नियमित व्यायामामुळे शरीर आणि मन निरोगी राहते हे तर तुम्हाला माहीत असेलच. ह्रदयाचे आरोग्य राखण्यासाठी आणि मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी नियमित तीस मिनीटे व्यायाम करायलाच हवा. व्यायाम करण्याची योग्य वेळ कोणती याबाबत अनेक मतांतरे असू शकतात. कारण आजकालच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाला सकाळी व्यायामासाठी वेळ काढणं शक्य होईलच असं नाही. पण जर तुम्ही यासाठी संध्याकाळी व्यायाम करणार असाल तर झोपण्यापूर्वी तो करू नका. कारण झोपण्यापूर्वी व्यायाम करण्यामुळे शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात.
झोपण्यापूर्वी व्यायम केल्यामुळे काय होतं
दिवसभर कामात व्यस्त असल्यामुळे अनेकजण रात्री झोपण्यापूर्वी व्यायामासाठी वेळ काढतात. कारण तोच एक वेळ त्याच्यासाठी दिवसभरात निवांत वेळ असतो. मात्र एका संशोधनानुसार रात्री झोपण्यापूर्वी व्यायाम करणं तुमच्या आरोग्यासाठी मुळीच योग्य नाही. कारम यामुळे तुमच्या ह्रदयाच्या कार्यावर आणि झोपेवर दुष्परिणाम होऊ शकतो. काय होतं जेव्हा तुम्ही रात्री व्यायाम करून झोपता.
ह्रदयाचे ठोके वाढतात
या संशोधनानुसार जर तुम्ही रात्री व्यायाम करून झोपला तर तुमच्या ह्रदयाचे ठोके अचानक वाढू लागतात. ज्यामुळे तुम्हाला शांत झोप येत नाही. शिवाय व्यायामानंतर शरीर डिहायड्रेट होते, शरीरात स्ट्रेस हॉर्मोन्स निर्माण होतात ज्यामुळे तुम्हाला झोप लागणं शक्य नसतं. व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरात स्लीप हॉर्मोन्स तयार होत नाहीत. ज्याचा दुष्परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.
झोपेत खंड पडणे
व्यायाम केल्यामुळे तुमचे संपूर्ण शरीर सक्रिय होते. ह्रदयाचे कार्य जोरात सुरू होते. शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळते आणि रक्ताभिसरण सुधारते. झोपेसाठी या सर्व हालचाली योग्य नाहीत. कारण यामुळे तुमची झोपमोड होते आणि रात्रभर तुम्हाला झोप येत नाही.
व्यायामाआधी आणि नंतर कशी घ्यावी त्वचेची काळजी
मांसपेशी अशक्त होतात
व्यायामासाठी तुम्हाला कठीण मेहनत घ्यावी लागते. मात्र व्यायाम केल्यावर तुमच्या शरीराला मांसपेशींना आराम मिळण्यासाठी चांगली झोप मिळणं गरजेचं असतं. तुम्ही जर रात्री झोपण्यापूर्वी व्यायाम केला तर तुमच्या मांसपेशींवर ताण येतो आणि रात्री नीट झोप न लागल्यामुळे त्यांना आराम मिळत नाही. याचा परिणाम मांसपेशी अधिक अशक्त होतात.
खुर्चीवर बसून करा व्यायाम आणि कमी करा वजन
संध्याकाळी कधी करावा व्यायाम
याचा अर्थ तुम्ही फक्त सकाळीच व्यायाम करायला हवा असा नाही. कारण प्रत्येकाला सकाळी व्यायामासाठी वेळ काढता येईल असं नाही. तुम्ही जेवण आणि झोपण्यापूर्वी कमीत कमी तीन ते चार तास आधी व्यायाम करू शकता. याचा अर्थ संध्याकाळी चार ते सहा मध्ये व्यायाम करण्यास काहीच हरकत नाही. संध्याकाळी व्यायाम केल्यानंतर शांत झोप येण्यासाठी गरम पाण्याने अंघोळ करा.