नुकतचं नेहा कक्करचं रोहनप्रीतसिंगसह दणक्यात लग्न झालं. त्यापूर्वी #NehuDaVyah हा अल्मबही रिलीज करण्यात आला होता. नेहा नेहमीच आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रसिद्ध होते. नेहा आणि हिमांश कोहलीचं ब्रेकअप झालं तेव्हाही नेहाबद्दल उलटसुलट छापून आलं होतं. मात्र आता नेहा आणि रोहनप्रीतने आपल्या संसाराला सुरूवात केली आहे. पण नेहा आणि रोहनप्रीतच्या वयामध्ये सात वर्षांचं अंतर आहे. आजही मुलगी मोठी असेल तर नक्कीच सर्वांच्या भुवया उंचावल्या जातात. प्रेम कधी, कुठे, कोणावर आणि का होईल याचा अंदाज लावणं कठीण आहे. प्रेमाला वय, जात, धर्म काहीच नसतं असं नेहमीच म्हटलं जातं. पण सध्या पाहिलं तर आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या मुलीच्या प्रेमात मुलं असल्याचं प्रमाणही वाढल्याचं दिसून येत आहे. तर सेलिब्रिटींच्या बाबतीत हे प्रकर्षाने दिसून येत आहे. अशाच काही जोड्यांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
मलायका – अर्जुन
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं नातं आता कोणाहीपासून लपून राहिलेलं नाही. 47 वर्षांची मलायका तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूरला डेट करत आहे. अजूनही या जोडीने लग्नाबद्दल कोणतेही प्लॅन्स सांगितले नसले तरीही हे एकत्र असून त्यांचे फोटोही व्हायरल होत असतात. 12 वर्षांची गॅप ही नक्कीच खूप मोठी मानली जाते. मलायकाचं पहिलं लग्न अरबाज खानबरोबर झालं होतं आणि त्यांना अरहान नावाचा मुलगाही आहे तर अर्जुन अविवाहित आहे. त्यामुळे या दोघांनी नात्याबाबत मोकळेपणाने सांगितले असता अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या.
सेलिब्रिटीची पसंती ठरतेय महाराष्ट्रीयन खणाची साडी
सुष्मिता – रोहमन
मिस युनिव्हर्स सुष्मिताचे अनेक चाहते आहेत आणि रोहमन शॉल हादेखील त्यातलाच एक. पेशाने मॉडल असणाऱ्या रोहमनने सुष्मिताचं मन जिंकून घेतलं आणि सुरूवातीला त्याने आपलं वयही तिच्यापासून लपवलं होतं. सुष्मिता 44 वर्षांची असून रोहमन मात्र केवळ 29 वर्षाचा आहे. रोहमन आणि सुष्मिता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असून दोघेही सुष्मिताने घेतलेल्या दत्तक मुलींचा सांभाळ करत आहेत. या दोघांच्या लग्नाकडेही सध्या त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण सुष्मिता आणि रोहमन दोघेही सोशल मीडियावर नेहमीच एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करताना दिसून येतात. तर रोहमन नेहमीच सुष्मिताची स्तुती करतानाही दिसतो. इतकंच नाही तर सुष्मिताबद्दल नेहमीच रोहमन पोस्ट करतानाही दिसतो. मध्यंतरी या दोघांच्या नात्यात दुरावा आला आहे असं दिसलं होतं. पण पुन्हा हे दोघं एकत्र दिसल्याने चाहत्यांनाही आनंद झाला.
गळ्यात मंगळसूत्र दिसल्याने या मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चेला उधाण
गौहर – झेद
येत्या 22 नोव्हेंबरला गौहर खान आणि झेद दरबार लग्न करणार असल्याच्या सध्या चर्चा आहेत. मात्र या दोघांनीही याबाबत खुलासा केलेला नाही. गौहर आणि झेद एकमेकांबरोबरचे अनेक व्हिडिओ शेअर करत असतात. तर #GaZa हा हॅशटॅगही वापरतात. गौहरपेक्षा झेद 12 वर्षांनी लहान असून तो केवळ 25 वर्षांचा आहे. तर इस्माईल दरबार यांचा मुलगा असला तरीही त्याने डान्समध्ये वेगळं नाव कमवायला सुरूवात केली आहे. झेद नेहमीच गौहरबरोबर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत आपलं प्रेम व्यक्त करत असतो. तसंच त्याने कधीही गौहरवरील आपल्या प्रेमाचा नकारही दिलेला नाही. त्यामुळे लवकरच या दोघांनाही लग्नबंधनात अडकलेले पाहायला मिळेल असे त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘मिर्झापूर 2’ ची चर्चा
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje