DIY लाईफ हॅक्स

योगा करताना मॅट सटकत असेल तर या टिप्स करा फॉलो

Trupti Paradkar  |  Mar 18, 2021
योगा करताना मॅट सटकत असेल तर या टिप्स करा फॉलो

योगासने नेहमी नेहमीच्या जागेवर आणि तुमच्या खास आसन अथवा योगा मॅटनरच करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र यासाठी तुमची योगा मॅट कशी आहे हे  खूप महत्त्वाचे आहे. बाजारात विविध प्रकारच्या योगा मॅट विकत मिळतात. ज्यामध्ये रबर, कापड, तागा अथवा गालिच्याचे कापड असू शकते. रबरापासून तयार केलेल्या योगामॅट वजनाला हलक्या आणि ने आण करण्यासाठी सोप्या असतात. तुम्ही तुमची सोय आणि आवड पाहून त्या खरेदी करता. पण कधी कधी योगासनांचा सराव सुरू असताना अचानक योगामॅट सटकते. याला कारण तुमच्या अंगातून येणारा घाम अथवा तुमचे कपडे असू शकतात. यासाठीट योगा करताना काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवा. ज्यामुळे तुमची मॅट सटकणार नाही आणि योगा करताना तुम्हाला दुखापत होणार नाही. 

योगा करण्यापूर्वी हातांवर सुती मोजे घाला

जर तुमच्या हातापायाच्या तळव्यांना सतत घाम येत असेल तर योगा करताना तुमचे हात अथवा पाय योगा मॅटवरून सटकू शकतात. अशा वेळी दुखापत टाळण्यासाठी तुम्ही हात आणि पायांमध्ये सुती मोजे घालू शकता. मात्र लक्षात ठेवा हे मोजे सूती असावेत आणि ते वेळच्या वेळी स्वच्छ केलेले असावेत. सुती असल्यामुळे योगा करताना तुमच्या हातापायातून निघणाऱ्या घामाचा नीट निचरा होईल आणि स्वच्छ केल्यामुळे तुम्हाला इनफेक्शनचा धोका टाळता येईल.

मॅटवर जिम पावडर टाका

जिममध्ये जेव्हा वेटच्या एक्सरसाईझ केल्या जातात तेव्हा  वेट हातातून सटकू नये यासाठी हाताला जिम पावडर लावण्याचा सल्ला दिला जातो. असं केल्यामुळे हाताला ग्रिप मिळते आणि घामामुळे हाताजवळची वस्तू सटकत नाही. तुम्ही ही जिम पावडर तुमच्या योगा मॅटवर टाकू शकता. ज्यामुळे तुमचे हात अथवा पाय घामामुळे सटकणार नाहीत. जिम अथवा योगा करताना हा उपाय करणं नक्कीच सोपं आणि दुखापत टाळणारं असतं.

मॅटवर पाणी शिंपडा –

जर तुम्ही घरीच योगाभ्यास करत असाल आणि तुमच्याजवळ जिम पावडर नसेल तर काहीच हरकत नाही. तुम्ही तुमच्या योगामॅटवर थोडंसं पाणी शिंपडू शकता. पाण्यामुळे मॅट थोडी ओलसर होईल आणि तुमच्या हाताला चांगली ग्रिप मिळेल. मात्र यासाठी मॅटवर अती पाणी टाकू नका  नाहीतर त्या पाण्यामुळेच तुमचे हात पाय सरकतील. यासाठीच अगदी थोडंसं पाणी मॅटवर स्प्रे करा.

अॅंटि स्किड योगा मॅट वापरा –

जर तुम्ही नियमित योगा करत असाल आणि वरील सर्व उपाय करूनही तुमची मॅट सतत सटकत असेल तर तुम्हाला मॅट बदलण्याची गरज आहे हे समजून घ्या. तुमची मॅट जुनी झाली असेल अथवा तुमच्या हातापायांना सतत खूप घाम येत असेल तर तुम्हाला अॅंटि स्किड मॅट खरेदी करण्याची गरज आहे. अॅंटि स्किड योगा मॅटमुळे तुमचे  हात पाय मॅटवरून मुळीच सरकणार नाहीत. आजकाल बाजारात अशा योगा मॅट सहज उपलब्ध असतात. त्यामुळे नीट रिसर्च करा आणि नवीन योगा मॅट खरेदी करा. 

योगा मॅटबाबत या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

 

फोटोसौजन्य –

अधिक वाचा –

निरोगी जीवनशैलीसाठी नियमित करा ‘ही’ योगासने

योगासनांचा सराव सुरू करताय, मग या गोष्टी जरूर लक्षात ठेवा

निरोगी राहण्यासाठी आणि चिरतरूण दिसण्यासाठी फिटनेस टीप्स (Fitness Tips For Women In Marathi)

योगासनाचे फायदे (Yoga Benefits In Marathi)

 

Read More From DIY लाईफ हॅक्स