आजकाल प्रत्येकजण फिटनेसबाबत फारच जागरूक झाला आहे. त्यामुळे फिट राहण्यासाठी तुम्ही तुमच्या डाएट आणि व्यायामाकडे कटाक्षाने लक्ष देता. मात्र त्यासाठी तुम्हाला कडक डाएट आणि हेव्ही वर्कआऊट करावे लागतात. पण जर तुम्ही नाचत, बागडत आणि मौजमजा करत फिट राहिलात तर… होय असे अनेक डान्सचे प्रकार आहेत ज्यामुळे सहज तुमचे वजन नियंत्रणात राहू शकते. दिवसभरात एक तास डान्स केल्यामुळे तुमच्या शरीरातील जवळजवळ 400 कॅलरिज बर्न होतात.
कारण डान्स हा व्यायामाचा एक उत्तम प्रकार आहे. त्यामुळे जर तुम्हाला कधी कधी जीमला जायला अथवा स्विमिंग करण्यासाठी पुरेसा वेळ नाही मिळाला तर कमीत कमी अर्धा ते एक तास घरीच डान्स करा. आता वेकेशन आणि पार्टीचा सिझन सुरू आहे. तेव्हा एखाद्या कार्यक्रमात डान्स करता करता तुमचा व्यायामही नक्कीच होईल. शिवाय यामुळे तुमचे मनही आनंदित होईल ज्यामुळे तुमचा उत्साह अधिकच वाढेल.
वजन कमी करण्यासाठी करा हे नृत्यप्रकार –
जर तुम्हाला नृत्याची आवड असेल तर तुम्ही हे निरनिराळे डान्सचे प्रकार करून फिट राहू शकता.
सांबा –
सांबा या नृत्यप्रकारात अपबीट आणि फास्ट मूव्हज केल्या जातात. ज्यात तुमच्या मांड्या, हात आणि पायाच्या हालचाली वेगाने होतात. या नृत्यप्रकारामुळे तुमच्या संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो. सांबा डान्स केल्यामुळे तुमच्या शरीरातील 500 कॅलरिज बर्न होतात. हा डान्स प्रकार खूपच मननोहक आहे ज्यामुळे तुमच्या शरीराला एकप्रकारचा सुडौलपणा नक्कीच येतो.
सालसा –
जर तुम्हाला जर मोठ्या प्रमाणावर तुमचे वजन कमी करायचं असेल तर सालसा डान्स नक्कीच शिकून घ्या. सालसा हा एक परफेक्ट नृत्यप्रकार आहे. एक तासाच्या सालसा सेशनमुळे तुमचे जवळजवळ 500 कॅलरिज बर्न होऊ शकतात. शिवाय हा डान्स सादर करण्यासाठी तुम्हाला फार फास्ट हालचाली कराव्याय लागतात ज्यामुळे तुमच्या कंबर आणि शरीराला सुंदर आकार मिळतो.
चा-चा-चा
चा-चा-चा हा नृत्यप्रकार करण्यासाठी तुम्हाला हात पाय आणि मांड्यावर चांगलं नियंत्रण ठेवावं लागतं. ज्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराला चांगला व्यायाम मिळतो. जर तुम्ही दिवसभरात एक तास हा व्यायाम केला तर तुमच्या शरीरातील 400 कॅलरिज कमी होतात.
फ्री-स्टाईल
जर तुम्हाला नृत्याच्या स्टेप्स फॉलो करणं कठीण वाटत असेल तर हा डान्स प्रकार तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. कारण यात तुम्हाला कोणत्याही स्टेपचं बंधन राहत नाही. फ्री- स्टाईलसाठी तुम्हाला फास्ट बीटवर जलद गतीने हालचाली कराव्या लागतात. बऱ्याच लग्नकार्यात अशा प्रकारचे डान्स केले जातात. त्यामुळे मजाही येते आणि व्यायामदेखील होतो. शिवाय या डान्समुळे तुमच्या शरीरातील 350 कॅलरिज कमी होतात.
बेली डान्स –
बेली डान्स हा एक आफ्रिकन डान्स प्रकार आहे. संगीताच्या ठेक्यावर तुम्हाला तुमच्या पोटाच्या हालचाली कराव्या लागतात. अशा प्रकारच्या डान्समुळे तुमचं पोट नक्कीच कमी होऊ शकतं. सहाजिकच हा डान्स शिकण्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल. मात्र एकदा तुम्ही हा डान्स करायला शिकला तर एक तासाच्या सरावात तुमच्या 500 ते 600 कॅलरिज बर्न होऊ शकतात.
झुंबा –
झुंबा हा अरोबिक डान्सप्रकार सध्या सगळीकडे फारच लोकप्रिय होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी या डान्सचे क्लासेसदेखील घेतले जातात. या डान्समुळे तुमचा कार्डिओ वर्कआऊट होऊ शकतो. या डान्समुळे एक तासात तुमच्या 500 कॅलरिज बर्न होतात.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
हे ही वाचा –
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.
अधिक वाचा –
नृत्य केल्याने शरीरात होतात ‘हे’ आश्चर्यकारक बदल