आरोग्य

हवेत वाढतंय प्रदूषण, बचाव करण्यासाठी करा हे घरगुती उपाय

Trupti Paradkar  |  Nov 24, 2021
home remedies to fight air pollution health tips in marathi

वायू प्रदूषण ही एक गंभीर समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कंपन्या आणि गाड्यांमधून शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर हवेत प्रदूषण होताना दिसत आहे. अनेक शहरांमधील प्रदूषणाची पातळी वाढल्यामुळे त्याचे गंभीर परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहेत. ज्या शहरांमध्ये वायू प्रदूषणाची पातळी वाढते त्या शहरांमध्ये सर्दी, खोकल्याचे रूग्ण जास्त आढळतात. वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसांच्या समस्याही वाढू लागतात. वास्तविक या समस्येला तोंड देण्यासाठी सरकार आणि नागरिकांनी प्रभावी उपाययोजना करायला हव्यात. मात्र आजवर याबाबत केलेले कोणतेच उपाय अथवा योजना प्रभावी ठरताना दिसत नाहीत. ज्यामुळे दिवसेंदिवस वायू प्रदूषणात वाढच होताना दिसते.  यासाठी जर सर्वांनी एकमताने आणि सहाकार्याने उपाय केले तर यातून नक्कीच चांगला मार्ग निघू शकतो. पण तोपर्यंत कमीत कमी घरी  काही घरगुती उपाय करून आपण स्वतःचे संरक्षण नक्कीच करू शकतो. 

वायू प्रदूषणापासून असा करा बचाव

वायू प्रदूषणात होणारी वाढ मानवी जीवनासाठी हानिकारक आहे. त्यामुळे यापासून आपले आणि कुटुंबियाचे संरक्षण करण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय

हळदीचे दूध

home remedies to fight air pollution health tips in marathi

हळदीचे दूध हे रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी एक प्रभावी घरगुती औषध आहे. हळदीचे दूध पिण्याने त्यातील अॅंटि बॅक्टेरिअल आणि अॅंटि व्हायरल घटक शरीराला मिळतात. ज्यामुळे इनफेक्शनपासून स्वतःचे संरक्षण नक्कीच करता येते. हळदीला आयुर्वेदामध्ये औषधाचे स्थान आहे कारण यामुळे ताप, सर्दी, अस्थमा असे आजार बरे होऊ शकतात. हळदीचे दूध पिण्याने फुफ्फुसांच्या इनफेक्शनचा धोका कमी होतो. यासाठी घरातील प्रत्येकाने रात्री झोपण्यापूर्वी गरम हळदीचे दूध नक्कीच प्यायला हवे. 

हळदीचे फायदे सौंदर्य आणि आरोग्यासाठी (Halad Benefits In Marathi)

तुळस घातलेला चहा

आजकाल प्रदूषणाचा धोका इतका वाढला आहे की रोजचा चहादेखील आयुर्वेदिक पिण्याची गरज आहे. नेहमीच्या तुमच्या फक्कड चहामध्ये उकळताना काही तुळशीची पाने टाकून तुम्ही स्वतःची रोग प्रतिकार शक्ती वाढवू शकता. अशा चहामध्ये साखरेऐवजी जर गूळ अथवा मध टाकला तर तुमचा चहा आरोग्यासाठी अधिक चांगला ठरेल.

आयुर्वेदिक काढा रेसिपी (Kadha Recipe In Marathi)

बीटा कॅरोटीन 

home remedies to fight air pollution health tips in marathi

हवेच्या प्रदूषणामुळे सतत सर्दी, खोकला अथवा डोकेदुखी जाणवत असेल तर तुमच्यासाठी हा अतिशय उत्तम उपाय आहे. आहारात यासाठी बीटा कॅरोटीन असलेले पदार्थ वाढवा. कारण त्यामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती नक्कीच वाढेल. तुम्हाला बीट, गाजर, पालेभाज्या, ब्रोकोली, मटर या पदार्थांमधून पुरेसे बीटा कॅरोटीन मिळू शकते.

निरोगी जीवनशैलीसाठी जाणून घ्या गाजर खाण्याचे फायदे (Carrot Benefits In Marathi)

साजूक तूप

साजूक तूपात अनेक गुणधर्म दडलेले असतात जे तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. यासाठी आहारातून तूपाचे सेवन करा कारण यामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढेल आणि प्रदूषणापासून तुमचे संरक्षण होईल. हिवाळ्यात नाकात साजूक तूप सोडून अथवा हातापायाला तूपाने मालिश करूनही तुम्ही तुमचे आरोग्य वाढवू शकता. 

तूप खाण्याचे फायदे जाणून घ्या (Tup Khanyache Fayde)

Read More From आरोग्य