आरोग्य

पर्यावरणीय घटक ठरत आहेत आरोग्यासंबंधित समस्यांना कारणीभूत

Dipali Naphade  |  Apr 8, 2022
environmental-factors-are-causing-health-problems-in-marathi

प्रदूषण (Pollution), हवामान बदल (Weather Change), ग्लोबल वॉर्मिंग (Global Warming) आणि ओझोन (Ozone) थर कमी होणे यासारख्या पर्यावरणीय घटकांचा मानवी आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. प्रदूषण आणि हवामान बदलामुळे मोठ्या संख्येने लोकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. निरोगी आयुष्यासाठी पर्यावरण स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याची काळाची गरज आहे. आपले आरोग्य चांगले आणि सुरक्षित राहण्यासाठी आपल्या पर्यावरणाची काळजी घेणे आवश्यक आहे. स्वतःच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याचा डॉक्टरांचा सल्ला आहे…

आपले आरोग्य हे थेट पर्यावरणाशी निगडित 

झेन मल्टीस्पेशालिटी जनरल फिजिशियन आणि संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. विक्रांत शहा म्हणाले की, रूग्णालयाचे आपले आरोग्य हे थेट पर्यावरणाशी निगडित आहे. स्वच्छ शहर आणि हिरवेगार वातावरण हे निरोगी आणि आनंदी राहण्यास मदत करतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, हवामान बदलामुळे 2030 आणि 2050 मध्ये कुपोषण, मलेरिया, अतिसार आणि वाढत्या उष्णतेमुळे दरवर्षी अंदाजे 250,000 अतिरिक्त मृत्यू होऊ शकतात. पर्यावरणीय संकट  संपुर्ण जग अनुभवत आहे. हवामान आणि  संबंधीत पर्यावरणीय आपत्तींमुळे जगाचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, टायफून आणि चक्रीवादळे मोठ्या प्रमाणावर  नैसर्गिक विनाश घडवून आणतात आणि निष्पाप लोकांचा जीव घेतात. उष्ण तापमानामुळे ओझोनचे प्रमाण वाढते ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते आणि त्यामुळे एखाद्याच्या फुफ्फुसाच्या ऊतींचे नुकसान होऊ शकते आणि दम्याचे रुग्ण आणि फुफ्फुसाचे आजार असलेल्यांना गंभीर गुंतागुंत होऊ शकते.

प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही वाढ

अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट डॉ. तुषार राणे यांनी सांगितले की, पर्यावरणातील घटकांचा तुमच्या आरोग्यावर मोठा प्रभाव पडतो. विविध रोगांमागील पर्यावरणीय जोखीम घटक म्हणजे प्रदूषण, हवेतील सूक्ष्मजंतू, पाणी किंवा अन्नातील मातीचे दूषित घटक, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, नैसर्गिक आपत्ती (चक्रीवादळ, भूकंप, पूर), आणि कीटकनाशके आणि इतर रसायनांचा वापर या घटकांचा परिणाम आरोग्यावर होतो. वायू प्रदूषण, हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्ती, सूक्ष्मजंतूंमुळे होणारे रोग आणि  पाण्याची गुणवत्ता ही घातक आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते. पर्यावरणीय प्रदूषक आणि औद्योगिक कचरा यामुळे दमा, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), ब्राँकायटिस, हृदयरोग (अनियमित हृदयाचे ठोके, हृदय अपयश), नैराश्य, स्ट्रोक, घरघर, खोकला आणि दम लागणे यासारखे श्वसनाचे आजार होऊ शकतात. अलिकडच्या वर्षांत प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही वाढ झाली आहे. प्रदूषणामुळे डोळ्यांच्या आणि त्वचेच्या समस्याही वाढतात. असुरक्षित पिण्याचे पाणी आणि अस्वच्छतेमुळे अतिसार, कॉलरा, मेंदूज्वर आणि जठराला सूज येते.

डॉ. राणे पुढे म्हणाले की, पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. घरातील आणि बाहेरील प्रदूषण टाळून, निसर्गाची काळजी घेऊन, पाण्याची बचत करून, हानिकारक वायूंचे उत्सर्जन नियंत्रित करून आणि ग्रह आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांच्या आरोग्याचे रक्षण करून वायू प्रदूषण कमी करा. लोकांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी आणि त्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी निरोगी वातावरण राखणे आवश्यक आहे. त्यामुळे वेळीच आपण आपल्या तब्बेतीकडे लक्ष द्यायला सुरूवात करायला हवी. केवळ डॉक्टर सांगत आहेत म्हणून नाही तर इतर गोष्टींकडे पाहता आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव असणे कधीही चांगले!

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य