Festive

चाहत्यांना घायाळ करेल श्वेता शिंदेचा साडीमधला हा दिलखेचक अंदाज

Trupti Paradkar  |  Nov 16, 2020
चाहत्यांना घायाळ करेल श्वेता शिंदेचा साडीमधला हा दिलखेचक अंदाज

मराठी मालिका ‘डॉक्टर डॉन’ला सध्या टेलिव्हिजनवर चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. मात्र त्यामागे मालिकेचं कथानक आणि इतर पात्रं जितकी कारणीभूत आहे, तेवढीच कारणीभूत आहे ‘डॉली बाई’.  या मालिकेत अभिनेत्री श्वेता शिंदे डॉली मॅडमची भूमिका साकारत आहे. या मालिकेतील तिचं नाव आहे डॉ. मोनिका श्रीखंडे मात्र प्रेक्षकांमध्ये ती डॉलीबाई या लाडक्या नावानेच जास्त प्रसिद्ध झाली आहे. सध्या महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर ही डॉलीबाई अधिराज्य गाजवतेय. तिचा अभिनय तसंच मालिकेतील दिलखेचक लुक प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला आहे. या भूमिकेसाठी श्वेता नेहमी साडीत वावरताना दिसते. श्वेताच्या सौंदर्य आणि अभिनयाचे अनेक चाहते आहेत. मात्र तिचा साडीमधला दिलखेचक अंदाज भल्या भल्यांना घायाळ करेल असा आहे. मालिकेच्या सुरूवातीलाच या लुकची तुलना सुश्मिता सेनसोबत करण्यात आली होती. ‘मै हुं ना’ या चित्रपटातील सुश्मिता सेनचा आणि डॉक्टर डॉन मालिकेतील श्वेता शिंदेचा लुक साधारण सेम आहे असं म्हटलं जात होतं. श्वेता मालिकेच्या शूटिंग व्यतिरिक्तदेखील बऱ्याचदा साडीमधले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. श्वेताचे हे लुक तुम्हीदेखील नक्कीच ट्राय करू शकता. म्हणूनच आम्ही तिचे काही निवडक लुक तुमच्यासोबत शेअर करत आहोत. 

लाल साडीतील अंदाज –

अलीकडेच मालिकेच्या एका शूटिंगच्या दरम्यान श्वेताने एक लाल साडीतील एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केले होते. लाल रंग हा अनेकांचा आवडता रंग असतो. श्वेताचाही हा रंग खूपच प्रिय आहे. शिवाय तो रंग तिच्यावर अधिक खुलून दिसतो असंही तिचं म्हणणं आहे. या लुकसाठी तिने प्लेन लाल रंगाची साडी परिधान केली आहे मात्र त्या साडीला अधिक उठावदार करण्यासाठी ब्लॅक व्हाईट प्रिंटेड ब्लाऊज तिच्यासोबत पेअर केला आहे. ज्यामुळे या साडीमधला तिचा लुक नेहमीपेक्षा हटके आणि दिलखेचक वाटत आहे. 

Instagram

ब्लू इंडिगो साडी –

जर तुम्हाला सर्वात हटके दिसायचं असेल तर साडीला पर्याय नाही. साडीमध्ये स्त्रीचं रूप नेहमीपेक्षा जास्त उठून दिसतं असं म्हणतात. श्वेता साकारत असलेल्या डॉ. मोनिकाला या मालिकेत ग्लॅमरस आणि हॉट दाखवण्यात आलं आहे. ज्यासाठीच तिचे लुकही स्पेशल आहेत. या मालिकेसाठी श्वेताने परिधान केलेली ही ब्लू इंडिगो साडी आणि त्यावर कॅरी केलेली सिंपल ऑक्सडाईज ज्वैलरी या लुकला परिपूर्ण करत आहे. 

Instagram

शिफॉन बांधणी साडी –

एखाद्या भूमिकेसाठी अभिनेत्रीचं आकर्षक सौंदर्य आणि सुडौल बांधा दाखवण्यासाठी शिफॉनच्या साड्या नेहमीच चित्रपटात वापरण्यात येत असतात. या मालिकेत श्वेतानेही अशाच साड्या जास्त प्रमाणात वापरलेल्या आहेत. श्वेताने परिधान केलेली ही शिफॉनची बांधणी प्रिंटची साडी आणि कॉन्ट्रॉस्ट ब्लाऊज तुम्हाला नक्कीच आवडेल. एखाद्या रोमॅंटिक डेटवर असा लुक करण्यास काहीच हरकत नाही. 

Instagram

यलो आणि पिंक ट्रेडिनशल साडी –

जर तुम्हाला शिफॉन अथवा प्लेन साडया नेसायच्या नसतील तर तुम्ही श्वेताप्रमाणे असा थोडा ट्रेडिशनल आणि स्टायलिश लुकही करू शकता. श्वेताने ही साडी तिच्या शूटिंगसाठी नेसलेली नाही तर नवरात्रीच्या सणाला नेसून हा फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. त्यामुळे सणासुदीला अथवा लग्नसमारंभात असा लुक करण्यात काहीच हरकत नाही.

Instagram

पारंपरिक इरकल साडी –

पैठणी, बनारसी, इरकल अशा काही साड्या आहेत ज्यांची फॅशन कधीच जुनी होत नाही. शिवाय या साडया कितीही नेसल्या तरी महिलांचं त्याच्यावरील प्रेमही कमी होत नाही. श्वेतालाही अशा ट्रेंडिशनल साडया खूप आवडतात. या जांभळ्या इरकल सोबत तिने मॅचिंग ब्रॉकेड ब्लाऊज घातल्यामुळे या साडीला एक छान गेटअप मिळाला आहे. शिवाय यावर तिने घातलेली मोत्याची नथ आणि नेकपिस यामुळे ती यात अधिकच सुंदर दिसत आहे. 

 

Instagram

श्वेताचे असेच पारंपरिक आणि मॉर्डन लुक ती सतत तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. तुम्हाला हे लुक कसे वाटले हे आम्हाला कंमेटच्या माध्यमातून नक्की कळवा. शिवाय असे लुक केल्यावर मायग्लॅमचे मेकअप प्रॉडक्ट वापरायला मुळीच विसरू नका. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

हॅंडलूम इकत साडी आणि ओढण्यांची कशी घ्यावी काळजी

पवित्रा पुनियाचे हॉट बॅकलेस ब्लाऊज डिझाईन्स, तुम्हालाही पाडतील भुरळ

लखनवी कुडते, पलाझो पँट्स दिवाळीसाठी आहे बेस्ट पर्याय

Read More From Festive