लहान मुलांचे जन्मापासून असलेले केस फार वाढत नाहीत. यासाठी त्यांच्या वर एक वर्ष झाल्यावर जावळ विधी केला जातो. यासाठी जाणून घ्या बाळाचा जावळ विधी संपूर्ण माहिती | Javal Kadhane Vidhi Marathi… जावळ विधीनंतर बाळाचे टक्कल केल्यामुळे आईवडिलांना त्याचे केस लवकर वाढावे असं वाटत असतं. कारण मुलांना असं पाहण्याची पालकांना सवय नसते. शिवाय मुलंही केस काढलेले पाहून बऱ्याचदा चिडचिड करतात. बऱ्याचदा जावळनंतरही बाळाची टाळू पटकन भरून निघत नाही. अशा वेळी बाळाच्या टाळूचे संरक्षण करण्यासाठी डोक्यावरील केस फायदेशीर ठरतात. वास्तविक जावळ विधी केल्यानंतर बाळाचे केस नैसर्गिक पद्धतीने घनदाट होतात. मात्र बाळाचे केस लवकर वाढावे यासाठी तुम्ही काही घरगुती आणि नैसर्गिक उपाय नक्कीच करू शकता.
जावळ विधीनंतर बाळाचे केस वाढण्यासाठी टिप्स
घरातील काही नैसर्गिक वस्तूंचा वापर करून तुम्ही तुमच्या बाळाचे केस वाढण्यासाठी प्रयत्न करू शकता.
नारळाचे तेल लावा
केसांची वाढ करण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे केसांना नारळाचे तेल लावणे. त्वचेच्या अनेक समस्यांवर नारळाचे तेल रामबाण उपाय ठरते. कारण या तेलामध्ये केसांची वाढ करणारे आणि त्वचेला पोषण देणारे घटक असतात. बाळाची टाळू भरून निघण्यासाठी नारळाचे तेल लावणे खूप फायदेशीर ठरते.
हळूवार ब्रश करा
बाळाचे केस जेव्हा वाढू लागतात, तेव्हा ते तुटू अथवा गळू नयेत यासाठी बाळाचे केस विंचरताना काळजी घ्या. बाळाच्या डोक्यावरून हळूवार कंगवा फिरवा. कारण जरी बाळाचे केस लहान असले ते विंचरण्याची गरज नसली तरी, त्वचेचं रक्ताभिरसण यामुळे सुधारतं. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते.
केस बांधून ठेवू नका
लहान मुलांचे केस डोळ्यावर येतात म्हणून पालक मुलांचे केस बांधून ठेवतात. बऱ्याचदा स्टाईल करण्यासाठी देखील केस बांधले जातात. असं केल्यामुळे तुमची मुलं क्यूट दिसतात पण त्यांच्या केसांच्या वाढीवर परिणाम होतो. केस बांधल्यामुळे मुळांवर ताण येतो आणि केस तुटतात.
केसांना पोषण मिळेल याची काळजी घ्या
बाळाच्या केसांना योग्य पोषण मिळालं तर त्यांची वाढ मजबूत होते आणि आयुष्यभर केस छान दिसतात. यासाठी लहानपणीच केसांच्या पोषणाकडे योग्य पद्धतीने लक्ष द्यायला हवं. यासाठी बाळाचा आहार योग्य असायला हवा. त्याचप्रमाणे बाळाच्या त्वचेला आणि केसांना व्हिटॅमिन ई तेलाचा वापर करा. मात्र हे तेल थेट न वापरता ते नेहमी नारळाच्या तेलात मिसळून मगच बाळाला लावावे.
बाळ चिडणार नाही याची काळजी घ्या
बाळ चिडले तर ते रागाने त्याचे केस ओढू शकते. कारण त्याच्या हातात येणारी ही एक सहज गोष्ट असते. यासाठी बाळ जास्तीत जास्त शांत राहील आणि त्याचे केस ओढणार नाही याची पालकांनी काळजी घ्यायला हवी. कारण जर सतत केस ओढले गेले तर मुळांवर ताण येऊन बाळाचे केस कमजोर होतील. यासाठीच ते रडू लागताच त्याला योग्य पद्धतीने शांत करा. बाळ रडण्याची कारणे आणि उपाय| Reasons Why Your Baby Is Crying In Marathi
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade