DIY सौंदर्य

उन्हाळ्यात त्वचा दिसत असेल निस्तेज तर, वापरा हा होममेड फेस पॅक

Trupti Paradkar  |  May 30, 2022
उन्हाळ्यात त्वचा दिसत असेल निस्तेज तर, वापरा हा होममेड फेस पॅक

उन्हाळ्यात अंगाची काहिली तर होतेच शिवाय त्वचेचं अतोनात नुकसानही होतं. टॅनिंग आणि पिगमेंटेशनमुळे त्वचेवर काळे डाग निर्माण होतात. ज्यामुळे तुमची त्वचा निस्तेज आणि काळवंडलेली दिसू लागते. या काळात त्वचा नितळ आणि चमकदार करण्यासाठी अनेक प्रयत्न करून थकला असाल तर हा एक साधा घरगुती उपाय नक्की करून पाहा. विशेष म्हणजे या होममेड फेसपॅकचे कोणतेही साईड इफेक्ट्स तुमच्या त्वचेवर होत नाहीत. संत्र्यांच्या सालींपासून तुम्ही हा फेसपॅक घरीच तयार करू शकता. ज्यामुळे तुमचा वेळ आणि पैसे दोन्ही वाचतात. शिवाय तुम्हाला मिळते सुंदर आणि चमकदार त्वचा…

संत्र्यांच्या सालीपासून बनवलेल्या होममेड फेसपॅकचे फायदे

संत्र्यांमध्ये असलेले पोषक घटक त्याच्या सालींमध्येही असतात. मात्र संत्री खाल्ल्यावर आपण त्याच्या साली फेकून देतो. या साली एकत्र करून सुकवून तुम्ही यापासून एक छान फेसपॅक करू शकता. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात आणि त्वचेवर ग्लो येतो. जुनाट डाग आणि व्रण कमी करण्यासाठी हा फेसपॅक खूप फायदेशीर आहे. उन्हामुळे त्वचा काळवंडली असेल तर या फेसपॅकमुळे तुमच्या त्वचेला उजळपणा मिळू शकतो. संत्र्यांच्या सालींमध्ये अॅंटि फंगल आणि अॅंटि बॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. संत्र्यामधील व्हिटॅमिन सी तुमच्या त्वचेला मिळते ज्यामुळे त्वचेचं पोषण होतंच शिवाय त्वचेला ब्लिचिंग इफेक्ट मिळतो. नैसर्गिक पद्धतीने त्वचेचा काळेपणा कमी होतो, त्वचा घट्ट झाल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि फाइन लाईन्स कमी होतात. हा फेसपॅक नियमित वापरल्यास तुमच्या त्वचेवरील पिंपल्सचे डाग, पिगमेटेंशन कमी होण्यास मदत होते. संत्र्याच्या सालीमध्ये अॅंटि ऑक्सिडंस असल्यामुळे तुमची त्वचेचा निस्तेजपणा कमी होतो आणि त्वचेला छान उजाळा मिळतो. यासोबतच जाणून घ्या संत्र्याचे फायदे (Benefits Of Orange In Marathi)

कसा तयार कराल हा होममेड फेसपॅक

हा होममेड फेसपॅक करणं अतिशय सोपं आहे. यासाठी तुम्हाला फक्त संत्री खाल्ल्यावर उरलेल्या सालींची गरज आहे. सर्वात आधी या सर्व साली सुकवून घ्या, त्यानंतर त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या सुकवून टाका. दोन्ही गोष्टी मिक्सरमध्ये वाटून त्याची पावडर तयार करा. तुम्ही तीन ते सहा महिने ही पावडर फेसपॅकसाठी वापरू शकता. यासाठी ही पावडर एखाद्या घट्ट झाकणाच्या बरणीत ठेवा. 

कसा कराल फेसपॅक

संत्र्याच्या साली आणि गुलाबाची पावडर दोन चमचे घ्या, त्यात एक चमचा मुलतानी माती मिसळा, चिमूटभर हळद आणि गुलाबपाणी टाकून एक छान फेसपॅक तयार करा. चेहऱ्यावर फेसपॅक लावा आणि सुकू द्या. सुकल्यावर पाण्याचा हात लावून फेसपॅक मसाज करत काढून टाका. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ करा. आठवड्यातून एक ते दोन वेळा हा फेसपॅक वापरा.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य