Diet

Monsoon Diet: पेर खाल्लंत तर होतील या ‘5’ समस्या दूर

Aaditi Datar  |  Jul 29, 2019
Monsoon Diet: पेर खाल्लंत तर होतील या ‘5’ समस्या दूर

मान्सूनमध्ये बाजारात हमखास मिळणारं फळ म्हणजे पेर. आता हे फळं बाजारात मुबलक प्रमाणात आलं असल्याने सध्या प्रत्येकांच्या डाएटमध्ये याचा समावेश नक्कीच झाला असेल. हे फळ अगदी छान रसाळ आणि चवीलाही चविष्ट तर असतंच पण यामध्ये अनेक औषधीय गुण आहेत. जे आपल्या शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. कारण यामध्ये मिनरल, पोटॅशिअम, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन के, फायबर, बी कॉम्प्लेक्सचं प्रमाण भरपूर असतं. पेर खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढते, रक्ताभिसरणही चांगलं होतं आणि हाडांना बळकटी येते. चला जाणून घेऊया हे फळ खाल्ल्याने आपल्या आरोग्याशी निगडीत कोणत्या समस्या दूर होतात.

इम्‍यून सिस्‍टमसाठी चांगलं

हे फळ इम्यून सिस्‍टम म्हणजेच प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी ही फारच उपयोगी आहे. त्यामुळे बदलत्या वातावरणात वारंवार आजारी पडणाऱ्यांनी हे फळ नक्की खावं. कारण हे फळ तुमची इम्‍यूनिटी वाढवून छोट्या-मोठ्या आजारांपासून तुम्हाला दूर ठेवतं. याशिवाय नासपती खाण्याने शरीरातील ग्लुकोज एनर्जीमध्ये परिवर्तित होतं. जेव्हा तुम्हाला थकवा जाणवेल तेव्हा एनर्जीसाठी तुम्ही पेर खाल्ल्यास लगेच एनर्जेटीक वाटेल.

Shutterstock

फायबरयुक्त

पेर अँंटीऑक्सीडंट आणि फायबरचा एक उत्तम स्त्रोत आहे. मध्यम आकाराच्या एका पेरात 6 ग्रॅम फायबर असतं. जे 50 वर्षाच्या महिलांच्या रोजच्या 24 टक्के गरजेला पूर्ण करतं. याशिवाय पेरामधील पॅक्टीन नावाच्या तत्तवामुळे तुम्हाला बद्धकोष्ठाची समस्या असल्यास तीही दूर होईल. 

आर्थरायटीसच्या वेदनेपासून सुटका

जर तुम्हाला हाडांच्या बाबतीत एखादा त्रास जाणवत असेल तर पेराचं सेवन तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे. यामध्ये असणारं बोरोन नावाचं केमिकल आढळतं जे तुमची कॅल्शिअम लेव्हल कायम राखण्यात उपयोगी ठरतं. तसंच यातील मॅग्‍नेशिअम, मँगनीज, फॉस्फरस आणि कॉपरसारखे मिनरल सूज कमी करतात. आर्थरायटीसने त्रस्त असणाऱ्या रूग्णांनी पेराचं सेवन नियमितपणे कराव. त्यामुळे तुमच्या हाडांना त्रास कमी होतो आणि ऑस्टीयोपोरोसिससारख्या समस्याही दूर होतात. 

Shutterstock

आर्यनचा चांगला स्रोत

भारतीय महिलांमध्ये जास्तकरून आर्यनची कमतरता जाणवते. अशा महिलांनी रोज एक तरी पेर नक्की खावं. यामध्ये भरपूर प्रमाणात आर्यन असतं. त्यामुळे रक्ताची कमतरताही भरून निघते. तसंच प्रेग्नंट महिलांनीही स्वतःच्या आणि बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी आहारात पेराचा समावेश नक्की करावा.

डायबिटीसपासून बचाव

Shutterstock

साधारणतः डाएटमध्ये फायबरचा समावेश केल्याने डायबिटीसचा धोका कमी होतो. पेरामधील चांगल्या फायबरच्या प्रमाणाने ब्लड शुगर लेव्हल स्थिर राहते. त्यामुळे फक्त सफरचंदच नाहीतर पेरसुद्धा तुम्हाला डॉक्टरपासून दूर ठेवते. 

मग आजपासूनच तुमच्या आहारात रोज किमान एक तरी पेर नक्की समाविष्ट करा आणि या पाच समस्यांना दूर ठेवा. 

हेही वाचा –

बटाट्याशिवाय तुमचेही जेवण होत नाही पूर्ण, मग वाचाच

दररोज अक्रोड खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे

जेस्टेशनल डायबिटीस (Gestational Diabetes) असल्यास अशी घ्या काळजी

Read More From Diet