आपलं जग

नागपंचमी मराठी माहिती | Nag Panchami Chi Mahiti | Nag Panchami Information In Marathi

Aaditi Datar  |  Aug 1, 2022
Nag Panchami Information In Marathi

श्रावण महिना सुरू झाला की, अनेक सण साजरे केले जातात. श्रावणातील अनेक सणांपैकी नागपंचमीसुद्धा असंच एक पर्व आहे. नागपंचमी मराठी माहिती आपल्यापैकी प्रत्येकाला असेलच. श्रावण महिन्यातील आराध्य दैवत भगवान शंकराला मानलं जातं. तसंच हा पावसाळ्याचा ऋतू असतो. असं मानलं जातं की, या काळात नाग बिळातून बाहेर पडून जमिनीवर येतात. या बाहेर पडलेल्या नागांमुळे कोणालाही अपाय होऊ नये म्हणून नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमीची पूजा करण्यात येऊ लागली. ज्याला नागपंचमी असं म्हटलं जातं. पण आज नागपंचमीला नाही पण नागाला आणि नागसंवर्धनाला खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त झालं आहे. चला जाणून घेऊया नागपंचमी विषयी माहिती (Nag Panchami Chi Mahiti) आणि नागपंचमीच्या शुभेच्छा.

2022 नागपंचमी तारीख आणि तिथी | Nag Panchami 2022 Date Marathi

यंदा नागपंचमी 2 ऑगस्ट 2022 या तारखेला येत आहे. नागपंचमीची तिथी पहाटे 5.14 या वेळेला 2 ऑगस्टला सुरू होत आहे. तर नागपंचमी तिथी 3 ऑगस्ट रोजी पहाटे 06:05 पासून संध्याकाळी 08:41 पर्यंत राहील. यानुसार नागपंचमीच्या पूजाविधीसाठी आपल्याला साधारण अडीज तासाचा वेळ मिळणार आहे. नागपंचमी मराठी माहिती (Nag Panchami Mahiti In Marathi) नुसार तुम्ही या दिवशी पूजा करा.

भगवान कृष्णाचे महाभारतातील कार्य

भारतातील नागपंचमीचं महत्त्व | Importance Of Nag Panchami In Marathi

हिंदू धर्मात देवीदेवतांची पूजा-अर्चा करण्यासाठी व्रतवैकल्य आणि सण साजरे करण्यास सुरूवात झाली. तसंच देवदेवतांच्या प्रतीकांची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपवासही केले जातात. नागपंचमीसुद्धा असंच एक पर्व आहे. नागाला शंकर देवाच्या गळ्यातील हाराचं स्थान आहे. तर साक्षात भगवान विष्णूची शय्या म्हणूनही नागाला स्थान आहे. लोकजीवनातही भारतीयांचं नागांशी पूर्वीपासून दृढ नातं आहे. याच कारणांमुळे नागाची देवता म्हणून पूजा केली जाते. खरंतर आजही भारतातील अधिकांश लोकसंख्याही उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. ज्यामुळे भारतात अगदी शेतीच्या अवजारांची पूजा करण्याचीही प्रथा आहे. तर नागाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधलं जातं असल्यामुळेही नागपंचमीची प्रथा आजही प्रचलित आहे. कारण शेतातील उंदरी-घुशी नाग खात असल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचं नुकसान होत नाही. तसंच ही पूजा करण्यामागे धार्मिक आणि सामाजिक कारण तर आहेच, पण भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीमधील योगांसोबतच दोष पाहिले जातात. कुंडली दोषांमध्ये कालसर्प दोष हा एक महत्त्वपूर्ण दोष आहे. कालसर्प दोष अनेक प्रकारचे असतात. त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्यासोबतच दान दक्षिणा देण्याचंही महत्त्व सांगितलं जातं. शास्त्रांनुसार श्रावण मासातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीच्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. याशिवाय प्रत्येक महिनाच्या पंचम तिथीला नागदेवतेचं स्थान आहे. परंतु श्रावण मासातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागदेवतेची  पूजा विशेषतः केली जाते. या दिवशी नागांची सुरक्षा करण्याचा संकल्प केला जातो. श्रावण शुक्ल पक्षाच्या पंचमी दिवशी नागपंचमीचं पर्व प्रत्येक वर्षी पूर्ण श्रद्धा आणि विश्वासासोबत साजरं केलं जातं.

वाचा – Buddha Purnima Information In Marathi

नागपंचमीचं वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्व

आधुनिकतेच्या काळात तांत्रिक क्षेत्रात तर विस्तार झाला आहे पण आजही नागपंचमीसारख्या पर्वाचं महत्त्व कमी झालेलं नाही. नागपंचमी विषयी माहिती (Nag Panchami Mahiti) वाचल्यास तुम्हाला कळेल की, फक्त नागपंचमी पर्व साजरं करण्याचं रूप बदललं आहे. नागदेवतेची पूजा करण्यासोबत आजकाल नागांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. आज वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर औषधांमध्ये नागापासून प्राप्त होणाऱ्या विषाचा वापर केला जातो. नागाच्या विषातील औषधी गुणांमुळे याच्या हलक्याशा मात्रेनेही अनेक लोकांचा जीव वाचवण्यात मदत होत आहे.

वाचा – Hartalika Wishes In Marathi

सण आणि पर्यावरण | Festival Of Humanity and Environment

हिंदू संस्कृतीप्रमाणे प्रत्येक प्राणी, वनस्पती, एवढचं काय तर संपूर्ण सृष्टीला देवाच्या रूपात पाहिलं जातं. प्राचीन काळातील ऋषीमुनींनी सर्व पूज, पर्व, उत्सवांचं नातं हे धर्माशी जोडलं आहे. एकीकडे हे सर्वांची धार्मिक आस्था वाढवतात तर दुसरीकडे अप्रत्यक्षरित्या व्यक्तींना पर्यावरणांशीही जोडण्याचं काम करतात. याचनुसार नागाला दैवीप्राण्यांच्या श्रेणीत ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे नागदर्शन आणि पूजेचं विशेष महत्त्व आहे.

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा

नागपंचमी आणि श्रीकृष्णाचं नातं | Connection Between Nag Panchmi & Shri Krishna

नागपंचमी माहिती (Nag Panchami Information In Marathi) आणि पूजेबाबतचा एक प्रसंग भगवान श्रीकृष्णाशीही निगडीत आहे. याबाबतची कालियामर्दनाची आख्यायिका प्रसिद्ध आहे. या आख्यायिकेनुसार बाळकृष्णाला मारण्यासाठी कंस राजा कालिया नामक नागाला पाठवतो. पहिले हा नाग गावात दहशत निर्माण करून लोकांना भयभयीत करतो. मग एके दिवशी जेव्हा बाळकृष्ण आपल्या मित्रांसोबत नदीकिनारी खेळत असतो तेव्हा त्यांचा चेंडू नदीत पडतो. जेव्हा तो चेंडू आणण्यासाठी कृष्ण नदीत उतरतो तेव्हा कालिया नाग आक्रमण करतो. मग श्रीकृष्ण त्याचं पराभव करतो. मग भगवान श्रीकृष्णाची माफी मागतो आणि तिथून निघून जातो. कालिया नागावरील या श्रीकृष्णाच्या विजयालाही नागपंचमी स्वरूपात साजरं केलं जातं. नागपंचमीला भावाचा दिवस किंवा भैया पंचमी असंही संबोधल जातं. बहिणी आपल्या भावांच्या रक्षणासाठी या दिवशी खास उपवास ठेवतात. फक्त भाजके पदार्थ खाऊन हा उपवास ठेवला जातो. तर ज्या मुलींना भाऊ नसतो त्या नागालाच आपला भाऊ मानून नागाची पूजा करतात. महाराष्ट्रात आजही मुली-सुना झाडांना झोके बांधून या दिवशी गाणी म्हणतात. नागाची पूजा करण्याआधी हाताला मेंदी लावतात. तसंच या दिवशी सुनांना माहेरीही पाठवण्याची प्रथा प्रचलित आहे.  

वाचा – Krishna Janmashtami Quotes In Marathi

नागपंचमीला काय करावं? | Nagpanchmi Do’s & Don’ts

Don’ts:

पूर्वीच्या काळी नागपंचमीच्या दिवशी अनेक गोष्टीचं कटाक्षाने पालन केलं जात असे. ज्यामध्ये त्या दिवशी शेतात नांगर न चालवणे, हत्यारं न वापरणं. पण आता नागपूजेसाठी नागदेवतेच्या फोटोची किंवा मातीपासून अथवा धातूपासून बनवलेल्या नागप्रतिमेची पूजा केली जाते. तसंच या प्रतिमेला दूध, लाह्यांचा आणि खीर असा नैवेद्य दाखवला जातो. आजही बऱ्याच घरात नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा करून चांदीच्या नागाचं दानही केलं जातं.

Do’s:

नागदेवतेची पूजा करण्यासाठी नागाला दूध पाजण्याची काहीच आवश्यकता नाही. काही काळांपर्यंत नागपंचमीला गारूडी हे साप घेऊन येत असत आणि सापांना दूध पाजले जात असे. पण ते चुकीचे आहे कारण नाग दूध पित नाही. याउलट दूध पाजल्याने नागाचा मृत्यू होतो. आता मात्र संशोधन आणि लोकजागृतीमुळे या चुकीच्या प्रथांना विराम मिळाला आहे. तसंच नागपंचमीच्या दिवशी विळीवर चिरू नये, काहीही कापू नये, तळू नये आणि चुलीवर तवा ठेवू नये असे संकेत पाळले जात असत. पण आताच्या काळात या गोष्टी शहरी भागात तरी पाळल्या जाणं शक्य नाही.

तुमची नागांवर खरंच श्रद्धा असल्यास शिवलिंगाला दूधाचं स्नान घालू शकता किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दूधाचं दानही करू शकता. कारण ती खऱ्या अर्थाने नागपंचमी ठरेल.

वाचा – कोजागिरी पौर्णिमा माहिती मराठी

नागपंचमीच्या निमित्ताने प्रचलित असलेलं लोकगीत | Famous Nag Panchami Song

वर उल्लेख केल्याप्रमाणे या दिवसाला भावाचा दिवस किंवा भैयापंचमीही म्हटलं जातं. नागालाच आपला भाऊ मानणाऱ्या बहिणींच्या अनुषंगाने आलेलं हे मराठी लोकगीत. (सौजन्य – विकिपीडिया )

नागभाऊरायाला नैवेद्य : नागपंचमीच्या गं दिवशी मी गं नेसले हिरवी साडी

नाग भाऊराया मला पाठवितो गं गाडी

नागपंचमीच्या दिवशी मी गं भरीला चुडा

नागा रे भाऊराया तुला नैवेद्य ताजा पेढा

तूच रे रक्षण करी माझा आईच्या गोताचा

नागा रे भाऊराया तुला नैवेद्य कढीचा

नागा रे भाऊराया तुला वहिल्या मी लाह्या

तुझ्या दर्शनाला आल्या शेजारच्या आया बाया

नागा रे भाऊराया तुला नैवेद्य गुळाचा

आता रक्षण करी माझ्या बंधूच्या कुळाचा

चल गं सये वारुळाला ,नागोबाला पूजायाला | ताज्या लाह्या वेचायाला हळदकुंकू व्हायला

या गं य गड्यांनो या गं या मैतरणी तेल्या तांबोळीच्या बाई वान्या बामणाच्या बाई

जमूनिया साऱ्याया जनी जावू बाई न्हवणा चल गं सये वारुळाला वारुळाला

हेही वाचा –

म्हणून मकर संक्रांतीला असतं तिळाचं महत्त्व…

मकरसंक्रांतीला संपूर्ण भारतात करण्यात येणारे ‘15’पदार्थ 

हलव्याच्या गोड दागिन्यांनी करा यंदाची संक्रात अधिक गोड

संक्रांतीला नेसण्यासाठी काळ्या रंगाच्या साड्यांचे ‘18’ प्रकार

Read More From आपलं जग