उन्हाळा सुरू झाला की काकडीचं सलाड, कोशिंबीर, खमंग काकडी, काकडीचं रायतं असे अनेक पदार्थ बनवले जातात. काकडीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी असतं. ज्यामुळे तुम्ही हायड्रेट राहता. मात्र यासोबतच काकडीत व्हिटॅमिन्स, मिनरल्स, इलेक्ट्रोलाइट्सदेखील भरपूर असतात. ज्यामुळे तुमच्या शरीराला पोषक घटक मिळतात. मात्र बाजारातून विकत आणलेली एकादी काकडी कडू निघते आणि तुमचे खाद्यपदार्थही कडू होतात. अशा वेळी तुम्हाला कडू काकडी ओळखण्याचं तंत्र माहीत असायला हवं. अथवा काकडीचा कडूपणा कसा कमी करायचा हे तरी कमीत कमी माहीत असायलाच हवं. यासोबतच जाणून घ्या काकडीचे फायदे (Benefits Of Cucumber In Marathi)
काकडी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात
काकडी खरेदी करताना जर तुम्ही निरखून पारखून काकडी खरेदी केली तर ती कडू निघण्याची शक्यता कमी असते.
- काकडी खरेदी करताना शक्य असल्यास गावठी काकडी खरेदी करा. कारण ती कडू लागत नाहीच उलट शरीरासाठी जास्त पोषक असते. ज्या काकड्या रंगाने अधिक गडद आणि हिरव्या असतात. ती काकडी गावठी आहे असं समजा.
- चविष्ट काकडी आकाराने जास्त मोठी अथवा जास्त लहान नसते. कारण जास्त मोठी असेल तर तिच्यातील बिया जून झाल्यामुळे ती कडू लागते अथवा लहान आणि कोवळी काकडी जास्त कडू निघू शकते.
- काकडी खरेदी करताना ती नेहमी ताजी खरेदी करा. जर जास्त मऊ असेल तर ती पिकल्यामुळे आतून खराब होऊन कडू लागू शकते.
- वाकडी झालेली काकडी अथवा सोललेली कधीच खरेदी करू नका. कारण अशा काकड्या कीड लागण्यामुळे कडवट होतात.
काकडीचा कडूपणा कमी करण्यासाठी उपाय
बाजारातून विकत आणलेली काकडी जर कडू निघाली तर तुम्ही काही उपाय करून तिचा कडूपणा कमी करू शकता.
- काकडीचा कडूपणा कमी करण्याचा सोपा उपाय म्हणजे देठ आणि खालील टोकाकडील भाग सुरीने कापून टाका. कापलेला भाग काकडीवर थोड्यावेळ चोळा ज्यामुळे काकडीमधून पांढरा चिक निघेल आणि काकडीचा कडूपणा कमी होईल.
- काकडी सोलून तिला मीठ चोळल्यास काकडीचा कडूपणा कमी होतो.
- काकडीचा कडूपणा कमी करण्यासाठी काटा चमच्याने काकडीला छिद्रे पाडा. यासाठी आधी काकडी सोलून घ्या आणि मग चमच्याने छेद करा. थोड्यावेळाने काकडीचा कडूपणा कमी होतो.
आम्ही शेअर केलेले हे उपाय तुम्हाला कसे वाटले आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेटमध्ये जरूर कळवा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक