प्राचीन काळी आजसारखे बेड नव्हते, त्यामुळे तेव्हा सर्वजण जमिनीवर अथंरूण पांघरून झोपत असत. मात्र काळ बदलला आणि सर्वजण बेडवर झोपू लागले. जमिनीवर झोपणं ही आपली परंपरा आहेच पण ती एक आरोग्य थेरपीदेखील आहे. कारण अनेक संशोधनात जमिनीवर झोपण्याचे चांगले फायदे दिसून आले आहे. जमिनीवर झोपण्यामुळे मोठमोठ्या आरोग्य समस्या आणि गंभीर आजारपण बरं होऊ शकतं. यासाठीच जाणून घ्या जमिनीवर झोपण्याचे फायदे… यासोबतच जाणून घ्या झोप येण्यासाठी काय करावे, जाणून घ्या घरगुती उपाय | Zop Yenyasathi Upay आणि Pregnancy Madhe Kase Zopave | गरोदरपणात कसे झोपावे
जमिनीवर झोपण्यामुळे काय होतात चांगले फायदे
बेडवर असलेली मऊ गादी कितीही आरामदायक असली तरी ती तुमच्या आरोग्यासाठी योग्य नाही. यासाठी जाणून घ्या जमिनीवर झोपण्याचे फायदे
कंबरदुखी कमी होते
आजकाल अनेकांना सतत कंबर दुखीचा त्रास जाणवत असते. बैठी जीवनशैली, सतत खुर्चीवर अथवा बसून राहणं यामुळे तुमच्या शरीराला पुरेशी शारीरिक हालचाल करता येत नाही. ज्यामुळे सांधेदुखी, कंबर दुखी असे त्रास जाणवू लागतात. ज्यामध्ये मऊ गादीवर झोपण्यामुळे तुमची समस्या अधिक वाढी शकते. मात्र जर अशा लोकांनी जमिनीवर अथवा कडक गादीवर झोपण्याचा प्रयत्न केला तर कंबर दुखी नक्कीच कमी होते.
शरीराला थंडावा मिळतो
उन्हाळ्यात जर तुमच्या शरीराचं तापमान वाढलं तर तुम्हाला घाम येतो आणि झोपमोड होते. जेव्हा तुम्ही गुबगुबीत गादीवर झोपता तेव्हा ओव्हर हिटिंगमुळे तुम्हाला शांत झोप येत नाही. मात्र अशा वेळी जर तुम्ही जमिनीवर साधं पांघरून टाकून झोपला तर तुम्हाला मुळीच त्रास न होता शांत झोप लागते.
शरीराचा पोश्चर सुधारतो
चुकीच्या पद्धतीने उठणे, बसणे याचा परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो. सतत बसून राहण्यामुळे अथवा अयोग्य शारीरिक हालचाल झाल्यामुळे पाठीचा कण्याच्या समस्या निर्माण होतात. पाठदुखी, मानदुखी वारंवार जाणवत राहते. मात्र तुम्ही नियमित जमिनीवर झोपला तर तुमच्या शरीराचा पोश्चर बिघडत नाही.
ताणतणाव कमी होतो
आता तुम्ही म्हणाल की जमिनीवर झोपण्याचा आणि ताणतणावाचा काय सबंध ? मात्र असं अनेक संशोधनात आढळून आलं आहे की जमिनीवर झोपणं तुमच्या मानसिक आरोग्यासाठीही योग्य ठरतं. ताणतणाव नियंत्रणात ठेवण्यासाठी जमिनीवर झोपणं तुमच्या फायद्याचं ठरतं. मानसिक आरोग्य लाभण्यासाठी यासाठीच योगासनानंतर शवासन अथवा योगनिद्रा करून घेतली जाते. कारण शरीर आणि मन हे एकमेकांवर अवलंबून आहे. त्यामुळे मानसिक आरोग्यासाठी तुमचे शरीरादेखील मजबूत असायला हवे.
रक्तप्रवाह सुधारतो
शारीरिक क्रिया योग्य पद्धतीने होण्यासाठी तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत असायला हवा. एका संशोधनात रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी शवासन करण्याचे फायदे सांगण्यात आलेले आहेत. कारण जमिनीवर झोपून शवासन केल्याने तुमचा रक्तप्रवाह सुरळीत होतो. यासाठी जर तुम्हाला रक्तदाबाची समस्या असेल तर जमिनीवर झोपा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक