आरोग्य

कानात उष्णतेची पुळी येत असेल तर करा सोपे उपाय

Leenal Gawade  |  Oct 3, 2021
कानात आलेली उष्णतेची पुळी सोपे उपाय

वातावरण थोडे बदलेले की अनेक शारीरिक बदल होऊ लागतात.  पावसाळा आला की सर्दी, खोकला असे त्रास होऊ लागतात. थंडीच्या दिवसात ताप, पडसं असे त्रास होऊ लागतात. तसचं उन्हाळा आला की, उष्णतेशी निगडीत काही त्रास होऊ लागतात. खूप जणांना एप्रिल आणि पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिन्यातल्या उष्णतेमुळे बरेच त्रास होऊ लागतात. कानात उष्णतेची पुळी होण्याचा त्रास वर्षभर खूप जणांना होतो. खरंतरं वातावरणात बदल झाला की, हा त्रास होण्याची शक्यता अधिक असते.  कानात उष्णतेती पुळी आली की, त्यामुळे गालदुखी, खाताना त्रास होणे असे काही त्रास होऊ लागतात. जर तुम्हाला असा त्रास होऊ लागला असेल किंवा वरचेवर होत असेल तर तुम्ही काही सोपे उपाय करायला हवेत. जाणून घेऊया असेच काही सोपे उपाय

अक्कल दाढ येतेय, ही आहेत अक्कल दाढ येण्याची लक्षणे

तुळशीचा रस

Instagram

तुळशीचा रस हा कानातल्या पुळीवर एकदम कमालीचे काम करते. तुळशीची काही पाने घेऊन ती कुटून त्याचा रस काढा.अलगद हा रस कानात घाला. उष्णतेमुळे जर कानात ठणके बसत असतील आणि झोपणे कठीण होऊन गेले असेल तर तुम्ही तुळशीचा रस कानात घालू शकता. रात्री झोपताना तुळशीचा रस घाला त्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. तुळशीची पाने स्वच्छ धुवून मगच त्याचा वापर करा. जर तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर तुम्ही अजिबात त्याचा वापर करु नका.

जंतुनाशक ड्रॉप

बरेचदा कानांमध्ये केवळ उष्णता नाही. तर काही बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्यामुळेही पुळी येते. ही पुळी आल्यानंतर तुम्ही एखाद्या केमिस्टमधून चांगल्या सल्ल्यानंतर तुम्ही जंतुनाशक ड्रॉपचा उपयोग करु शकता.या जंतुनाशक स्प्रेमुळे तुम्हाला नक्की फरक पडेल. 

कानाचे आजार व घरगुती उपचार जाणून घ्या (Ear Pain Home Remedy In Marathi)

कान शेकणे

कानामध्ये मळ साचला तरी देखील कानात पुळी येण्याची शक्यता असते. कानात मळ साचला असेल तर अशावेळी एखादा कपडा गरम करुन तुम्ही तो कानावर ठेवावा. त्यामुळे कानाला चांगला शेक मिळतो. कानात चिकटलेला मळ त्यामुळे निघण्यास मदत मिळते. त्यामुळे कानात आलेल्या उष्णतेच्या पुळीला उष्णतेने कमजोर करता येते. त्यामुळे कान शेकण्यासही काहीच हरकत नाही.

कैलास जीवन

कानाच्या बाहेरच्या बाजूला पुळी आली असेल तर तुम्ही कैलास जीवन सारखे थंड करणारे ऑईन्मेंट लावू शकता. त्यामुळेही तुम्हाला बरे वाटू शकते. कैलास जीवनमध्ये असलेल्या काही घटकांमुळे थंडावा मिळतो आणि पुळी हळुहळू  कमी होऊ लागते. त्यामुळे ती फोडावी देखील लागत नाही. 

आता कानात पुळी आली असेल तर तुम्ही अगदी नक्की हे सोपे उपाय करा.

Read More From आरोग्य