आयब्रोज जितक्या घनदाट आणि कोरीव असतील तितके तुमचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. बोलक्या डोळ्यांसोबत दाट भुवया तुमचा चेहरा अधिक खुलवतात. मात्र आजकाल डोक्यावरील केसांप्रमाणेच अनेकांना भुवयांचे केस गळणे, भुवयांमध्ये कोंडा होणे, खाज येणे अशा समस्या जाणवतात. भुवयांचे केस गळण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असतात. पण भुवयांचे केस गळू लागले की तुमच्या चेहऱ्यामध्ये अचानक बदल जाणवू लागतात. सौंदर्य कायम टिकवण्यासाठी डोक्यावरील केसांप्रमाणेच भुवयांच्या केसांचीही निगा राखायला हवी. आयब्रोजचे केस गळणे कमी करण्यासाठी तुम्ही घरीच काही उपाय करू शकता. यासोबतच वाचा सुंदर लुक हवा असल्यास, आयब्रोजचा आकार ठेवा योग्य, लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी – Eyebrow Shaping Tips In Marathi
का गळू लागतात आयब्रोजचे केस
आयब्रोजचे केस गळण्यामागे अनेक कारणं असू शकतात. तज्ञ्जांच्या मते एखादी त्वचा समस्या अथवा हॉर्मोनल बदल यासाठी कारणीभूत असण्याची दाट शक्यता असते. थायरॉईड असंतुलनामुळे तुमच्या भुवयांचे केस गळू शकतात. ज्या लोकांना ऑटोइम्यून डिसऑर्डर असतात त्यांचेही भुवयांचे केस गळू लागतात. त्वचा कोरडी झाल्यामुळे भुवयांमध्ये खाज येते आणि केस गळू लागतात. जर आहार संतुलित नसेल तर कुपोषणामुळेही भुवयांचे केस गळू शकतात. त्यामुळे सर्वात आधी तुमच्या भुवयांच्या केस गळण्याचे कारण शोधा आणि त्यानुसार योग्य ते औषधोपचार करा आणि सोबत करा हा घरगुती उपाय
आयब्रोज घनदाट करण्यासाठी घरगुती उपाय
भुवया घनदाट करण्यासाठी त्यांचे योग्य पोषण होणे गरजेचं आहे. डोक्यावरचे आणि आयब्रोजचे केस मजबूत होण्यासाठी एरंडेल तेल खूप फायदेशीर आहे. जर तुमचे आयब्रोज कोरड्या हवामानामुळे, अती प्रमाणात थ्रेडिंग केल्यामुळे अथवा कमी पोषणामुळे गळत असतील तर नियमित कॅस्टर अथवा एरंडेल तेल लावणं तुमच्या फायद्याचं ठरेल. यासाठी एका वाटीत थोडं एरंडेल तेल घ्या. कापसाच्या मदतीने तेल आयब्रोजला लावा. हळूवारपणे भुवयांना मसाज द्या. रात्रभर भुवयांवर एरंडेल तेल राहू द्या. सकाळी अंघोळ करताना हलक्या हाताने भुवया स्वच्छ करा. जर तुमच्याकडे एरंडेल तेल नसेल तर तुम्ही त्याऐवजी नारळाचे तेल, बदामाचे तेल, कोरफडाचे तेल भुवयांना लावू शकता.