कामामुळे हल्ली बऱ्याच जणांना उशीरा रात्री जेवायची सवय लागली आहे. आता तुम्हाला त्याने फरक नक्कीच पडत नसेल. पण पुढे जसे वय वाढेल त्याने तुम्हाला नक्कीच फरक पडणार आहे. तुम्हाला रात्री उशीरा जेवायची सवय असेल तर वेळीच तुम्ही सावध व्हा…ही सवय तुम्हाला फारच त्रासदायक ठरू शकते. काम करणाऱ्यांना हे नक्कीच थोडे कठीण आहे. पण जेव्हा आपल्या शरीराची हेळसांड होत आहे हे कळतं तेव्हा ही गोष्ट आपल्याला करायलाच हवी. रात्री उशीरा जेवल्याने वजन वाढतं का असा प्रश्न अनेकांना असतो. नक्की यातील तथ्य काय आहे ते आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. रात्री उशीरा जेवल्याने नक्की आपल्या शरीरावर काय परिणाम होतो ते आपल्याला यातून नक्कीच कळेल. त्यामुळे हा लेख वाचल्यावर तुम्ही तुमची सवय नक्की बदला.
पचनतंत्रावर होतो परिणाम
तुम्ही पण रात्री उशीरा जेवत असाल तर तुम्हाला या गोष्टी माहीत असायलाच हव्यात. उशीरा जेऊन लगेच जाऊन अनेक जण झोपतात. त्यामुळे ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. उशीरा जेवल्यानंतर त्वरीत बेडवर जाऊन झोपल्यास आणि पुन्हा सकाळी उठून ऑफिसला घाईघाईत खाऊन जाण्याच्या दरम्यान आपले पचनतंत्र बिघडते. त्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही आणि याचा परिणाम होतो तो वजन वाढीवर. अन्नाचे पचन नीट न झाल्याने वजन वाढ होते. पचनतंत्रावर अतिशय वाईट परिणाम होतो. त्यामुळे वेळवर जेवणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही कितीही कामात असाल तरीही वेळ काढून योग्य वेळी जेवायला हवे. तरूणपणी याचा त्रास जास्त जाणवत नाही. पण वय वाढीनुसार याचे परिणाम कळू लागतात.
झोप येत नसल्यास करा सोपे उपाय, खास टिप्स
योग्य झोप न येणे
Shutterstock
उशीरा जेवल्यावर झोप चांगली येईलच असं अजिबात नाही. बऱ्याचदा उशीरा जेवल्यामळे झोप लागत नाही. जेव्हा झोप येते तेव्हा पहाट झालेली असते. पचन नीट न झाल्याने गळ्यात जळजळ होणे, छातीत दुखणे असे प्रकार वाढू लागतात. तसंच पोटदुखी आणि झोपेची समस्याही निर्माण होते. याचा प्रत्यक्ष परिणाम हा वजन वाढीवर होत असतो. त्यामुळे रात्री उशीरा जेवणं हे कधीही चांगले नाही. ही सवय तुम्हाला होत असेल तर तुम्ही वेळीच यातून काहीतरी तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.
हाती जेवण जेवण्याचे फायदे करतील तुम्हाला थक्क
वजन नक्की कसे वाढते
Shutterstock
तुम्हाला कदाचित हे माहीत असेलच की, बरेच जण सांगतात उशीरा जेवल्याने वजन वाढते. त्यामध्ये नक्कीच तथ्य आहे. शरीराची काहीही हालचाल आपण करत नाही आणि अन्न पचन होत नाही. त्यामुळे वजन वाढते. उशीरा खाल्ल्याने मेटाबॉलिजम कमी होते आणि बऱ्याचदा कॅलरी बर्न होत नाहीत. त्याचा प्रत्यक्ष परिणाम हा वजन वाढण्यावर होत असतो. तुम्हाला वजन वाढायला नको असेल तर तुम्ही तुमची उशीरा जेवण जेवण्याची सवय वेळीच बदला.
वजन वाढल्यास करा सोप्या पद्धतीने करा शरीर डिटॉक्स
पोटाशी संबंधित आजार
रात्री उशीरा जेवल्याने बऱ्याच जणांना पोटाशी संंबंधित आजाराशी दोन हात करावे लागतात. अॅसिडिटी, रक्तदाब इत्यादी समस्या यामुळे निर्माण होतात. उशीरा जेवल्यानेच या समस्या अधिक प्रमाणात निर्माण होतात. जेवण पचविण्यासाठी तुम्हाला वेळेत जेवणे अत्यंत आवश्यक आहे. तसंच तुमचा मूड चांगला राहण्यासाठीही याची मदत होते. तुम्ही उशीरा जेवलात तर तुमची अन्न न पचल्याने पोटात दुखून चिडचिड होत राहते.
सूचना – ही सर्व माहिती योग्य आहे. मात्र तरीही तुम्हाला यावर कोणताही उपचार हवा असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक