DIY लाईफ हॅक्स

सतत लागलेली उचकी थांबवण्यासाठी करा सोपे उपाय

Dipali Naphade  |  Apr 2, 2020
सतत लागलेली उचकी थांबवण्यासाठी करा सोपे उपाय

 

बऱ्याचदा उचकी लागली की पटकन आपल्याला सांगितलं जातं अरे पाणी पी किंवा वर बघ अथवा जरा श्वास रोखून धर. असं केल्याने उचकी थांबते. पण कधीकधी उचकी थांबतच नाही. मग असं असताना त्यावर नक्की काय उपाय करायचा हे माहीत नसतं. उचकी सतत लागणे हा खरं तर एक प्रकारचा आजारच आहे. पण अर्थातच हा गंभीर आजार नाही. काही उचकी येणे उपाय करून ही उचकी थांबवता येऊ शकते. हे उपाय अगदी सोपे आणि सहज करता येण्यासारखे आहेत. प्रत्येक वेळी पाणी हा उचकीवरील उपाय असू शकत नाही. उचकी ही कधीही येते. पण जेव्हा ती येते तेव्हा ती थांबेपर्यंत मात्र आपला जीव कासावीस होतो. अस्वस्थता येते हेदेखील तितकेच खरे. त्यामुळे तुम्हालाही कधी उचकीचा त्रास झाला तर आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय या लेखात सांगणार आहोत ते तुम्ही नक्की करून बघा आणि तुमची उचकी थांबवा. विशिष्ट चवीचा पदार्थ खाल्ल्यानंतर  उचकी थांबते अथवा तुमच्या श्वासाची गती बदलली तर उचकी पटकन थांबते. त्यामुळे असे सोपे उपाय कोणते आहेत ते पाहूया. 

साखर खा

Shutterstock

 

उचकी लागल्यानंतर तुम्ही थोडीशी साखर खा. साखर खाल्ल्याने उचकी थांबते. साखरेची चव वेगळी असल्याने ती चव घेताना श्वासाच्या गतीमध्ये बदल होतो आणि उचकी थांबते. नुसती साखर नको असेल तर पाण्यात साखर आणि थोडं मीठ घालून ते पाणी प्या. उचकी त्वरीत थांबते. 

‘या’ 6 पद्धतीने साखर देते तुमच्या त्वचेला रोज नवी चमक

श्वास रोखा

Shutterstock

 

कधी कधी पाणी पिण्याने उचकी थांबत नाही अशावेळी श्वास काही सेकंदासाठी तुम्ही रोखून धरा. पण श्वास का रोखायचा याचं कारण माहीत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. श्वास रोखल्याने फुफ्फुसात हवा भरून राहते आणि उचकी थांबण्यास मदत होते. तसंच यामुळे श्वासाच्या गतीमध्येही बदल होतो आणि उचकी थांबण्यास मदत मिळते. 

मीठ

Shutterstock

 

नुसते मीठ खा अथवा मीठाचे पाणी उचकी लागल्यावर प्या. यामुळे उचकी लगेच थांबते. नुसतं मीठ खाणं काही जणांना शक्य नसते. त्यामुळे मीठाचे पाणी तोंडात घेऊन ते काही वेळ तोंडात ठेवा आणि गिळून टाका. असं केल्याने तुमची उचकी लगेच थांबते. 

मध आणि लिंबू

Shutterstock

 

नुसती लिंबाची फोड करून ती चाटली तरीही उचकी थांबते. पण तुम्हाला नुसतं लिंबू चाखायला आवडत नसेल तर लिंबाचा रस आणि मध एकत्र करून तुम्ही चाटण तयार करून घ्या आणि हे चाटण तुम्ही उचकी लागली असेल तर जिभेवर लावून हळूहळू चाटा. यामुळे उचकी थांबण्यास मदत मिळते. 

चहामध्ये साखरेपेक्षा वापरा मध, जाणून घ्या फायदे

चॉकलेटची पावडर

Shutterstock

 

घरात चॉकलेटची पावडर असेल तर उचकी लागल्यावर एक चमचा ही चॉकलेट पावडर तुम्ही खा. यामुळे उचकी थांबते. चॉकलेटची पावडर किमान या कारणासाठी तरी घरात ठेवणं आवश्यक आहे. 

काळी मिरी आणि खडीसाखर

Shutterstock

 

काळी मिरीचे साधारण 3-4 दाणे आणि खडीसाखर तुकडा तोंडात घेऊन उचकी लागल्यावर चावावे. यानंतर दोन ते तीन घोट पाणी प्या. या उपायाने उचकी पटकन थांबेल.  काळी मिरी सहसा खाणं बऱ्याच जणांना शक्य नसतं. पण उचकी थांबतच नसेल तर तुम्ही शेवटचा पर्याय म्हणून हा पर्याय निवडू शकता. 

जेवणात स्वाद वाढवण्यासह काळी मिरीचे फायदे (Benefits Of Black Pepper In Marathi)

हे सर्व करून पाहिल्यानंतरही उचकी थांबली नाही तर मात्र तुम्ही नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या. पण या सर्व घरगुती उपायांनी उचकी थांबल्याचा अनुभव बऱ्याच जणांचा आहे. 

Read More From DIY लाईफ हॅक्स