मनोरंजन

पर्ल व्ही. पुरीबाबत ठोस पुरावे असल्याचे पोलिसांचे म्हणणे, पण कलाकारांचा पर्लला पाठिंबा

Dipali Naphade  |  Jun 7, 2021
पर्ल व्ही. पुरीबाबत ठोस पुरावे असल्याचे पोलिसांचे म्हणणे, पण कलाकारांचा पर्लला पाठिंबा

पर्ल व्ही. पुरी (Pearl V. Puri) ने अत्यंत कमी वेळात टी. व्ही. इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. पण आता गेल्या काही दिवसांपासून मात्र त्याच्या गळ्याभोवतीचा फास आवळला जात आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणात पर्लला अटक करण्यात आली आहे. 4 जून रोजी ही अटक करण्यात आली असून 14 दिवसांची कोठडी सध्या पर्लला सुनावण्यात आली आहे. मात्र अनेक बॉलीवूड आणि टी. व्ही. अभिनेत्री आणि निर्माती एकता कपूरदेखील पर्लच्या बाजूने उभे राहिले आहेत. अनिता हसनंदानी, क्रिस्टल डिसुझा, करिश्मा तन्ना, सुरभी ज्योती, निया शर्मा या सर्वांनीच पर्लला पाठिंबा दिला आहे. पर्ल अत्यंत चांगला मुलगा असून असं करूच शकत नाही असा विश्वास त्यांनी दर्शवला आहे आणि #istandwithpearl या हॅशटॅगअन्वये सध्या सर्व जण पर्लला पाठिंबा देत आहेत आणि लवकरच सत्य बाहेर येईल अशी आशा करत आहे. मात्र एकताने केलेल्या दाव्यावर आणि पोस्टवर डीसीपीनी उत्तर देत पर्लविरोधात पुरावा असल्यानेच त्याला अटक करण्यात आल्याचं म्हटले आहे. 

एकताने पर्लबद्दल केली होती पोस्ट, म्हटले निर्दोष

निर्माती एकता कपूरने पर्लबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत पर्लला निर्दोष म्हटले आहे. ‘मुलीच्या आईसोबत आपण स्वतः बोललो असून त्यांनी हो गोष्ट मान्य केली आहे की पर्लचा कोणत्याही गोष्टीशी संबंध नाही. तर मुलीच्या वडिलांनी पर्लविरोधात खोटी तक्रार केली आहे जेणेकरून आपल्या मुलीचा ताबा ते मिळवू शकतील. मुलीच्या आईवडिलांमध्ये सख्य नसून त्यांना ती तिची तिला सांभाळू शकत नाही हे दाखवून द्यायचं आहे आणि म्हणून निर्दोष पर्लला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे’ असं एकताने लिहिले आहे. 

‘रसभरी’ वेबसिरीज वर्षपूर्तीच्या निमित्ताने रश्मी अगाडकरने आठवले क्षण

मात्र पर्ल निर्दोष नसल्याचे डीसीपीचे म्हणणे

पर्ल व्ही. पुरी याला अटक करण्यात आली असून सध्या तो कोठडीत आहे. पण एकताच्या पोस्टबाबत डीसीपी संजय कुमार पाटील यांनी सांगितले की, ‘पर्लवर लावण्यात आलेले आरोप खोटो नाहीत. तपासात त्याचं नाव समोर आले आहे. त्याच्याविरुद्ध आमच्याकडे पुरावा आहे. त्यामुळेच त्याला अटक करण्यात आली आहे. ट्रायलमध्ये सगळ्यांसमोर सर्व सत्य बाहेर येईल.’ पण टीव्ही वरील अनेक कलाकारांनी पर्लला पाठिंबा दिला आहे. पर्लने कधीही कोणतेही वाईट काम केलेले अथवा कोणत्याही मुलीशी वाईट वर्तन केलेले आतापर्यंत पाहण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याचे आयुष्य खराब करू नका अशा स्वरूपाच्या पोस्टही सध्या व्हायरल होत आहेत. तर डीसीपीच्या म्हणण्याप्रमाणे 2019 मध्ये मुलीच्या वडिलांनी तक्रार केली आहे. पर्लविरोधात पॉस्को अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 

काय काका मुलगी पाहिली नाही का,राखीने विचारला प्रश्न

पीडित मुलीच्या आई-वडिलांमध्ये न्यायालयीन लढाई

पीडीत मुलीच्या आई – वडिलांमध्ये सध्या मुलीचा ताबा मिळविण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू आहे. घटस्फोटासाठी अर्ज केला असून पीडितेचा वडील पर्लवर आरोप करत असल्याचे तिच्या आईचे म्हणणे आहे. कारण पीडितेची आई ही पर्लसोबत एकाच कार्यक्रमात काम करत असून मुलीला घेऊन जात असे. पण पर्ल निर्दोषी असल्याचं आईनेही कबूल केले आहे. मात्र वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या मुलीचे शोषण झाले आहे. त्यामुळे आता पर्लच्या चाहत्यांनाही नक्की काय खरं आणि काय खोटं हे जाणून घेण्याबाबत उत्सुकता आहे. पण लवकरच सत्य बाहेर येईल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे. 

सुनिल शेट्टीचा नवा उपक्रम, गरजू लोकांसाठी करणार योग्य औषधांचा पुरवठा

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन