अॅस्ट्रो वर्ल्ड

या सवयी असतील तर तुमच्याजवळ कधीच वाढणार नाही पैसा

Leenal Gawade  |  Dec 1, 2021
चुकीच्या सवयी

 पैसा ही एक अचल संपत्ती आहे. पण सगळ्यांना आपल्याकडे पैसा खेळता असावा असे सगळ्यांना वाटते. आपण कमाई केलेला पैसा आपल्याकडे टिकू द्यायला हे सर्वस्वी आपल्या हातात असते. पण असे म्हणतात की, काही आपल्याच सवयी आपला पैसा जाण्यासाठी कारणीभूत ठरतात. लक्ष्मी त्यांच्याचकडे टिकते जे त्याची योग्य ती काळजी घेतात. प्रत्येकाच्या सवयी या वेगवेगळ्या असतात. पण आपल्याच काही नकारात्मक सवयी या पैसा न टिकण्यासाठी कारणीभूत असतात. तुम्हालाही अशा काही सवयी असतील तर तुम्ही त्या आताच बदलायला हव्यात. कारण अशा सवयींमुळेच लक्ष्मी प्रसन्न राहील.

जाणून घ्या राशीनुसार कोणता रंग आहे तुमच्यासाठी शुभ

सवय क्रमांक 1 – हात-पाय न धुता झोपणे

हात-पाय धुण्याची सवय

खूप जणांना घरी आल्यानंतर अगदी आवर्जून हातपाय धुवायला आवडतात. तर काही जण बाहेरुन आल्यावर अजिबात हातपाय धूत नाही. अशा लोकांकडे संपत्ती टिकत नाही. ज्यांना तसेच हातपाय घेऊन झोपायची सवय असते त्यांना हे नक्की जाणवेल. अशा लोकांना पैशांची चणचण सतत जाणवत राहते. ‘स्वच्छता जिथे लक्ष्मी तिथे’ असे म्हणतात ते यासाठीच बेडरुम हे असे ठिकाण आहे जिथे आपण आपले कपाट आणि पैसे ठेवतो. अशाच ठिकाणी जर आपण अस्वच्छ राहिलो तर संपत्ती कशी काय टिकेल? त्यामुळे तुम्ही जेव्हा बाहेरुन घरात याल त्यावेळी तुम्ही हात पाय स्वच्छ धुवा

सवय क्रमांक 2- नखं चावणे

 खूप जणांना नखं चावायची सवय असते. खूप जणांना सतत नख कुरतडायला आवडतात. पण ही सवय तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्याजवळील लक्ष्मीसाठीही अजिबात चांगली नाही. नखं चावणे हे चंचल आणि असमाधानाचे लक्षण मानले जाते. ज्या व्यक्ती समाधानी नाहीत अशांकडे पैसा अजिबात टिकत नाही. अशांना सतत काहीतरी हवे असे असते. लक्ष्मी त्यांच्याकडेच राहते. ज्या समाधानी असतात. तुम्हाला नखं चावण्याची सवय असेल तर ती आताच सोडा. तुम्हाला तुमच्याकडील असलेल्या संपत्तीत झालेला फरक नक्कीच जाणवेल.

सवय क्रमांक 3- शिव्या देणे

खूप जणांना क्षुल्लक कारणावरुन शिव्या देण्याची सवय असते. कोणत्याही भरल्या घरात सतत शिवीगाळ करणे हे चांगले लक्षण मानले जात नाही. अशामुळे घरात शिव्या देण्याची किंवा नाहक भांडणाची सवय झाली असेल तर त्या घरात नकारात्मक उर्जा अधिक वास करते. नकारात्मक उर्जा जिथे तिथे लक्ष्मी राहात नाही. त्यामुळे तुम्ही जर विनाकारण आणि सतत शिव्या देऊन भांडण करत असाल तर ती योग्य वेळी थांबवणे फार जास्त गरजेचे आहे. ज्या व्यक्ती अशा करत असतील त्यांना तुम्ही योग्यवेळी रोखा

सवय क्रमांक  4 – पैशांचा गैरवापर

पैशांचा गैरवापर

पैसा हा चंचल आहे. त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी झाला तर तो तुम्हाला मिळत राहतो. पण जर तुम्ही पैशाचा उपयोग हा गैरव्यहार किंवा दुसऱ्यांना त्रासदायक अशा गोष्टींसाठी करत असाल तर तुम्हला त्यापासून कोणताही फायदा होणार नाही. पैशांचा गैरवापर म्हणजेच जुगार आणि वाईट मार्गाने कमावलेला पैसा हा अजिबात पचत नाही आणि तो टिकत नाही हे लक्षात ठेवा. तुमच्याकडे सत्मार्गाने आणि मेहनतीने आलेला पैसा असेल तर तो अधिक टिकण्यास मदत मिळते. 

सवय क्रमांक 5 –  अस्वच्छ कपडे घालणे

कपडे हे नेहमी स्वच्छ असायला हवेत. जर तुम्ही स्वच्छ कपडे परिधान करत नसाल तर तुमच्याकडे लक्ष्मी टिकणार नाही. कारण स्वच्छतेतच लक्ष्मी वास करते. खूप जणांना एकदा काढलेले कपडे धुण्यास टाकण्याचा कंटाळा असतो. जर असा कंटाळा तुम्ही करत असाल तर तुम्हाला ही सवय आताच बदलायला हवी. कारण यामुळेच तुमच्याकडे पैसा टिकत नाही. 

आता या सवयी तुम्हालाही असतील तर तुम्ही आताच या सवयी बदला. बघा तुमच्याकडेही लक्ष्मी टिकेल. 

अधिक वाचा

घरात सकारात्मक उर्जा टिकून राहण्यासाठी टाळा या गोष्टी

घरातील तुळस सतत देत असेल हे संकेत तर करु नका दुर्लक्ष

Read More From अॅस्ट्रो वर्ल्ड