Care

स्मूथ आणि सिल्की केस हवे, मग हेअर कंडिशनर लावताना टाळा ‘या’ चुका

Trupti Paradkar  |  Jul 27, 2020
स्मूथ आणि सिल्की केस हवे, मग हेअर कंडिशनर लावताना टाळा ‘या’ चुका

केसांची स्वच्छता आणि निगा राखण्यासाठी शॅम्पू(Hair Shampoo) आणि कंडिशनर(Hair Conditioner) वापरणं गरजेचं आहे. शॅम्पू केल्यावर केसांना घरगुती कंडिशनर लावल्यामुळे तुमचे केस मऊ आणि मुलायम होतात. केस स्मूथ आणि सिल्की करण्यासाठी कंडिशनर फायद्याचं ठरतं. मात्र बऱ्याचजणींना कंडिशनरचा वापर नेमका कसा करावा हे माहीत नसतं. कंडिशनर लावताना केलेल्या चुकांचा वाईट परिणाम तुमच्या केसांवर होतो. कंडिशनर लावताना ते चुकीच्या पद्धतीने लावण्यामुळे तुमचे केस गळू शकतात. यासाठी जाणून घ्या स्मूथ आणि सिल्की केसांसाठी कंडिशनर लावताना काय करणे टाळावे.

ओल्या केसांवर कंडिशनर लावू नका –

कंडिशनर हे केसांना योग्य पोषण मिळावे यासाठी लावायचे असतं. शॅम्पू केल्यावर बऱ्याचजणी ओल्या केसांवरच कंडिनशर लावतात मात्र हे फारच चुकीचे आहे. कंडिशनर लावण्यापूर्वी केसांमधील पाणी हळूवार पिळून अथवा हातांच्या मदतीने अलगद काढून टाकणं गरजेचं असतं. शक्य असल्यास धुतलेल्या केसांमधील पाणी टॉवेलने टिपून घ्यावं आणि मगच केसांवर कंडिशनर लावावं.

केसांच्या मुळांना कंडिशनर लावू नये –

कंडिशनरचा वापर केसांच्या मुळांवर कधीच करू नये. कंडिनशर नेहमी केसांच्या मध्यापासून टोकांकडे लावावं. शिवाय तुमच्या कंडिशनरच्या उत्पादनावर ते कितीवेळ केसांवर ठेवावं हे दिलेलं असेल त्यानुसार तितकाच वेळ ते केसांवर असू द्यावं. जास्त वेळ ठेवल्यास तुमच्या केसांचे नुकसान होऊ शकते. जर कंडिशनरवर वेळ दिलेली नसेल तर जास्तीत जास्त दोन ते तीन मिनीट कंडिशनर केसांवर ठेवून लगेचच केस धुवून टाकावेत.

केसांचा गुंता आधी सोडवून घ्यावा –

शॅम्पू करताना तुमचे केस गुंतण्याची शक्यता असते. अशावेळी गुंतलेल्या केसांवर कंडिशनर लावू नये. कंडिनशरचा वापर करण्यापूर्वी तुमचे मोठ्या दातांच्या कंगव्याने सोडवून घ्यावेत. मगच त्यांच्यावर कंडिशनर लावावं. असं केल्यामुळे केसांवर कंडिशनर व्यवस्थित लागेल आणि त्याचा चांगला फायदा तुम्हाला मिळेल. जर तुमचे केस जाड आणि कुरळे असतील तर ते कंडिशनर लावल्यानंतरही पुन्हा विंचरा ज्यामुळे ते गुंतणार नाहीत.

कंडिशनरमध्ये गुलाबपाणी मिसळून ते वापरा –

केसांना कंडिनशर लावल्यावर तुम्हाला तुमचे केस मस्त स्मूथ आणि शाईनी व्हावे असं वाटत असेल तर ही सोपी युक्ती फॉलो करा. तुमच्या कंडिनशरमध्ये चार ते पाच थेंब गुलाबपाणी मिसळा. गुलाबपाणी हे एक नैसर्गिक कंडिशनर आहे. कंडिनशरमध्ये गुलाबपाणी मिसळल्यामुळे तुमचे केस छान मऊ आणि मुलायम होतात.

कंडिशनर प्रमाणातच वापरा –

एखादे उत्पादन जास्त प्रमाणात वापरल्यामुळे जास्त चांगला फायदा होईल असे आपल्याला नेहमीच वाटत असते. मा्त्र हा एक गैरसमज आहे. कारण कोणतेही उत्पादन अती प्रमाणात वापरल्यास त्यामुळे तुमच्या केसांचे नुकसान होऊ शकते. यासाठी योग्य प्रमाणातच कंडिनशर केसांवर लावा. चांगल्या फायद्यासाठी केसांचे दोन भागात विभाजन करा आणि दोन्ही भागांवर अर्धे अर्धे कंडिशनर लावा. ज्यामुळे ते केसांवर व्यवस्थित लागेल.केसांची योग्य निगा राखण्यासाठी या टिप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरू शकतील. जर तुमचे केस अती प्रमाणात गळत असतील तर तुम्ही तुमच्या केसांची निगा राखताना नेमक्या काय चुका करत आहात हे तुम्हाला माहीत असायला हवं. 

आम्ही दिलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्या फॉलो करून तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

अधिक वाचा –

केस आणि नखं मजबूत करण्यासाठी तुमच्या आहारात करा असे बदल

महागड्या ब्युटी ट्रिटमेंटने नाही तर चक्क बेसनाने करा केस चमकदार

चमकदार आणि मुलायम केसांसाठी ट्राय करा मेंदीसह हेअर पॅक्स

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

Read More From Care