स्विमिंग करणं हा एक उत्तम व्यायाम आहे.कारण स्विमिंग केल्यामुळे तुमचे वजन तर कमी होतेच शिवाय शरीराला थंडावा मिळतो. म्हणूनच उन्हाळ्यात स्विमिंग करणं हा एक व्यायामाचा बेस्ट पर्याय आहे. ज्यामुळे तुम्हाला उष्णतेचा त्रासदेखील होत नाही आणि व्यायामदेखील होतो. ज्यांच्याकडे स्वतःचा प्रायव्हेट पूल असतो अथवा सोसायटी क्लबमध्ये स्विमिंग पूल असतो अशी लोकं हौसेखातर स्विमिंग करतात. यासाठी वाचा पोहण्याचे फायदे (Swimming Benefits In Marathi) मात्र आजकाल स्विमिंग पूल स्वच्छ राहावेत यासाठी पाण्यात क्लोरिनचा वापर केला जातो. जर तुम्ही नियमित अशा पाण्यात स्विमिंग करत असाल तर तुमच्या त्वचा आणि केसांवर याचा परिणाम होतो. क्लोरिनयुक्त पाण्यामुळे केस कोरडे आणि निस्तेज होतात. म्हणूनच स्विमिंग करणाऱ्या लोकांनी केसांनी योग्य निगा राखायला हवी. यासाठी जाणून घ्या या काही हेअर केअर टिप्स
केसांना मॉइस्चराइझ करा
त्वचा मॉइस्चराइझ करणं तुम्ही ऐकलं असेल पण केसांना मॉइस्चराईझ करायचं म्हणजे असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? आजकाल केसांसाठीदेखील चांगले मॉइस्चराईझर मिळतात. स्विमिंग पूलमधील क्लोरिनयुक्त पाण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी केसांवर असे मॉईस्चराईझर सुरक्षित कवच निर्माण करतात. यासाठी तुम्ही केसांना नारळाचे तेल अथवा हेअर सीरमदेखील लावू शकता. कारण कोरड्या केसांवर क्लोरिन लवकर प्रभाव टाकतं. पण केस तेलकट असतील तर त्याचा जास्त परिणाम केसांवर होत नाही. तसंच Ayurvedic Hair Care Tips In Marathi | आयुर्वेदिक पद्धतीने घ्या केसांची काळजी
स्विमिंग कॅप घाला
तुम्ही नियमित स्विमिंग करत असाल तर तुम्ही पाण्यात उतरताना स्विमिंग कॅप वापरायला हवी. दिसायला बरं वाटत नसलं तरी या कॅपमुळे तुमच्या केसांची योग्य निगा राखली जाते. केसांचे क्लोरिनयुक्त पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी कॅपचा नक्कीच फायदा होतो. पण लक्षात ठेवा स्विमिंग कॅप केसात घालण्यापूर्वी केसांना नारळाचे तेल अथवा सीरम, मॉईस्चराईझर जरूर लावा.
केस धुणे
स्विमिंग करणाऱ्या लोकांच्या मनात नेहमी एक प्रश्न येतो, तो म्हणजे दररोज हेअर वॉश करावा का ? तर याचं उत्तर असं की दररोज हेअर वॉश केल्यामुळे केस कोरडे पडतात. मात्र जर तुम्ही दररोज स्विमिंग करत असाल तर तुम्हाला दररोज केस धुवावे लागतात. कारण केस धुण्यामुळे तुमच्या केसांध्ये पाण्यातून आलेले केमिकल्स आणि क्लोरिन निघून जाते. तुम्ही यासाठी दररोज शॅम्पू नाही वापरला तरी चालेल, फक्त स्वच्छ पाण्याने तुमचे केस दररोज धुवा.
स्विमिंगची वेळ
तुम्ही कोणत्या वेळी दररोज स्विमिंग करता हे देखील केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण जर तुम्ही दररोज कडक उन्हात स्विमिंग करत असाल तर पाण्यातील क्लोरिनसोबत उन्हाचा परिणाम केसांवर होतो. यासाठी उन्हाळ्यात स्विमिंग नेहमी सकाळी अथवा संध्याकाळीच करावे.
घरगुती उपाय
नियमित स्विमिंग केल्यामुळे तुमचे केस कोरडे आणि निस्तेज झाले असतील तर, केसांवर शॅम्पू ऐवजी होममेड हेअर मास्क लावा. अंडी अथवा दह्यापासून बनवलेला एखादा चांगला हेअर मास्क तुम्ही केसांना लावला तर तुमच्या केसांवर चमक आणि तेज येईल. यासाठी वाचा Hair Spa Benefits In Marathi | घरीच पार्लरप्रमाणे ‘हेअर स्पा’ कसा कराल