भारतीय खाद्यपदार्थांमध्ये मटारचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. भाजी, पुलाव, बिर्याणी, पराठा अशा अनेक खाद्यपदार्थांमध्ये मटार वापरले जातात. एवढंच नाही तर पोहे, उपमा, कटलेट, समोसा, पॅटिस अशा विविध नाश्त्याच्या डीशमध्ये अनेकांना मटार लागतोच. मटार हिवाळ्यात खूप स्वस्त असतात, मात्र जसा जसा सीझन संपत जातो तस तशी मटारची किंमत वाढत जाते. महाग असल्यामुळे मग स्वयंपाकासाठी फ्रोझन मटारचा वापर जास्त केला जातो. अनेक लोक हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर मटार खरेदी करतात आणि ते डीप फ्रीजमध्ये साठवून ठेवतात. गरजेनुसार मटारचा वापर स्वयंपाकात केला जातो. मात्र असं फ्रोजन मटार खाणं आरोग्यासाठी योग्य आहे का, जाणून घ्या… तसंच वाचा या आरोग्यदायी टिप्स मराठी | Health Tips In Marathi
फ्रोजन मटार कशी तयार केली जाते
वास्तविक कोणतीही भाजी अथवा फळं ही त्या त्या सीझनमध्ये खावीत. मटारचा सीझन हिवाळ्यात असल्यामुळे या काळात मटार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. या काळात मिळणारे ताजी मटार अनेक लोक डीप फ्रीज करून ते साठवून ठेवतात. कधी तरी असे फ्रोजन मटार स्वयंपाकासाठी वापरण्यास काहीच हरकत नाही. मात्र तुम्ही दररोज असे मटार खाल्ले तर ते आरोग्यासाठी मुळीच योग्य नाही. कारण साठवून ठेवण्यासाठी मटारवर प्रक्रिया केली जाते, शिवाय त्यातील पोषक मुल्येही कालांतराने कमी होतात. ज्यामुळे मटार खाण्याचे फायदे तुम्हाला मिळू शकत नाहीत. असे मटार चवीला वेगळे लागतात. ज्यामुळे पदार्थांची चव बदलते.
फ्रेश मटार खाण्याचे फायदे
ताजे मटार हे तुम्ही फक्त हिवाळ्यातच खाऊ शकता. त्यानंतर काही ठिकाणी कमी प्रमाणात आणि जास्त किंमतीत तुम्हाला ताजे मटार मिळतात. जर तुम्हाला मटार खायचे असतील तर ते महाग असले तरी ताजेच खावे. कारण ते फ्रोजन मटारपेक्षा आरोग्यासाठी चांगले असतात.मटारमुळे तुमच्या शरीराला पुरेसे प्रोटीन्स मिळतात. मटारमुळे तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. यात भरपूर फायबर्स असल्यामुळे पचनसंस्थेवर चांगला परिणाम होतो.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक