मनोरंजन

राणा दा- अंजलीचा हा रॉयल लुक होतोय व्हायरल, एकदा पाहाच

Leenal Gawade  |  Jun 29, 2022
हार्दिक- अक्षया

राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी ( Hardeek Joshi)  आणि अंजली बाई म्हणजेच अभिनेत्री  अक्षया देवधर (Akshaya Devdhar) यांच्या नव्या व्हिडिओची चर्चा सध्या सगळीकडे होताना दिसतेय. काही महिन्यापूर्वी त्यांनी साखरपुडा करुन चाहत्यांना धक्का दिला होता. आता हा त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ तर नाही ना? अशी चर्चा रंगू लागली आहे. रॉयल अवतारात ही जोडी दिसत असून अक्षयाने मरुन रंगारा लेहंगा घातला आहे तर हार्दिकच्या डोक्यावर सेहरा बांधलेला दिसून येत आहे. त्यांच्या लग्नाची चर्चा होत असताना अचानक हा व्हिडिओ अनेकांसाठी सुखावणारा आहे.

अंजली- राणाचा रोमँटिक अंदाज

अंजली आण राणादा म्हणजे हार्दिक आणि अक्षयाचा हा व्हिडिओ खूपच रोमँटिक आहे. या व्हिडिओमध्ये दोघांनी छान रॉयल असा लुक केला आहे. अक्षया मरुन कलरच्या रॉयल अशा लेहंग्यामध्ये आहे. तिने केसांची विशिष्ट अशी हेअरस्टाईलही केलेली आहे. तर हार्दिकने यामध्ये शेरवानी घातली असून त्याने डोक्यावर फेटा बांधला आहे. जो खूपच रॉयल दिसत आहे. या व्हिडिओमध्ये हे  दोघे सुंदर दिसत असून हार्दिक अक्षयाला फिरवत आहे. ज्यामुळे अक्षयाचा लेहंगा अधिक सुंदर दिसत आहे. पण हा लग्नाचा व्हिडिओ नाही तर त्यांनी एका ब्रँडसाठी केलेले हे शूट आहे. हे लगेच लक्षात येेते. तुम्ही जर अक्षया- हार्दिकच्या लग्नाची वाट पाहात असाल तर थोडे थांबायला हवे. कारण हा अजूनही त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ नाही. तर त्यांनी एका ब्रँडसाठी केलेले शूूट आहे. 

#अहा

हल्ली आपल्या नावाचे इनिशिअल्स घेऊन हॅशटॅग तयार केले जातात. पण हार्दिक आणि अक्षयाने एक वेगळाच हॅशटॅग तयार केला आहे. तो म्हणजे #अहा…. अक्षया आणि हार्दिक मराठी अक्षर घेऊन हॅशटॅग तयार केला आहे. त्यामुळे आता पुढे त्यांच्या लग्नात हा हॅशटॅग पाहायला मिळेल असे दिसत आहे. त्यांच्या लग्नाच्या तयारीला सुरु झाले असे सांगितले जात आहे. आता त्यांचा लुक कसा असणार याची प्रतिक्षा अनेकांना असणार आहे.

शेअर करत असतात व्हिडिओ

अक्षया आणि हार्दिकचे नाते कळल्यापासून त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सतत येत असतात.मग ते रिल्स व्हिडिओ असोत की कोलॅब्रेशन व्हिडिओ असो त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. हार्दिकने एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये अक्षया उखाणा घेताना दिसत आहे. हा उखाणाही तितकाच खास आहे. उखाणा आणि घरातील गर्दी पाहता त्यांच्या लग्नापूर्वीच्या तयारीला सुरुवात तर झाली नाही ना? असा प्रश्न पडत आहे. कारण तिला पाहता हा केळवणासाठी घातलेला घाट दिसत आहे. त्यामुळे आता त्यांच्या लग्नाचे खरे फोटो लवकरच समोर येतील असे दिसत आहे. 

दरम्यान तुम्हाला या दोघांचा लुक कसा वाटला आम्हाला नक्की कळवा .

Read More From मनोरंजन