आरोग्य

कोरोना झाल्यावर किती दिवस असतात शरीरात अॅंटि बॉडीज

Trupti Paradkar  |  May 19, 2021
कोरोना झाल्यावर किती दिवस असतात शरीरात अॅंटि बॉडीज

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरात भीतीचं वातावरण आहे. कोरोनापासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे देशातील सर्वांचे कोरोना लसीकरण होणे. मात्र सध्या कोरोना लसीकरण होण्यासाठी थोडा काळ नक्कीच जाणार आहे. त्यामुळे त्यासाठी प्रयत्न करत राहणं हाच एक उपाय आपल्या हातात आहे. शिवाय एकदा कोरोना झालेल्या लोकांना पुन्हा पुन्हा कोरोना होताना आढळून आलं आहे.  जे लोक कोरोना संक्रमित झाले आहेत ते बरे झाल्यावर काही काळ मात्र त्यांच्या रक्तात कोरोना अॅंटि बॉडीज तयार झालेल्या असतात. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे संक्रमण जगभरात सुरु असल्यामुळे यावर मोठ्या प्रमाणावर संशोधन केलं जात आहे. काही संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार जाणून घेऊ या कोरोना संक्रमणातून बऱ्या झालेल्या व्यक्तीमध्ये नेमके किती दिवस अॅंटि बॉडीज असू शकतात. ज्यामुळे त्या काळापुरतं तरी त्यांना कोरोना परत होण्याचा धोका टाळता येऊ शकतो.

किती दिवस असतात कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांच्या अॅंटि बॉडीज

जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोरोनाचे संक्रमण होते तेव्हा त्याच्या रक्तात कोरोना व्हायरसला विरोध करणारे अॅंटि बॉडीज नैसर्गिक पद्धतीने तयार होतात. कोरोनातून बरं झाल्यावर काही महिने अॅटि बॉडीज अॅक्टिव्ह असतात. ज्यामुळे त्याच्या शरीरात अॅंटि बॉडीज असेपर्यंत ती व्यक्ती पुन्हा संक्रमित होण्याची अथवा कोरोना पॉझिटिव्ह होण्याची शक्यता कमी होते.   याबाबत करण्यात आलेल्या संशोधनाला नेचर कम्युनिकेशन्स सायंटिफिक जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.

जाणून घ्या काळी बुरशी म्हणजे काय आणि काय आहेत म्युकरमायकोसिस ची लक्षणे

काय सांगतं कोरोनाबाबत केलेलं हे संशोधन

कोरोना झाल्यावर तयार होणाऱ्या अॅंटि बॉडीजबाबत करण्यात आलेल्या संशोधनानुसार कोरोनरी हिलिंगनंतर जवळजवळ आठ महिने अॅंटि कोरोना अॅंटि बॉडीड रूग्णाच्या रक्तात असतात. जोपर्यंत शरीरात या अॅंटि बॉडीज आहे तोपर्यंत त्या व्यक्तीला कोरोनाचा धोका नसतो. काही संशोधकांच्या मते रूग्णाच्या वय आणि इतर आरोग्य समस्येनुसार कोणाच्या शरीरात किती दिवस अॅंटि बॉडीज असणार हे ठरत असतं.

याबाबत इटलीमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार या संदर्भात १६२ रूग्णांवर चाचणी  करण्यात आली. ज्यामध्ये मागच्या वर्षी कोरोना मार्च एप्रिलमध्ये संक्रमित झालेल्या रूग्णांची नोव्हेंबरमध्ये पुन्हा अॅंटि बॉडीज टेस्ट घेण्यात आली. ज्यातून सिद्ध झाले की जवळजवळ आठ महिने या लोकांच्या शरीरात अॅंटि कोरोना अॅंटि बॉडीज होत्या.

यासोबतच काही संशोधकांच्या मते जसं कोरोनातून बरं झाल्यावर रूग्णांच्या शरीरात निर्माण होणाऱ्या अॅंटि बॉडीज आठ महिने अथवा काही महिन्यात संपतात. तसंच कोरोना लसीकरण घेतल्यावरही लोकांच्या शरीकात निर्माण होणाऱ्या अॅंटि बॉडीड काही ठराविक काळानंतर कमी होऊ शकतात. म्हणजेच कोविड 19 पासून संरक्षण करण्यासाठी लोकांना दरवर्षी अथवा काही ठराविक काळानंतर पुन्हा पुन्हा कोरोनाची  लस घेण्याची गरज लागू शकते.

 POPxo टीमकडून तुम्हाला आवाहन करण्यात येत आहे की, भारत सरकार द्वारे सांगण्यात आलेल्या सर्व नियमांचे काटोकोरपणे पालन करा, गरज नसेल तर उगाचच घराबाहेर पडू नका. कामानिमित्त घराबाहेर जावं लागलंच तर मास्क लावा, सॅनिटाईझरचा वापर करा, सोशल डिस्टंसिग पाळा. कोरनाची लक्षणं आढळली तर त्वरीत स्वतःला आयसोलेट करा आणि योग्य ते उपचार वेळेत करून पूर्ण बरे व्हा. कोरोना लस घेऊन स्वतःला कोरोनापासून सुरक्षित करणं हाच कोरोनापासून वाचण्याचा उत्तम मार्ग आहे. त्यामुळे सरकारी नियमांचे पालन करत तुमचे  कोरोना लसीकरण लवकर पूर्ण करा.

फोटोसौजन्य – Pixels

अधिक वाचा –

कोरोना काळात वाटतेय अस्वस्थ, या टिप्स करतील मन शांत

कोरोना टेस्ट निगेटिव्ह असूनही दिसत असतील लक्षणं, तर करा हे उपाय

कोरोनातून बरं झाल्यावर का बदलावा टूथब्रश आणि टंग क्लिनर

Read More From आरोग्य