मनोरंजन

लॉकडाऊन नियम मोडल्याने लग्नानंतर 9 दिवसातच सुगंधा मिश्राविरोधात FIR दाखल

Dipali Naphade  |  May 6, 2021
लॉकडाऊन नियम मोडल्याने लग्नानंतर 9 दिवसातच सुगंधा मिश्राविरोधात FIR दाखल

कॉमेडियन आणि अभिनेत्री सुगंधा मिश्रा (Sugandha Mishra) आणि कॉमेडियन संकेत भोसले (Dr. Sanket Bhosale) यांचे 9 दिवसांपूर्वी अर्थात 26 एप्रिलला पंजाबमधील फगवाडा येथील कबाना रिसॉर्टमध्ये लग्न झाले. मात्र आता सुगंधा आणि संकेतला हे लग्नाचे फोटो शेअर करणे चांगलेच महागात पडणार असे दिसून येत आहे. सुगंधा मिश्रावर लॉकडाऊन काळात लग्नाला 40 पेक्षा अधिक माणसे बोलावल्याबद्दल FIR दाखल करण्यात आली आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी आलेल्या पाहुण्यांना संपूर्ण एक दिवस क्वारंटाईन ठेवण्यात आले होते. हे लग्न डिसेंबरमध्ये होणार होते. मात्र कोरोनामुळे हे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. या लग्नसोहळ्यात आलेल्या सर्व पाहुण्यांची अँटिजेन टेस्टही झाली होती आणि अगदी कुटुंबातील जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्येच हा लग्नसोहळा पार पडला असंही सांगण्यात आलं. मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार चित्र काहीतरी वेगळंच होतं असंही आता समोर आलं आहे. 

‘माझ्या शरीरात पवित्र रक्त आहे, म्हणून मला कोरोना होत नाही’, राखीचं अजब वक्तव्य

100 पाहुणे बोलावले असल्याचे पोलिसांचे म्हणणे

पंजाबमधील फगवाडा येथे या दोघांचे लग्न पार पडले. लग्नाला केवळ 40 लोकांची उपस्थिती असणे गरजेचे आहे. मात्र या लग्नाला 100 लोकांची उपस्थिती असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे आणि म्हणूनच सुगंधाविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. सुगंधा आणि संकेत दोघेही सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहेत. पण आता या दोघांनाही आपल्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करणे चांगलेच महागात पडणार असल्याचं दिसून येत आहे. लॉकडाऊनचे नियम उल्लंघन केल्याप्रकरणी आता एफआयआर दाखल करण्यात आली असली तरीही अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तसंच संकेत आणि सुगंधा या दोघांपैकी कोणीही यावर अजूनही आपलं वक्तव्य आणि आपली बाजू स्पष्ट केलेली नाही. दोघेही अत्यंत प्रसिद्ध असून आपल्या चाहत्यांसाठी दोघांनीही सोशल मीडियावर आपल्या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षावही झालेला सोशल मीडियावर दिसून आला. याला मात्र आता गालबोट लागलेलं दिसून आलं आहे.

कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले अडकले लग्नाच्या बेडीत

हॉटेलवरही होणार कारवाई

सुगंधाच्या लग्नात जास्त माणसं असल्याचे लक्षात आल्यानंतर पंजाब फगवाडा पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे. तसंच ज्या हॉटेलमध्ये सुगंधाच्या लग्नासाठी माणसं थांबली होती. त्या कबाना रिसोर्टवरही पोलीस कारवाई करणार असल्याचे ऐकिवात आहे. त्यामुळे आता हॉटेलही अडचणीत येण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणार असून आता सुगंधा आणि संकेतवर नक्कीच लग्नानंतर काहीच दिवसात मोठं संकट उभं राहिलं असल्याचे दिसून आले आहे. वधू पक्ष, वर पक्ष आणि हॉटेल प्रशासन या सगळ्यांवरच पोलिसांनी एफआयआर दाखल केली असून आता नक्की या प्रकरणात पुढे काय होणार याची चिंता या दोघांच्या चाहत्यांनाही आहे. नवीनच लग्न झालेल्या या जोडप्याच्या आनंदावर एक प्रकारचे विरजणच पडले असल्याचंही चाहत्यांना वाटते आहे. सध्या कोणालाही अटक करण्यात आली नसली तरीही लग्नाचे व्हिडिओ शेअर करणं नक्कीच या जोडीला आता भारी पडणार असं दिसून येत आहे.

लग्नाच्या काही दिवसानंतर कॉमेडियनला जाणवले लग्नाचे साईड इफेक्टस, व्हिडिओ व्हायरल

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन