पालकत्व

बेबी पावडरमध्ये कधीच असू नयेत हे घटक, होऊ शकतात दुष्परिणाम

Trupti Paradkar  |  Jun 21, 2022
how to Apply compact powder to get the perfect look in Marathi

बाळाला अंघोळ घातली अथवा त्याचं डायपर चेंज केलं की बाळाच्या अंगाला बेबी पावडर लावली जाते. कारण घामामुळे त्यांच्या अंगावर पुरळ अथवा इनफेक्शन होण्याचा धोका असतो. मात्र अनेक नवमातांना बाळासाठी कोणती बेबी पावडर निवडावी हेच माहीत नसतं. ज्यामुळे ती पावडर बाळासाठी सुरक्षित आहे की नाही याची योग्य काळजी घ्यायला हवी. अनेक संशोधनात बेबी पावडरमधील हानिकारक घटकांमुळे बाळाच्या त्वचेला नुकसान होत असल्याचं निर्दशनास आलेलं आहे. यासाठी जाणून घ्या बाळाच्या पावडरमध्ये  कोणते घटक मुळीच असू नयेत. तसंच जाणून घ्या बाळाची काळजी कशी घ्यायची (Navjat Balachi Kalji In Marathi), बाळाची शी ची जागा लाल होणे उपाय | Babies Diaper Rash Home Remedies In Marathi, बाळाच्या वाढीचे टप्पे | Step By Step Baby Growth In Marathi

बेबी पावडरचा वापर बाळासाठी सुरक्षित असतो का ?

बाळाची त्वचा नाजूक आणि संवेदनशील असते. ज्यामुळे बाळासाठी कोणतेही प्रॉडक्ट खरेदी करताना ते त्याच्या त्वचेसाठी योग्य आहे का हे तपासणं गरजेचं आहे. बाळाची त्वचा मऊ राहण्यासाठी आणि घामापासून त्याचं संरक्षण होण्यासाठी बाळाला पावडर लावली जाते. मात्र अमेरिकन अॅकेडमी ऑफ पिडियाट्रिक्सने केलेल्या एका संशोधनात असं आढळलं आहे की, जर श्वासाद्वारे बाळाच्या नाकातून ही बेबी पावडर त्याच्या शरीरात गेली तर त्याचा बाळाच्या फुफ्फुसांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. असं झाल्यास बाळाला श्वास घेण्यास त्रास होतो. बऱ्याचदा श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे बाळ घुसमटून गुदमरू शकतं. यासाठी बाळाला पावडर कशी लावावी हे आधी समजून घ्या.

बेबी पावडरमध्ये कोणते घटक असू नयेत

बाळासाठी पावडर खरेदी करताना त्यावरील माहिती जरूर वाचा. खाली दिलेले घटक असलेली बेबी पावडर खरेदी करू नका

टॅल्क

बेबी पावडर या टॅल्क बेस नसाव्या. कारण टॅल्कमध्ये लहान लहान कण असतात जे बाळाच्या श्वासावाटे शरीरात जाऊ शकतात. बाळाच्या सुरक्षित आरोग्यासाठी बेबी पावडर खरेदी करताना हे जरूर लक्षात ठेवा.

पेराबेन

आजकाल एखादं प्रॉडक्ट जास्त काळ टिकावं यासाठी त्यात पेराबेन वापरतात. मात्र लक्षात ठेवा पेराबेनयुक्त पावडरमुळे तुमच्या बाळाच्या श्वसनमार्गावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. एवढंच नाही तर याचा परिणाम बाळाच्या हॉर्मोन्सवरही होऊ शकतो.

कृत्रिम रंग अथवा सुगंध

बाळाच्या पावडरमध्ये कधीच कृत्रिम रंग अथवा सुगंध असू नयेत. कारण त्यामुळे बाळाच्या त्वचेला आणि शरीराला इनफेक्शन होण्याचा धोका असतो. 

ग्लूटेन

बेबी पावडर नेहमी ग्लूटेन फ्री असेल याची काळजी घ्या. कारण ग्लूटेन बेबी पावडरमध्ये वापरण्यात येतं मात्र त्यामुळे बाळाला इनफेक्शन होऊ शकतं. 

एस्बेस्टस

बाळाच्या पावडरमध्ये कधीच एस्बेस्टस नावाचं मिनरल फायबर असू नये. कारण ते देखील बाळाच्या श्वसनातून शरीरात गेलं तर बाळाला श्वसनाचा त्रास होण्याचा धोका असतो.

बाळासाठी पावडर खरेदी करताना काही टिप्स

बाळासाठी तुम्ही बाजारातून प्रॉडक्ट खरेदी करणार असाल तर बेबी पावडर विकत घेताना या गोष्टी लक्षात ठेवा.

तुमच्या बाळासाठी तुम्ही जर एखादी नैसर्गिक घटकांपासून तयार केलेली पावडर शोधत असाल तर बेबी चक्राची बेबी पावडर खरेदी करा. कारण यात बाळाच्या सुरक्षेसाठी आरारोट पावडर, रोझ बटर आणि ओटमीलचा वापर करण्यात आलेला आहे. शिवाय ही पावडर टॅल्क फ्री असून बाल रोग तज्ञ्जांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आलेली आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From पालकत्व