बॉलीवूड

‘एक था टायगर’फेम दिग्दर्शकाने गुपचूप उरकले लग्न, फोटो व्हायरल

Dipali Naphade  |  Jan 4, 2021
'एक था टायगर'फेम दिग्दर्शकाने गुपचूप उरकले लग्न, फोटो व्हायरल

सलमान खान आणि कटरिना कैफचा जवळचा मित्र आणि ‘एक था टायगर’ आणि ‘भारत’ या चित्रपटांमुळे प्रसिद्ध झालेला दिग्दर्शक अली अब्बास जाफरने गुपचूप लग्न करून सर्वांनाच धक्का दिला आहे. आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत केवळ ‘बिसमिल्लाह’ असे कॅप्शन अलीने दिले आहे. मात्र केवळ एकमेकांचा हात हातात असलेला फोटो अलीने शेअर केला आहे. त्यामुळे त्याने आपल्या पत्नीचा फोटोही गुलदस्त्यातच ठेवला आहे. याशिवाय अली अब्बास जाफरने नक्की कोणाशी लग्न केले हेदेखील अजून गुलदस्त्यातच आहे. मात्र त्याच्या जवळच्या आणि इतर चाहत्यांनाही हा सुखद धक्काच आहे.

नव्या वर्षात नव्या चित्रपटांचा धमाका, होणार लवकरच प्रदर्शित

फोटो पोस्ट केल्यावर अभिनंदनाचा वर्षाव

अलीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्यानंतर त्याला अनेक जणांनी अभिनंदन केले. यामध्ये अनेक स्टार्सची नावं आहेत. मुळात अली अब्बास जाफर हा कटरिना आणि सलमानच्या अगदी जवळचा मानला जातो.  मात्र या दोघांचीही लग्नाला उपस्थिती नसावी असा अंदाज लावला जात आहे. पण फोटो शेअर केल्यानंतर मात्र कटरिनाने  अलीचे  अभिनंदन केले आहे. इतकंच नाही तर अंगद बेदी, इसाबेल कैफ, सुनील ग्रोव्हर यांनीही अलीचे अभिनंदन केले. आता अली अब्बास जाफर आपल्या पत्नीचा फोटो नक्की कधी शेअर करणार याचीच चाहत्यांना उत्सुकता आहे. अलीने शेअर केलेल्या फोटोमध्ये केवळ दोघांचा हात दिसत असून दोघेही पारंपरिक कपड्यांमध्ये आणि लग्नाच्या पोषाखात दिसून येत आहेत. पण अलीने इतक्या  गुपचूपीमध्ये लग्न नक्की का केलं आणि कोणालाही का कळवलं नाही असाही प्रश्न चाहत्यांना सतावत आहे. 

बॉलीवूडच्या या अभिनेत्री आहेत यशस्वी बिझनेस वुमन

लवकरच अलीचे होत आहे डिजीटलमध्ये पदार्पण

अली अब्बास जाफर हा उत्तम दिग्दर्शकांपैकी एक मानला जातो. सुल्तान, एक था टायगर, भारत यासारखे अप्रतिम चित्रपट अलीच्या नावावर आहेत. आता लवकरच अलीचे डिजीटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण होत आहे. 15 जानेवारीला अलीने दिग्दर्शित केलेली ‘तांडव’ ही सिरीज प्रदर्शित होत आहे. यामध्ये सैफ अली खान, डिंपल कपाडिया, क्रितिका कामरा, गौहर खान – दरबार, सराह  जेन डायस आणि डिनो मोरिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.  तर अलीने खाली पिली या चित्रपटातून निर्माता म्हणूनही बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. तांडवकडून सर्वांनाच खूप अपेक्षा असून  राजकारणाविषयक ही सिरीज बनविण्यात आली आहे. लहानसहान गोष्टीही अगदी ठासून सांगायच्या ही अलीच्या दिग्दर्शनाची खासियत आहे. त्यामुळे तांडवमध्ये नक्की हा विषय कसा हाताळला गेला आहे याची प्रेक्षकांनही उत्सुकता आहे. 

अली अब्बास जाफरला POPxo मराठीकडूनही लग्नासाठी आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

सोहेल आणि अरबाज खान विरोधात या कारणामुळे FIR दाखल

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From बॉलीवूड