आरोग्य

निर्जळी उपवास करणार असाल तर आदल्या दिवशी घ्या ही काळजी

Trupti Paradkar  |  Aug 12, 2021
diet before shrawan nirjala fast

श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्य आणि सणासुदीची अक्षरशः रेलचेल असते. जसं या दिवसांमध्ये श्रावण महिन्याच्या शुभेच्छा, नागपंचमी शुभेच्छा दिल्या जातात. तसं या महिन्यात केल्या जाणाऱ्या पूजाविधी आणि व्रतांसाठी बऱ्याचदा निर्जळी उपवास केले जातात. कारण निर्जळी म्हणजे पाणीदेखील न पिता कडक उपवास केल्याने व्रताचे फळ लाभदायक ठरते अशी मान्यता आहे. मुळात उपवास करावा की नाही याबाबत प्रत्येकाचे मत निरनिराळे असू शकते. भगवंताची उपासना करण्यासाठी अथवा सुख मिळण्यासाठी उपवास करायलाच हवा असे नाही. मात्र शरीराला लंघन अथवा आराम मिळावा यासाठी नक्कीच उपवास करण्यास काही हरकत नाही. शिवाय चातुर्मासाच्या काळात आहाराबाबत काही पथ्य म्हणून उपवास करण्याची प्रथा पडली असावी. पण यासाठी निर्जळी उपवास करायला हवं असं नाही. थोडा सात्त्विक आहार घेत तुम्ही उपवास करू शकता. मात्र काही जणांची निर्जळी उपवास करण्यावर जास्त श्रद्धा असते. मात्र निर्जळी उपवास करताना लक्षात ठेवा जर तुम्ही दिवसभर पाणी न पिता उपवास केला तर तुमचे शरीर डिहायड्रेट होण्याची शक्यता आहे. यासाठीच निर्जळी उपवास करण्याच्या आधीपासून काही दिवस म्हणजेच दोन ते तीन दिवस आधी आहारात काही विशेष बदल करायला हवेत. त्यामुळे असा कडक निर्जळी उपवास करताना तुमचे शरीर अशक्त आणि कमजोर होणार नाही. 

श्रावण महिन्याचे महत्त्व आणि यातील महत्त्वाचे उपवास (List of Festivals In Shravan Month)

यासाठी श्रावणी सोमवारी भगवान शंकराला वाहतात शिवामूठ

श्रावणात निर्जळी उपवास करण्यासाठी टिप्स

उपवासादरम्यान तुम्हाला जर पाणी देखील प्यायचे नसेल तर तुम्ही आहारात असे बदल आधीपासून करायला हवेत. 

श्रावणी सोमवारी भगवान शंकराला कोणती फूले वाहावी, होतात मनोकामना पूर्ण

Read More From आरोग्य