मागच्या महिन्यात आपल्या आई-वडिलांना 10 दिवसांच्या फरकाने गमावलेला अभिनेता गौरव चोप्राच्या (Gaurav Chopraa) आयुष्यात एक उदासीनता आली होती. मात्र आता हे दुःखाचे दिवस उलटून सुखाचे दिवस आले आहेत. गौरवच्या घरी एका गोड मुलाचा जन्म झाला आहे. गौरवने स्वतः याबाबत माहिती देत आपल्या आयुष्यातील तीन महत्त्वाच्या दिवसांची भावनात्मक पोस्ट शेअर केली आहे. 14 सप्टेंबरला गौरवच्या मुलाचा जन्म झाला असून गौरव अत्यंत आनंदी आहे. यानंतर गौरवच्या मित्रमैत्रिणींनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर गौरवने सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत धन्यवाद म्हटले आहे.
‘बिग बॉस 14’ मधील सर्व स्पर्धकांची होणार कोरोना चाचणी, राहणार क्वारंटाईन
भावनात्मक पोस्ट केली शेअर
गौरव आणि त्याची पत्नी हितिशा चेरांदा हे दोघेही आपल्या मुलाच्या येण्याने अत्यंत आनंदी आहेत. गौरवने सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त करत भावनात्मक पोस्ट लिहिली आहे. आपल्या पत्नीलादेखील त्याने धन्यवाद दिले आहेत. ‘19 आणि 29 ऑगस्ट आणि 14 सप्टेंबर या तिन्ही तारखा आपल्या आयुष्यात कायम लक्षात राहतील. हे तिन्ही दिवस कायम खास असतील. या तिन्ही दिवसांनी मला आयुष्याची गणितं आणि खरा अर्थ समजावला आहे. इतक्या कमी दिवसात माझ्यासाठी ही एक रोलर कोस्टर राईड होती. कधीही न संपणारे असे चक्र, भावनिक आणि शारीरिक अशा दोन्ही बाजूंनी देवाने माझी परीक्षा घेतली. आज आम्हाला आयुष्यात एक आशिर्वाद मिळाला आहे. दरवाजावर लागलेले हे दोन प्ले कार्ड्स – सकाळ आणि दुपारदरम्यान सर्व काही बदलून गेलं. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल आणि प्रार्थनांबद्दल खूप खूप आभार’.
गेल्या एक महिन्यात गौरव चोप्रासाठी आयुष्य अत्यंत चढउताराचं राहिलं आहे. दहा दिवसांच्या फरकात त्याने आपले आई-वडील गमावले. त्यानंतर गौरवसाठी सर्वच दिवस आव्हानात्मक होते. मात्र आता बाळाच्या येण्याने या दुःखावर नक्कीच फुंकर घातली जाईल अशी अपेक्षा गौरवचे चाहते करत आहेत. तसंच गौरवला अधिक प्रेरणा आणि शक्ती मिळावी अशीही आशा व्यक्त करत आहेत.
आलिया भट आणि रणबीर कपूरच्या ब्रम्हास्त्रचं बजेट होणार कट
आई-वडिलांची कमतरता जाणवते
मागच्या महिन्यात गौरवने आपल्या आईवडिलांसाठी एक भावनात्मक पोस्ट लिहिली होती. यात गौरवने आपल्या आईवडिलांचा उल्लेख करत आपली आई कशा प्रकारे नेहमी हसतमुख राहयची हे सांगितलं होतं. गौरवच्या आईला कॅन्सर होता आणि गेले तीन वर्ष ती कॅन्सरशी लढा देत होती. पण तिने कधीही हिंमत सोडली नाही आणि नेहमी हसतमुख राहत तिने लढा दिला. तिला आपल्या वडिलांनी नेहमीच साथ दिली आणि त्यांच्या जाण्यानंतर आई-वडिलांची कमतरता नक्की काय असते याची जाणीव होत असल्याचे सांगितले. आपले वडील आपल्यासाठी नेहमीच आदर्श होते, हिरो होते असंही गौरवने म्हटलं.
करण जोहरच्या घरात झालेल्या ‘त्या’पार्टीची होणार चौकशी
गौरव चोप्रा टी.व्ही.वरील प्रसिद्ध नाव
गौरव चोप्राने आतापर्यंत अनेक मालिकांमधून काम केले आहे. नुकतेच ‘संजीवनी’ मालिकेतही गौरवची प्रमुख भूमिका होती. तत्पूर्वी ‘अघोरी’, ‘पिया का घर’, ‘उतरन’ या मालिकांमधून अभिनयाने गौरवने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. तर ‘नच बलिये’ च्या दुसऱ्या सीझनमध्ये आपली पूर्व प्रेमिका नारायणी शास्त्रीसह गौरवने सहभाग घेतला होता आणि त्यावेळीही प्रेक्षकांसह परीक्षकांची मनं जिंकून घेतली होती. तर बिग बॉसच्या दहाव्या सीझनमध्येही गौरव दिसला होता. हितिशा आणि गौरवला ‘POPxo मराठी’ कडून शुभेच्छा!
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade