DIY लाईफ हॅक्स

या कारणासाठी प्रत्येकाने करायला हवं गार्डनिंग, आरोग्य राहते ठणठणीत

Trupti Paradkar  |  Oct 29, 2021
health benefits of gardening in marathi

झाडे लावा, झाडे जगवा हे घोष वाक्य आपण सगळीकडे ऐकतो. पर्यावरण प्रेमी तर दरवर्षी घरात, बागेत झाडे लावतात. वास्तविक घरातच बाग फुलवण्यासाठी जास्त जागेची नाही तर गार्डनिंगची आवड आणि थोडी सवड असण्याची गरज आहे. घरातच सुंदर बाग असेल तर तुमचं घर शोभिवंत दिसतं. मात्र एवढंच नाही गार्डनिंगची आवड तुमच्या आरोग्यासाठीही उत्तम ठरू शकते. यासाठीच जाणून घ्या गार्डनिंगचे आरोग्यावर होणारे चांगले फायदे

health benefits of gardening in marathi

झाडांच्या वाढीसाठी उपयुक्त आणि सोप्या टिप्स (Plants To Grow From Cuttings In Marathi)

आजारपण कमी येतं

घरातच आर्युवेदिक आणि सेंद्रिय झाडं असतील तर तुम्हाला त्यामुळे ताज्या भाज्या आणि फळं मिळू शकतात. ज्याचा तुमच्या आरोग्यावर चांगला फायदा होतो आणि आजारपण कमी होतं. आजाकाल बाजारात केमिकलयुक्त आणि कीटकनाशक मारलेल्या भाज्या आणि फळं मिळतात. यासाठीच घरात एखादी छोटी बाग फुलवणं आणि त्यामध्ये भाज्या पिकवणं हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तुम्ही छोटी बाल्कनी असेल तरी तिथे कोथिंबीर, मिरची, पुदिना, टोमॅटो, कडीपत्ता अशा भाज्या नक्कीच पिकवू शकता.

घरच्या झाडांची काळजी कशी घ्यावी याच्या सोप्या टिप्स (How To Care For Indoor Plants)

डिमेंशियाचा धोका कमी होतो

आजकाल लोकांना मानसिक ताण आणि पर्यायाने डिमेंशियाचा त्रास जास्त जाणवतो. साठीच्या वरील लोकांना डिमेंशिया होण्याचा जास्त धोका असतो. काही संशोधनात असं आढळून आलं आहे की जे लोक झाडं, फुलझाडं यांच्या सहवासात असतात अथवा बागकाम करण्यात रमलेले असतात अशा लोकांना डिमेंशिया होण्याची शक्यता कमी असते. कारण झाडांमुळे त्यांचे एकटेपण नाहीसं होतं आणि मानसिक ताण कमी झाल्यामुळे असे आजार होत नाहीत.

मन प्रसन्न राहतं 

घरात झाडे आणि त्यांचे विविध रंग सतत नजरेस पडल्यामुळे मनावर चांगला परिणाम होतो. मनावर दृष्याचा परिणाम जास्त होत असतो. त्यामुळे मन प्रसन्न ठेवण्यासाठी बागकाम करणं हा एक चांगला उपाय आहे. आजारी लोकांनी आजारपणातून लवकर बरं होण्यासाठी झाडांच्या सानिध्यात काही काळ घालवणं फायद्याचं ठरू शकतं. आजारपणातून रिकव्हर होणाऱ्या ताणावर हे एक चांगले औषध ठरू शकते.

रक्तदाब नियंत्रणात राहतो 

मानसिक ताण आणि कामाची चिंता याचा परिणाम शरिरावर होतो. ज्यामुळे अनेकांना आजकाल उच्च रक्तदाबाची समस्या होते. रक्तदाब वाढल्यास त्याचा परिणाम ह्रदय, मेंदूवर होण्याची शक्यता जास्त असते. यासाठी वेळीच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याची कला समजायला हवी. एका संशोधनात असं आढळलं आहे की बागकाम करणाऱ्या लोकांना ह्रदयरोग आणि स्ट्रोक होण्याची शक्यता कमी असते.

जाणून घ्या टेरेस गार्डनिंग मराठी टिप्स (Terrace Gardening Tips In Marathi)

हाडे मजबूत राहतात 

बागकाम करण्यासाठी तुम्हाला दिवसभरात काही वेळ उन्हात राहावे लागते. बऱ्याचदा ही वेळ सकाळच्या कोवळ्या उन्हाची असते. कारण झाडांना पाणी देणे, खत घालणे हे अनेकांचे सकाळचे काम असते. ज्यामुळे शरीराला पुरेसे व्हिटॅमिन डी मिळते. जे तुमच्या हाडांच्या मजबूतीसाठी चांगले ठरते. बागकाम केल्यामुळे तुमच्या हाडांचे आरोग्य सुधारते आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो. 

घरात लावलेली झाडे लवकर वाढावी यासाठी सोप्या टिप्स

Read More From DIY लाईफ हॅक्स