 1/4 कप टोमॅटो पेस्ट
- 2 1/2 टेबलस्पून थाई रेड करी पेस्ट
- 1 1/2 टेबलस्पून सोया सॉस 1 टीस्पून राइस व्हिनेगर
- 3 कप छोटा पालक
- 1 कप काळा तांदूळ, पॅकेजमधील सूचनांनुसार शिजवलेला
- 1/4 कप भाजून कापलेले कॅलिफोर्निया अक्रोड ताजे सिलांत्रो पाने, छोटी थाई बेसिल पाने, ताजे लिंबाचे तुकडे
कृती –
1. वॉलनट क्रीम बनवण्यासाठी अक्रोडांची आणि पाण्याची एका छोट्या ब्लेंडरमध्ये किंवा फूड प्रोसेसरमध्ये हलकीफुलकी होईपर्यंत पेस्ट करा.
2. व्हेजिटेबल करी बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात मध्यम आचेवर तेल गरम करा. गाजर आणि कांदे घाला आणि १० मिनिटे शिजवून मऊ करा, अधूनमधून हलवा. बेल पेपर्स घाला आणि २ ते ३ मिनिटे किंवा क्रिस्पी-मऊ होईपर्यंत शिजवा. त्यात आले आणि लसूण घाला आणि आणखी १ मिनिट शिजवा.
3. नारळाचे दूध, भाज्यांचे पाणी, टोमॅटो पेस्ट, लाल करी पेस्ट, सोया सॉस आणि व्हिनेगर घाला. आणखी ३ मिनिटे शिजवा. वॉलनट क्रीम व पालक घाला आणि पालक थोडा मऊ होईपर्यंत शिजवा.
4. गरम शिजवलेल्या भातासोबत वाढा आणि अक्रोड, सिलांत्रो, थाई बेसिल आणि लिंबाच्या फोडींसोबत सजवा.
फोटोसौजन्य – शेफ नेहा दीपक शाह
अधिक वाचा –
मिश्र डाळींपासून बनवा या हेल्दी रेसिपीज
रताळ्यापासून तयार केलेल्या या रेसिपीज जरूर ट्राय करा
बीटपासून तयार करा या लज्जतदार आणि पौष्टिक रेसिपीज